शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

पॉवर खेळी चीत भी मेरी.. पट भी मेरी..

By सचिन जवळकोटे | Updated: December 29, 2019 06:02 IST

लगाव बत्ती

- सचिन जवळकोटे

बुद्धिबळाच्या डावात दोन खेळाडू असतात. मात्र आपल्या ‘थोरले काका बारामतीकरां’चं सारंच उरफाटं. ते एकटेच बुद्धिबळ खेळतात. जशा काळ्या प्याद्या त्यांच्या असतात, तशाच पांढºया प्याद्याही त्यांच्याच असतात. गंमत एवढीच की, इकडचा डाव वरचढ ठरू लागला की तिकडचा डाव हळूच सावरतात. दोन्हीकडच्या सोंगट्या मोठ्या ताकदीनं एकमेकांसमोर कशा उभारतील, याचीच व्यूहरचना ते अत्यंत चाणाक्षपणे करतात. शेवटी कुणीही कुणाला ‘चेक अँड मेट’ देवो.. मात्र ‘थोरले काका’च जिंकतात. आता एवढं सारं सांगण्याचं कारण म्हणजे या ‘काकां’नी पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याच्या पटावर हा नवा डाव मांडायला सुरुवात केलीय. लगाव बत्ती...

अकलूज’च्या ‘दादां’नाखुर्ची मिळाली; परंतु...

पुण्याच्या सोहळ्यात ‘थोरले काका बारामतीकरां’नी जेव्हा ‘अकलूज’च्या ‘दादां’ना जवळ बोलावून घेतलं. त्यांच्याशी छानपैकी गप्पा मारल्या, तेव्हा ‘निमगाव’च्या ‘दादां’पासून ते ‘बारामती’च्या ‘दादां’पर्यंत म्हणे अनेकांना ‘अ‍ॅसिडिटी’चा त्रास झाला. जळजळणं अन् पोटात दुखणं, ही या आजाराची प्रमुख लक्षणं असतात. असो.‘थोरल्या काकां’च्या अनाकलनीय राजकारणाचा अनेकांना पुन्हा एकदा प्रत्यय आला. कैकजण बुचकळ्यात पडले. मात्र त्यांचं राजकारण जे अत्यंत जवळून ओळखतात, ते मात्र गालातल्या गालात हसले. ‘काकां’नी ‘दादां’ना जवळ बसविलं, याचा अर्थ ते लगेच त्यांना पक्षात घेऊन जवळ करतीलच असं नव्हे.बसायला खुर्चीही दिली, याचा अर्थ ते लगेच त्यांना सत्तेचीही खुर्ची देतील, असं नव्हे.केवळ ‘बारामती’च्या ‘धाकट्या दादां’ना मुद्दामहून ‘हिंट’ देण्यासाठी त्यांनी ‘अकलूजकरां’ना चुचकारलं, एवढं न समजण्याइतपत राजकीय तज्ज्ञ नसावेत खुळे.. कारण तिकडचा डाव वरचढ ठरू लागला की इकडचा डाव ते हळूच सावरतात. लगाव बत्ती...

काकां’ची स्ट्रॅटेजी बदलली.. 

खरंतर, विधानसभा निवडणुकीत ‘घड्याळा’शी गद्दारी करणा-यांना बघून घेईन, अशी भीष्मप्रतिज्ञा ‘थोरल्या काकां’नी याच सोलापुरात केलेली. मात्र निकालानंतर एका रात्रीत ‘अजितदादां’नी ‘देवेंद्रपंतां’सोबत जो धक्कादायक चमत्कार दाखविला.. त्यानंतर ‘काकां’नी आपल्या सा-याच नव्या-जुन्या सहका-यांसोबतची स्ट्रॅटेजी तत्काळ बदललेली. ‘भविष्यातही धोका होऊ शकतो, तेव्हा नवीन दुश्मन वाढविण्यापेक्षा जुने सरदार पुन्हा एकदा आपल्यासोबत राहिले पाहिजेत,’ यावर त्यांनी भर दिला. त्याचाच एक भाग म्हणजे सांगोल्याच्या ‘दीपकआबां’ना पुन्हा अ‍ॅक्टिव्ह करणं अन् अकलूजच्या ‘विजयदादां’ना जवळ बसवून घेणं. लगाव बत्ती...

