शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

शिवसंग्रामची राजकीय ‘मोट’ बांधण्यासाठी मेटे सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:16 IST

कार्यकर्त्यांची राजकीय मोट बांधण्यासाठी शिवसंग्रामचे विनायक मेटे राज्यात नव्या दमाने फिरू लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी, राज्यातील १० जिल्ह्यांमधील विधानसभा मतदारसंघ व काही लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याची रणनीती ठरविण्यात आली. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढण्याचा बिगुल त्यांनी फुंकला आहे.

- राजेश शेगोकार बुद्धिबळ अन् राजकारणाचा तसा जवळचा संबंध. बुद्धिबळाचा डाव जिंकण्यासाठी समोरच्याच्या पुढील चालीचा अंदाज बांधून चाल चालावी लागते. राजकारणाचंही अगदी तसंच आहे. राजकारणाच्या सारीपाटावर टिकण्यासाठी नेत्याला नेहमी पुढची चाल खेळावी लागते; मात्र ती वेळीच न खेळल्यामुळे, कधीकाळी राज्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या विनायक मेटेंवर त्यांचं ‘नायक’त्व टिकवण्यासाठी नवा संग्राम करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी शिलेदारांमध्ये स्फुरण भरण्यासाठी, मेटेंनी अकोला व वाशिममधील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. नारा देणं ठीक; मात्र मेटेंच्या शिवसंग्रामच्या बाहूत खरंच तेवढं बळ आहे का, याचा विचार मेटेंनाच करावा लागणार आहे.राज्यात २०१४ मध्ये जन्माला आलेल्या ‘महायुती’त ‘शिवसंग्राम’ सहभागी झाली. स्व. गोपीनाथ मुंडेंनी तेव्हा मेटेंना सत्तेत मानाचं पान देण्याचं आश्वासन दिलं; मात्र मुंडेंच्या अकाली निधनानंतर, मेटेंच्या नशिबी उपेक्षाच आली. भाजपाच्या चिन्हावर लढवून, वर्सोव्यातून भारती लव्हेकर यांच्या रूपानं एकमेव आमदार निवडून आणता आला. स्वत: मेटे बीडमधून पराभूत झाले. तेव्हापासून सुरू झालेला मेटेंचा राजकीय संघर्ष अद्यापही त्यांची पाठ सोडायला तयार नाही. आज मेटेंची ताकद म्हणजे एक आमदार आणि भाजपाच्या आशीर्वादानं मिळालेलं बीड जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद! नाही म्हणायला मुख्यमंत्र्यांनी मेटेंना राज्यमंत्री पदाच्या दर्जाचं शिवस्मारक समितीचं पद दिलं; मात्र अपेक्षित मंत्रिपद न मिळाल्यानं, मागचे साडेतीन वर्षे त्यांच्यातील नेत्याला कायम अस्वस्थच राहावं लागलं, तर दुसरीकडे राजकारणात त्यांना काहीसे ‘ज्युनियर’ असलेल्या महादेव जानकर व सदाभाऊ खोतांना मंत्रिपदाची ऊब मिळाली आहे. मेटेंसारखा 'सिनियर' नेता मात्र वंचित राहिल्याची सल त्यांच्या कार्यकर्त्यांना आहेच! आता अशा कार्यकर्त्यांची राजकीय मोट बांधण्यासाठी मेटे पुन्हा राज्यात नव्या दमाने फिरू लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी पुणे येथील बैठकीत शिवसंग्रामची नव्याने बांधणी सुरू करण्याची, तसेच आगामी निवडणुकांची रणनीती ठरविण्यात आली. राज्यातील १० जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ व काही लोकसभा मतदारसंघावर प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्याचे मेटेंनी ठरविल्याची माहिती आहे. बीड, कन्नड, भिवंडी, वर्सोवा, रिसोड, बाळापूर, वर्धा, तिवसा, रामटेक, संगमनेर, रायगड, परभणी अशा मतदारसंघामध्ये इच्छुकांना कामाला लागण्याचेही संकेत त्यांनी दिले आहेत. मेटे यांना भाजपासोबतच राहून लढायचे असेल, तर सर्वप्रथम मतदारसंघ मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. गत निवडणुकीत अकोल्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसंग्रामला देण्यात आली होती; मात्र ऐनवेळी भाजपाने उमेदवार दिल्यामुळे शिवसंग्रामला अपक्ष लढत द्यावी लागली. मेटे यांना किती मोठा संघर्ष करावा लागेल, हे यावरून अधोरेखित होते. जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढताना भाजपाच्या विरोधात भूमिका घ्यावीच लागणार आहे. त्या निवडणुकांमधील यशापयशाचा ‘हिशेब’ विधानसभा मतदारसंघाच्या जागा वाटपाच्या वेळी विचारात घेण्यात आला, तर मेटेंचा संघर्ष आणखी तीव्र होणार आहे, त्यामुळेच शिवसंग्रामची राजकीय ‘मोट’ ते कशी बांधतात, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटेPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र