शहरं
Join us  
Trending Stories
1
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
2
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
3
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
4
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
5
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
6
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
7
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
8
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
9
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
10
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
11
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
12
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
13
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
14
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
15
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
16
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
17
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
18
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
19
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
20
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 

पब्लिसीटी स्टंट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2018 9:54 AM

शेतकऱ्यांचा संप हा पब्लिसीटी स्टंट आहे, या केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्या वक्तव्याने देशभरातील शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली.

- मिलिंद कुलकर्णी

शेतकऱ्यांचा संप हा पब्लिसीटी स्टंट आहे, या केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्या वक्तव्याने देशभरातील शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली. शासकीय, निमशासकीय कर्मचारी, कामगार यांचे संप यापूर्वी झाले आहेत. हे संप या घटकांच्या मागण्यांसाठी झाले. पण अन्नदाता असलेल्या शेतकऱ्याने त्याच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी संप केला तर मंत्री, लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांच्या पोटा त का दुखते? शेतकऱ्यांनी संप करायला नको, असे वाटत असेल तर त्यांचे प्रश्न सोडवा, मागण्या मान्य करा ना! संपाची हेटाळणी, कुचेष्टा कशासाठी? अन्नदाता असूनही शेतकऱ्याने कधी जगावर उपकाराची भाषा केली नाही. स्वत:च्या उत्पादित मालाची किंमत न ठरविता येणारा जगातील एकमेव उत्पादक असूनही वर्षानुवर्षे तो हा अन्यात सहन करीत आहे. कडेलोट झाला म्हणून तो अलीकडे रस्त्यावर उतरला. आंदोलने केली. स्वत: उत्पादित केलेला शेतीमाल रस्त्यावर फेकायला काळजावर दगड ठेवावा लागतो, हे मंत्रिमहोदयांना कसे कळणार? नापिकी, कर्जाचा बोजा असह्य होऊन फास जवळ करणारा शेतकरी पब्लिसीटी स्टंट करीत आहे काय? शेतकऱ्यांची मुले म्हणून प्रशासन आणि शासनामध्ये कार्यरत मंडळी शेतकरी प्रश्नावर उदासीन असल्याचे पाहून शेतकरी चिडला तर तो पब्लिसीटी स्टंट म्हणणार काय?लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक घटकाला अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे. स्वत:वरील अन्यायाला लोकशाही मार्गाने वाचा फोडण्याचा शेतकऱ्याला एक नागरीक म्हणून मुलभूत अधिकार असताना मंत्र्यांनी असे बेजबाबदारपणे विधान करणे चुकीचे आहे.शेतकºयांच्या कृतीला पब्लिसीटी स्टंट म्हटले जात असेल तर देशातील राजकीय मंडळी, लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी करीत असलेल्या करामती या ‘पब्लिसीटी स्टंट’ नाहीत काय? राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी यांनी एखादे आंदोलन हाती घेतले आणि तो प्रश्न सोडविला, असे ठळक उदाहरण लगेच आठवते काय? टोलबंदीचे आंदोलन मनसेने हाती घेतले होते. दोन-चार ठिकाणी तोडफोड झाली; पण टोलबंदी कायमस्वरुपी झाली काय? मराठी पाट्यांसाठी ‘खळ्खट्याक’ करण्यात आले, पण सगळ्या पाट्यांवर मराठी अक्षरे उमटली काय? हवामान शास्त्र विभागाच्या भाकिते, अंदाजांविषयी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फिरकी घेत अंदाज खरा ठरला तर साखर वाटेल असे म्हटले. राष्टÑवादीच्या नेत्याने पुण्यात शास्त्रज्ञांकडे साखर पाठवून दिली. आता पाकिस्तानची साखर आयात करण्यात आल्याचा निषेध म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गोदामांवर छापा टाकला. आचारसंहिता काळात शासकीय वाहन वापरता येत नाही, म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महापौर हे स्वत:चे खाजगी वाहन असतानाही ‘रिक्षातून’ जातात आणि स्वत:ची छबी टिपली जाईल, याची काळजी घेतातच ना? शासकीय अधिकारीदेखील शासकीय वाहन सोडून कधी दुचाकीवर फेरफटका मारुन वृत्तपत्र छायाचित्रकारांचे कॅमेरे स्वत:कडे वळवितात ना? पोलीस अधीक्षक स्वत: वाहतूक नियंत्रण करायला उभे राहतात, किंवा एखाद्या दारु अड्डा किंवा जुगार अड्डयावर धाड टाकतात, तेव्हा ‘कर्तव्यकठोर’ अशी प्रतिमा मिडियात निर्माण होतेच ना?आता हे सगळे ‘पब्लिसीटी स्टंट’ आहेत, असे म्हणायचे काय? एखाद्या प्रश्नाकडे लक्ष वेधायचे असेल तर आंदोलन, कारवाई, कृती असे हत्यार वापरावे लागते. तेच शेतकºयांनी वापरले. राजकीय पक्षांनी वापरले तर त्यांची कल्पकता म्हणायची आणि शेतकºयाने वापरले तर पब्लिसीटी स्टंट म्हणायचे, याला काय अर्थ आहे?