अकलूजची भेळ !

‘अजूनही माझ्या हातात घड्याळच’ असं पुण्यात सांगणा-या ‘विजयदादां’ना ‘चाकण’च्या ‘रूपाली’तार्इंनी भेळेची आठवण करून दिलेली. ‘जिकडं भेळ, तिकडं अकलूजकरांचा खेळ’ अशी टीका ‘तार्इं’नी केली. त्यामुळं ‘दादां’चे समर्थक खवळले. त्यांनी खास अकलूजची भेळ खायला अन् लावणीही पाहायला ‘तार्इं’ना निमंत्रण दिलंय. आता हा राजकीय वाद अजून किती रंगेल माहीत नाही. मात्र अकलूजचे ‘रामभाऊ भेळवाले’ भलतेच खुश झालेत रावऽऽ गल्ला वाढणार म्हणून.. लगाव बत्ती...

हृदयात ‘बारामतीकर’......काळजात कालवाकालव !

निवडणुकीच्या तोंडावर जी-जी मंडळी ‘घड्याळाचे काटे’ उलटे फिरवून सत्तेतल्या ‘कमळ-बाणा’कडं धावली, त्यांचं म्हणे ‘बारामतीकरां’वर आजही नितांत प्रेम. पाठीत खंजीर खुपसतानाही यांच्या हृदयात म्हणे केवळ ‘थोरले काका’च. ‘दिलीपराव बार्शीकरां’नी तर काळीज चिरून दाखविण्याचंच बाकी ठेवलेलं. भलेही ‘धाकटे दादा अकलूजकरां’चं थेट ‘देवेंद्रपंतां’शी मोबाईलवर चॅटिंग चालत असेल; मात्र त्यांच्या बंगल्यात आजही फोटो ‘थोरल्या काकां’चाच. निवडणुकीपूर्वी फेसबुकवर रोज ‘धनुष्यबाण’ झळकविणारे ‘सोपलांचे आर्यन’ करताहेत आता ‘रोहितदादा बारामतीकरां’चा व्हिडिओ व्हायरल.आता या सा-या मंडळींचं ‘काकां’वरचं एवढं प्रेम उतू जात असेल, तर निवडणुकीत ही निष्ठा कुठं कडमडायला गेली होती, असा बाळबोध प्रश्न कार्यकर्त्यांसमोर ‘आ’ वासून उभा ठाकलेला. खरंतर, सत्तेची चटक लागलेल्यांसाठी ती अपरिहार्य तडजोड होती. मात्र एवढा मोठा विश्वासघात करूनही सत्तेबाहेरच राहण्याची वेळ आल्यानं या सा-यांच्या काळजात आता भलतीच कालवाकालव सुरू झालेली. लगाव बत्ती...

निष्ठा गेली चुलीत !

‘आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्यासोबतच आयुष्यभर प्रामाणिक रहावं,’ अशी अपेक्षा करणारे नेते स्वत:ची ‘पक्षनिष्ठा’ मात्र घरातल्या खुंटीला टांगून ठेवतात, हा सोलापूर जिल्ह्याचा इतिहास. ‘सांगोल्याच्या गणपतरावां’सारखे बोटांवर मोजण्याइतके नेते सोडले तर बाकीच्यांच्या दिवाणखान्यात कैक पक्षांची चिन्हं ढिगानं सापडतील.    सध्याच्या झेडपी अध्यक्ष निवडणुकीतही हीच ‘निष्ठाबाई’ आपल्या फाटक्या पदरानिशी नेत्यांच्या घरांचे उंबरठे झिजवत दारोदार फिरू लागलीय. आपापल्या पक्षाची ‘धोरणं बाजूला’ ठेवून प्रत्येक जण स्वत:च्या गटाचाच फायदा पाहू लागलाय. त्यामुळं कुणाचाच कुणावर विश्वास नसल्याचं चित्र दिसू लागलंय. मात्र ‘थोरले काका बारामतीकर’ कोणती प्यादी पुढं सरकवतात, यावर सारी खेळी अवलंबून. लगाव बत्ती...

( लेखक 'सोलापूर आवृत्ती'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरSharad Pawarशरद पवारVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद