शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: पाकच्या पंतप्रधानांना कर्ज मागताना वाटते लाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 11:50 IST

पाकिस्तानच्या तिजोरीतला ठणठणपाळ आणि त्यासाठी दारोदारी भीक मागण्याची त्यांची सवय आता कायमचीच झाली आहे. इतकं की त्यावर खुद्द त्या देशाच्या पंतप्रधानांनीच जाहीर कबुली देताना कर्ज मागायची आता फार लाज वाटते, असं म्हटलं आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ राजधानी इस्लामाबादमध्ये व्यावसायिकांना मार्गदर्शन करत होते. तेव्हा त्यांनी स्पष्टच सांगितलं, ‘देशाची परिस्थिती आता इतकी डबघाईला आलेली आहे की आम्हाला सतत वेगवेगळ्या देशांकडे पैसे मागायला जावं लागतं. तुम्हाला सांगतो, जेव्हा फील्ड मार्शल आसिम मुनीर आणि मी जगभर पैसे मागायला जातो, तेव्हा आम्हाला लाज वाटते! पैसे मागताना या देशांसमोर आमची मान झुकलेली असते, अतिशय अपमानजनक वाटत असतं आणि बऱ्याचदा त्यांच्या अटी मानणं ही आमची मजबुरी असते. त्यांच्या अटींना आम्हाला ‘नाही’सुद्धा म्हणता येत नाही. सातत्यानं कर्ज घेणं हे आमच्या आत्मसन्मानावर मोठं ओझं आहे. सतत दुसऱ्या देशांसमोर हात पसरण्यापेक्षा पाकिस्तानला आता दुसरे मार्ग शोधण्याची नितांत गरज आहे.

मार्च २०२५पर्यंत पाकिस्तानवरचं एकूण सरकारी कर्ज ७६,००० अब्ज रुपयांपेक्षा जास्त झालं होतं. कर्ज फेडण्यासाठी आणि डिफॉल्ट टाळण्यासाठी पाकिस्तानला वारंवार आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, चीन आणि इतर देशांकडे हात पसरवावा लागतोय. चीनही या संधीचं सोनं करून घेताना आपलं उखळ पांढरं करून घेतोय. चीननं पाकिस्तानला दिलासा देण्यासाठी त्यांची कर्ज फेडण्याची मुदत वाढवलीय. २०२४-२५मध्ये ही मदत सुमारे ४ अब्ज डॉलरची असल्याचं मानलं जातंय. याशिवाय चीननं पाकिस्तानमध्ये वीज प्रकल्प, रस्ते, बंदरं आणि इतर पायाभूत सुविधांमध्ये ६० अब्ज डॉलरहून अधिक गुंतवणूक केली आहे.

सौदी अरेबियानं डिसेंबर २०२४मध्ये पाकिस्तानच्या सेंट्रल बँकेत ३ अब्ज डॉलर जमा केले. त्यानंतर २०२५मध्ये पाकिस्तानला सुमारे १.२ अब्ज डॉलरचं तेल उधार देण्यात आलं, जेणेकरून तात्काळ पेमेंटचा ताण येऊ नये. सौदी अरेबियानं खाणकाम, शेती आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ५ ते २५ अब्ज डॉलरपर्यंत गुंतवणुकीचे संकेत दिले आहेत.

संयुक्त अरब अमिरातीनं २०२५च्या सुरुवातीला पाकिस्तानचं २ अब्ज डॉलरचं कर्ज फेडण्याची मुदत पुढं ढकलली होती. तसंच वीज, बंदर संचालन आणि सांडपाणी स्वच्छतेच्या प्रकल्पांमध्ये १० ते २५ अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याचं आश्वासन दिलं आहे. कतारनं पाकिस्तानमध्ये ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक प्रत्यक्षात उतरवण्यासाठी करार केलाय. ही गुंतवणूक विमानवाहतूक, शेती आणि पर्यटन क्षेत्रात होणार आहे. कतार हा पाकिस्तानला गॅस पुरवणारा एक मोठा देश आहे. या सगळ्या देशांपुढे झोळी पसरल्यामुळे आणि त्यांच्या मदतीमुळेच सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था कशीबशी चालतेय. 

भरीस भर म्हणून पाकिस्तानमध्ये गरिबी वाढून लोकसंख्येच्या सुमारे ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचलीय. महागाई, पूर आणि आर्थिक अस्थिरता ही त्यामागची कारणं आहेत. बेरोजगारीचा दर ७.१ टक्क्यांपर्यंत गेलाय. ८० लाखांहून अधिक लोक बेरोजगार आहेत. २०१८ मध्ये जिथे २१.९ टक्के लोक गरिबीरेषेखाली होते, तो आकडा आता ४५ टक्क्यांपर्यंत गेला आहे. अतिगरिबी ४.९ टक्क्यांवरून वाढून १६.५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. अर्थातच अशा परिस्थितीत पाकिस्तानला कटोरा घेऊन फिरण्याशिवाय पर्यायही उरलेला नाही !

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistani PM Feels Ashamed While Asking for Loans: Report

Web Summary : Pakistan's PM admits shame in seeking loans amid economic crisis. Reliance on China, Saudi Arabia, UAE, and Qatar props up the struggling economy. Poverty surges, affecting 45% of the population, leaving the nation with few alternatives.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानInternationalआंतरराष्ट्रीय