शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात सरपंचाला अपात्र ठरविण्यामागचे राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 21:26 IST

नेत्रावळी हा गोव्याच्या दक्षिण हद्दीवरील सुंदर, हिरवा गाव.

- राजू नायकनेत्रावळी हा गोव्याच्या दक्षिण हद्दीवरील सुंदर, हिरवा गाव. गोव्यातील एकमेव गाव जेथे दमट हवामान नाही, निसर्गाच्या कुशीत असल्याने तापमान कमी आहे आणि तेथे स्ट्रॉबेरी पिकविण्याचाही यशस्वी प्रयोग चालतो. हा गाव प्रकाशात येण्याचे कारण म्हणजे पंचायत संचालनालयाने तेथील सरपंच व उपसरपंचांना अपात्र घोषित केलेय. आरोप आहे त्यांनी प्रवेश कर लागू केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मते बाहेरचे पर्यटक गावात येतात व व्यवस्थेवर बोजा निर्माण करतात. त्या वेळी प्रवेश कर गोळा करून स्वच्छतेवर तो खर्च केला जाणार होता.हा प्रस्ताव योग्य असाच आहे. जगभर अशा प्रकारचे कर पर्यटकांकडून घेतले जातात. महाराष्ट्रातील शिरोडा किना-यावर जाण्यासाठी प्रवेश कर गोळा केला जातो. गोव्यात तसा कर कुठेही नाही. त्यामुळे किना-यांवरची सफाई हा पंचायतींसमोर मोठाच प्रश्न असून उच्च न्यायालयाने सतत तंबी देऊनही ते स्वच्छता राखू शकलेले नाहीत. त्यादृष्टीने नेत्रावळी गावाने योग्य पावले उचलली होती. मात्र, स्थानिक आमदार प्रसाद गावकर यांच्या मते पंचायतीचा हेतू चांगला होता; परंतु त्यांनी योग्य पद्धतीचा अवलंब केला नाही. त्यांनी पंचायत संचालनालयाची रीतसर मान्यता घेतली नाही व भाजपा नेत्यांशी वितुष्ट निर्माण केले.सूत्रांच्या मते, एका स्थानिक व्यक्तीने भाजपा नेत्याला धक्काबुक्की केली होती. हा नेता एका उच्चपदस्थाचा नातेवाईक निघाला. त्यामुळे एका बाजूला व्यवस्थेला बगल देण्याचा प्रयत्न व दुस-या बाजूला सत्तेचा कोप. या कात्रीत पंचायतीतील नेते मंडळी सापडली. वास्तविक गावच्या सरपंच रजनी गावकर या भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्या. परंतु, सरकारची त्यांच्यावर वक्रदृष्टी झाली आणि पंचायत संचालनालयाने सरपंच व उपसरपंचांवर पुढची पाच वर्षे निवडणूक लढविण्यावर बंदी लागू केली आहे.नेत्रावळीसाठी ज्या वेगाने निर्णय झाला तसाच कडक निर्णय वेळ्ळी पंचायतीबाबत होईल काय, हा सध्या गोव्यात चर्चेचा विषय आहे. कारण, वेळ्ळी पंचायतीने मासळीच्या ट्रकांना पार्किंग कर लागू केला. दिवसाला या ट्रकांकडून त्यांना ३० हजार रुपये शुल्क प्राप्त होत असता या पंचायतीने एका कंत्राटदाराला महिन्याचे पार्किग कॉण्ट्रॅक्ट केवळ ६० हजार रुपयांना दिले. त्याबाबत पंचायत संचालनालय चौकशी करीत आहे. परंतु, जसा घाईने निर्णय नेत्रावळीबाबत झाला तसा वेग काही वेळ्ळीबाबत दिसत नाही.गावातील पर्यावरण व्यवस्थित राखून पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अभिनव व कल्पक पर्याय शोधू पाहाणा-या ग्रामीण नेतृत्वाला हा जबर धक्का आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गैरव्यवहार आणि बेफिकिरी यांचा सुळसुळाट झाला आहे. आणि सरकारी हस्तक्षेपामुळे स्थानिक स्वराज्य संस्था संपूर्णत: ढेपाळल्या आहेत.(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत)

टॅग्स :goaगोवा