शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सुधीरभौंची (मस्त मस्त) ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 12:45 IST

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर म्हणून रवीना टंडन यांची सुधीरभौंनी नियुक्ती केली. भर दुपारी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाकरिता खुद्द सुधीरभौ दोन-अडीच तासाच्या विलंबाने पोहोचले.

- दे. दे. ठोसेकरराज्य सरकारचे व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये लवकरच एका वाघाला हॉटसिटवर बसवण्याचा आग्रह राज्याचे वनमंत्री सुधीरभौ मुनगंटीवार यांनी धरला आहे. (नितीनभौंनंतर जर कुठलीही घोषणा कोटी रुपयांच्या खाली न करणारे ‘कोट्यधीश’ पुढारी कुणी असतील तर सुधीरभौच) प्रकाश व मंदाकिनी आमटे यांच्यासोबत त्यांचा पाळीव वाघ सेटवर आणून त्यासोबत बच्चन यांनी सेल्फी काढण्याची कल्पना पुढे आली होती. मात्र आमटेंच्या वाघाला स्टुडिओपर्यंत आणणे हे संजय राऊत यांना कपाळावर आठी न घालता बाईट देण्यास भाग पाडण्याइतके कठीण असल्याचे लक्षात आल्याने ही कल्पना प्रत्यक्षात उतरली नाही. व्याघ्रदूत बच्चन आपल्या सेटवर मांजरही दिसणार नाही, याची सध्या खबरदारी घेत आहेत. आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर म्हणून रवीना टंडन यांची सुधीरभौंनी नियुक्ती केली. भर दुपारी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाकरिता खुद्द सुधीरभौ दोन-अडीच तासाच्या विलंबाने पोहोचले. खासदार गोपाळ शेट्टी दोनवेळा कार्यक्रमस्थळी येऊन गेले. त्यामुळे सुधीरभौंच्या उपस्थितीत त्यांचा पारा चढला होता. व्यासपीठावर येण्याकरिता अधिकाºयांनी त्यांच्या नाकदुºया काढल्या. चित्रपटातील हिरॉईन हिरोकरिताही दीर्घकाळ थांबत नाहीत, असे ऐकून होतो. मात्र रवीना टंडन (टणटण न करता) एवढ्या वेळ थांबल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असा टोमणा शेट्टी यांनी सुधीरभौंना मारला. (अर्थात सुधीरभौ त्यावेळी रवीना यांच्याशी गुजगोष्टी करीत असल्यानं ते शेट्टीचं स्वगत ठरलं, असो) आतापर्यंत आपल्याला ‘टी’ फॉर टायगर माहित होते. यापुढे ‘टी’ फॉर टंडन असेल, असे उदगार सुधीरभौंनी काढले. (सुधीरभौ यांचे हे विधान वाघाचा म्हणजे पर्यायाने शिवसेनेच्या ढाण्या वाघाचा पाणउतारा करण्याकरिता होते, अशी, चर्चा मातोश्रीपर्यंत गेली आहे) रवीना बोलायला उभी राहिली तेव्हा तिने चक्क आपल्याला ‘मुनगंटीवार’ हे आडनाव ‘उपरनिर्दिष्ट’ किंवा ‘अभ्यवेक्षण’ वगैरे कठीण शब्दांसारखे कठीण कठीण असल्याने उच्चारता येत नाही, असे जाहीर केले. आडनावात आहेच काय, असा मुद्दा उपस्थित करीत ती एकसारखी सुधीरभाऊ... सुधीरभाऊ करीत होती. (परिणामी सुधीरभौंना तिचा उल्लेख रवीना भगिनी करणे अपरिहार्य झाले) शेट्टी यांच्या चेहºयावर तेव्हा असुरी भाव दिसले. कार्यक्रमानंतर सुधीरभौंनी रवीनाला ई-बग्गीत (विजेवर चालणारी) बसवून राष्ट्रीय उद्यानाची सैर घडवली. रवीनानं ‘आशिष’ हा बिबट्याचा बछडा दत्तक घेतला. (रवीनानं ‘आशिष’ दत्तक घेतला ही वार्ता पसरताच काही खवचटांनी शेलारांना फोन करुन अभिनंदन केले म्हणे)आपल्या लहानग्या मुलांना खेळण्याकरिता बछडा दत्तक घेतल्याचं तिनं जाहीर केलं. (वित्त खात्यामार्फत काटकसरीच्या संदेशाकरिता सनी लिओनी हिला आगामी अर्थसंकल्पापूर्वी ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर करण्याची कल्पना सुधीरभौंच्या मनात घोळत असल्याचे कळते)

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारTigerवाघRaveena Tandonरवीना टंडन