शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

वैद्यकीय सेवेचे खासगीकरण करा पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:19 IST

खरं तर महाराष्ट्रात शासकीय वैद्यकीय सेवेचे खासगीकरण करण्याची अजिबात गरज नाही. ते अप्रत्यक्षपणे केव्हाच झाले आहे. शासनाच्या अख्त्यारित असलेल्या या सेवा आत्ताच रुग्णांना इमानेइतबारे पुरविल्या जात नाहीत तर खासगी तत्त्वावर दिल्यास गरीब रुग्णांचा छळ होणार नाही, त्यांच्या घामाच्या पैशांवर डल्ला मारला जाणार नाही, याची शाश्वती कोण देणार?

- - गजानन चोपडे आरोग्य आणि शिक्षणावर बजेटमध्ये सर्वाधिक तजवीज करण्याची घोषणा करून स्वत:ची पाठ थोपटवून घेणाऱ्या शासनाने आता राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये अपुरी साधनसामग्री आणि मनुष्यबळाचा अभाव असल्याची प्राजंळ (?) कबुली दिली आहे. यावर उपाय म्हणून गुजरातच्या धर्तीवर सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर ३०० खाटांची (बेड) शासकीय रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये आता खासगी संस्थांना चालविण्यास दिली जाणार आहेत. अर्थात पैशांअभावी महागड्या औषधी घेण्याची कुवत नसणाºयांना सध्या मोफत मिळत असलेल्या या सेवेपासूनही वंचित ठेवण्याचा घाट असून राज्य सरकारी कर्मचारी संघटनेनेही या निर्णयाचा विरोध करीत यावर शिक्कामोर्तब केले आहे. गुजरातेत वैद्यकीय सुविधा महाग आहेत. सामान्य माणसाला त्या परवडणाºया नाही. अर्थात गुजरात सरकारचा हा प्रयोग अपयशी ठरला असताना महाराष्टÑात गुजरात पॅर्टन लागू करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे शासनाचे आत्मघाती पाऊल होय.खरं तर महाराष्टÑात शासकीय वैद्यकीय सेवेचे खासगीकरण करण्याची अजिबात गरज नाही. ते अप्रत्यक्षपणे केव्हाच झाले आहे. अनेक जिल्हा रूग्णालयांमध्ये आवश्यक असलेली वैद्यकीय यंत्रे नादुरुस्त असल्याने रुग्णांना खासगी दवाखान्याचाच आसरा घ्यावा लागतो. औषधांचा तुटवडा तर नेहमीचीच बोंब. गोंदिया येथील बाई गंगाबाई रुग्णालयात तर चक्क बंदी असलेल्या औषधीचे खरेदी प्रकरण नुकतेच गाजले. बनावट बिलाच्या आधारे खरेदी करण्यात आलेल्या या औषधीने रुग्णालय व्यवस्थापनाच्या भ्रष्ट कारभाराचे बिंग फोडले. ओरड झाली तेव्हा कुठे फार्मासिस्टसह औषध निर्मात्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शासनाच्या देखरेखित सुरू असताना जर रुग्णालयांचीही अवस्था असेल तर खासगीकरणानंतर रुग्णांचे कसे हाल होतील, याचा विचार न केलेलाच बरा. आदिवासी भागात तर वैद्यकीय सेवेची पार वाट लागली आहे.आजही गडचिरोली जिल्ह्यात होरडी गावातील आजारी महिलेला रुग्णवाहिकेअभावी खाटेवर झोपवून नाल्यातील पाच फुट पाण्यातून आरोग्य केंद्रात न्यावे लागत असेल तर ही बाब परोगामी महाराष्टÑाला नक्कीच शोभणारी नाही. यवतमाळातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गोरगरिबांना थेट मल्टीस्पेशालिटीमध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो. अत्यावश्यक असणाºया चाचण्या गेल्या कित्येक दिवसांपासून बंद आहेत. परिणामी रुग्णांकडून अंडरटेकिंग घेऊन शहरातील खासगी लॅबला रसद पुरविली जात असल्याचा संतापजनक प्रकार घडत असताना कुणी ब्र काढायला तयार नाही. एलएफटी (लिव्हर फंक्शन टेस्ट) केलएफटी (किडनी फंक्शन टेस्ट) सारख्या महत्त्वाच्या चाचण्या बाहेरून कराव्या लागतात. वैद्यकीय महाविद्यालयातील सोईस्करपणे मशीनरी बंद पाडली जाते. तातडीने पत्रव्यवहार केल्याच्या नोंदी घेतल्या जातात. त्यामुळे यांचे पाप सिद्ध होत नाहीत. शासनाच्या अख्त्यारित असलेल्या या सेवा आत्ताच रुग्णांना इमानेइतबारे पुरविल्या जात नाहीत तर खासगी तत्त्वावर दिल्यास गरीब रुग्णांचा छळ होणार नाही, त्यांच्या घामाच्या पैशांवर डल्ला मारला जाणार नाही, याची शाश्वती कोण देणार?

टॅग्स :doctorडॉक्टरnewsबातम्या