शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

भाजप ‘नट-बोल्ट’ टाइट करण्याच्या तयारीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2023 09:19 IST

अंतर्गत कुरबुरींमुळे भाजपच्या गोटात सध्या काळजी दिसते. पक्षश्रेष्ठी आतापासूनच २०२४च्या लोकसभा निवडणुकीवर ‘नजर’ ठेवून आहेत!

- हरीष गुप्ता

विधानसभा निवडणूक होत असलेल्या पाचपैकी चार राज्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी एकामागून एक प्रचारसभा घेत आहेत. या घाईगडबडीत २०२४ साली होत असलेल्या लोकसभा निवडणुकीवरही त्यांनी नजर ठेवली आहे. निवडणुका होत नसलेल्या राज्यातही आदिवासी आणि इतर घटकांची मते मिळविण्यासाठी मोदी आतापासूनच जात आहेत. 

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई अचानक थंडावल्याने राजकीय विश्लेषक बुचकळ्यात पडले आहेत. ईडीने काढलेल्या अनेक समन्सविरुद्ध सोरेन यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नसताना हे घडत आहे. वास्तवात सोरेन यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, तरीही ईडीने शांत राहण्याचे ठरवलेले दिसते. गेल्या काही आठवड्यांपासून या प्रकरणाविषयी भाजपाचे नेतृत्वही सोरेन यांच्याविरुद्ध पूर्वीप्रमाणे तिखट भाषेत बोलत नाही. माजी मुख्यमंत्री आणि  सोरेन यांचे कट्टर प्रतिस्पर्धी रघुवर दास यांना ओडिशात राज्यपाल म्हणून पाठवण्यात आले आहे. झारखंडमध्ये काही वेगळे तर शिजत नाही?

महाराष्ट्रात २०२४ साली मागच्या लोकसभेसारखी कामगिरी करता येईल की नाही याविषयी साशंकता असल्यामुळे अलीकडे सत्तापालट घडवून आणण्यात आला; तो याच डावपेचांचा भाग होता. कर्नाटकातही भाजपकडून काँग्रेसकडे सत्ता गेल्यामुळे अशाच प्रकारचा बेत आखण्यात आला असल्याचे कळते. जनता दल एसचे नेते एच डी देवेगौडा यांच्याशी भाजपाने हातमिळवणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत २८ जागा जिंकता याव्यात यासाठी हा खटाटोप आहे. अर्थात माजी केंद्रीय मंत्री खासदार डी व्ही सदानंद गौडा यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा त्यापाठोपाठ केली ही गोष्ट अलाहिदा. देवेगौडा ज्या वोक्कलिंग समाजाचे आहेत त्याच समाजातून सदानंद गौडा हेही येतात. तसे त्यांचे वय पंचाहत्तरपेक्षा पुष्कळच कमी आहे, तरीही त्यांनी राजकारणापासून बाजूला व्हावयाचे ठरवले. याचा अर्थ लोकसभेत २५ जागा जिंकून २०१९ ची कामगिरी पुन्हा करून दाखवता यावी यासाठी पक्षाने माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्यावर भिस्त ठेवली आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर कर्नाटकातील काँग्रेस सरकार खिळखिळे करण्याची योजना असल्याची चर्चाही सध्या कानी येते.

मध्य प्रदेशात भाजप विरुद्ध भाजप

मध्य प्रदेशात भाजपचे नेतृत्व काँग्रेसविरुद्ध लढत असेल असे आपण गृहीत धराल, तर आश्चर्याचा धक्का बसू शकतो. नरेंद्र सिंह तोमर, फग्गनसिंह कुलस्ते, राकेश सिंह आणि प्रल्हाद पटेल यांच्यासारख्या चार प्रमुख केंद्रीय नेत्यांना रिंगणात उतरविण्याच्या भाजपच्या खेळीचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्यातील कुरबुरी सातत्याने ‘बातम्यांमध्ये दिसत’ असल्या, तरीही भाजपमधील परस्परविरोधी गटही आपल्याच काही प्रमुख नेत्यांच्या पराभवासाठी पडद्याआडून क्रियाशील आहेत. शिवराज सिंह चौहान यांच्याविरुद्ध तीव्र नाराजीचे वातावरण आहे. भाजप सत्तेवर आल्यास चौहान यांच्या जागी प्रल्हाद पटेल मुख्यमंत्री होतील, अशी कुजबुज सध्या ऐकू येते. 

सत्तारूढ पक्षाकडे सध्या ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स  यांच्यासारखे शस्त्र भांडार असताना कोणी काँग्रेस नेता बनावट व्हिडीओंचा कारखाना चालवू शकेल, हे तसे अशक्यच! मात्र, तोमर यांच्या पुत्रासंबंधी काही व्हिडीओ पसरवले गेले! हाही भाजपमधल्या अंतर्गत कुरबुरींचा परिणाम असू शकतो. असे तब्बल तीन व्हिडीओ समोर आल्यामुळे भाजपला  धक्काच बसला आहे. कमलनाथ यांचे सरकार पाडायला मदत करणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सर्व उमेदवारांचा पराभव कसा होईल याचा आटोकाट प्रयत्न काँग्रेस करत आहे हे लपून राहिलेले नाही. भाजपाचे काही नेते गुपचूप काँग्रेसला या कामात मदत करत आहेत. 

राहुल यांची गुडघेदुखी‘भारत जोडो यात्रे’च्या पहिल्या टप्प्याने राहुल गांधी यांना व्यक्तिगत पातळीवर आणि राजकीयदृष्ट्याही चांगलाच लाभ झाला. आता ते ‘भारत जोडो यात्रे’चा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी आतुर आहेत;  पण पहिल्या टप्प्यात त्यांना गुडघेदुखीचा त्रास झाल्यामुळे दुसऱ्या यात्रेची घोषणा लांबणीवर टाकली जात होती. २१ जुलैला राहुल यांना कोट्टाकल आर्य वैद्य शाळेत दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर आठवडाभर उपचार झाले. आता यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असले तरी यावेळी राहुल गांधी  पदयात्रा करताना फारसे दिसणार नाहीत. कारण डॉक्टरांनी त्यांना ‘काँक्रीटच्या रस्त्यांवरून चालणे टाळा’ असा सल्ला दिलेला आहे. त्यांची गुडघेदुखी अद्याप म्हणावी तशी आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात वाहन वापरावे, तासाभरापेक्षा जास्त चालू नये, असे ठरवण्यात आले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपा