शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

‘राम लक्ष्मण दशरथ’ की ‘सुभान तेरी कुदरत’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 09:27 IST

Acharya Dr. Lokesh Muni : आपल्या मनात आहे, तेच अनेकदा ऐकू येते! जशी दृष्टी; पर्यायाने तशीच सृष्टी बनते. दृष्टिकोन बदला, जग आणखी सुंदर भासेल!

- आचार्य डॉ. लोकेश मुनी(संस्थापक, अहिंसा विश्व भारती, नवी दिल्ली)

बांग्लादेश, अफगाणिस्तान, इराक, इराण, सिरीया या देशांसह जगात अनेक ठिकाणी अस्वस्थता असताना सर्वत्र सौहार्दाचा दृढ संदेश जाण्याची आवश्यकता आहे. बंधुत्व, एकतेच्या विचारांवर सर्व जगाने चालण्याची गरज आहे.  आपण  भारत देशात जन्म घेतला.  जैन परंपरेत भगवान महावीरांचे अनेकांत दर्शनाचे विचार व संस्कार मिळाले हे आपले सौभाग्य आहे. आपण आपल्या अस्तित्वासह दुसऱ्यांचे अस्तित्वदेखील मान्य केले पाहिजे. आपल्या विचारांप्रमाणे इतरांच्या विचारांचादेखील आदर करायला हवा. त्याहून पुढे जात मी तर हे म्हणतो की, आपण आपल्या धर्माचे प्रामाणिकपणे पालन करावे, परंतु इतर पंथांचादेखील आदर केला पाहिजे. यातूनच अहिंसा धर्माचा खरा शुभारंभ होईल. 

धर्म व संप्रदाय एक नाहीत. धर्म हा फळाचा रस आहे, त्याच्या सुरक्षेसाठी असलेले कवच म्हणजे संप्रदाय! आपला देश धर्मनिरपेक्ष नाही तर पंथनिरपेक्ष आहे. माझा धर्म, माझा विचार श्रेष्ठ असे दावे सुरु झाले की प्रश्न उभे राहतात. अफगाणिस्तान-बांग्लादेशमधून जेव्हा धर्मपरिवर्तन करा वा निघून जा, असा फतवा निघतो, तेव्हा हा आततायीपणा प्रकर्षाने जाणवतो. मानवता हा अंतरात्मा. आपण त्यालाच धर्म म्हणायला हवे. हिंदू किंवा मुसलमान हा विचार फार नंतरचा आहे. धार्मिक उन्मादाला त्यात थारा नाही. जेथेदेखील सत्य व सकारात्मकता असेल त्यासोबतच धर्माचार्यांनी राहायला हवे. जेथे असे चित्र नसेल अशा लोकांना धर्माचार्यांनी सहकार्य करता कामा नये.

जैन धर्मात सम्यकदर्शनाला महत्त्व आहे. जशी आपली दृष्टी असते तशा सृष्टीची निर्मिती होते. त्यामुळेच लोकांनी आपला दृष्टीकोन व जगाकडे पाहण्याची नजर बदलली पाहिजे. एक व्यक्ती एकदा जत्रेत जाते. त्या जत्रेत बोलणारा एक पक्षी असतो. त्याचा मधूर चिवचिवाट ऐकून हिंदू व्यक्तीला वाटते, तो पक्षी म्हणतो आहे  ‘राम लक्ष्मण दशरथ’, मौलवीना वाटते त्या पक्ष्याच्या चिवचिवाटाचा अर्थ आहे  ‘सुभान तेरी कुदरत’... एक मसाले विक्रेता म्हणतो, हा पक्षी नक्की  ‘हल्दी, मिरची ढक रख’  म्हणतोय... भाजी विक्रेत्याला वाटते, पक्षी म्हणतो आहे,  ‘गाजर, मुली, अदरक’ तर पहेलवानाला वाटते  ‘दंड, मुद्गल, कसरत’... थोडक्यात काय, जे आपल्या मनात आहे, तेच अनेकदा ऐकू येते! जशी  दृष्टी; पर्यायाने तशीच सृष्टी बनते. त्यामुळे सकारात्मक विचार व विधायक भाव वृद्धिंगत होण्याची आवश्यकता आहे.  नकारात्मकता सोडली तर सृष्टी आणखी सुंदर बनू शकते.

युद्ध, हिंसा, दहशतवाद हे कुठल्याही समस्येचे उत्तर नव्हे. सकारात्मक संवाद व अहिंसेच्या मार्गाने प्रत्येक समस्येचे निराकरण केले जाऊ शकते. कोरोनाकाळात आपल्या देशाच्या महान सनातन परंपरेचे महत्त्व जगाच्या लक्षात आले. संयमाधारित जैन जीवनशैली किती सखोल, उपयोगी व भविष्याचा दृष्टीकोन असलेली आहे, ही बाब जगाला पटली आहे. आयुर्वेद, योग, प्राणायाम, संयमाधारित जीवनशैली  यामुळे कोरोनात देशाचा मृत्यूदर कमी आहे. अशा परिस्थितीत सर्व धर्माच्या लोकांनी एकत्रित बसून संवाद केला पाहिजे. चार पावले का होईना पण सोबत चालण्याचा संकल्प केला पाहिजे. प्रत्येकाने पुढाकार घेतला तर हे सहज शक्य आहे. तसे तर अंतरातून अंतर वाढत जाते, मात्र कधी तरी स्वत:शी संवाद व भेट व्हायला हवी. 

बात सरल, बलिदान कठीन है,पतन सहज, उत्थान कठीन है..गाता है खंडहर का हर पत्थर,ध्वंस सरल निर्माण कठीन है..आयुर्वेद, योग-प्राणायाम, संयम यावर आधारित जीवनशैली पुन्हा प्राप्त करा. बोलणे सोपे आहे आणि कृती कठीण. म्हणूनच ती कृती सुकर व्हावी, असे प्रयत्न गरजेचे आहेत.

(शब्दांकन : योगेश पांडे, नागपूर) 

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद