शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

जीएसटी आयटीसी २0-२0 मॅच सावधगिरीने खेळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 05:30 IST

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, सरकारने ९ आॅक्टोबर २0१९ रोजी जारी केलेल्या नवीन परिपत्रकानुसार करदात्यास जीएसटीआर-२ ए मध्ये जेवढा ...

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, सरकारने ९ आॅक्टोबर २0१९ रोजी जारी केलेल्या नवीन परिपत्रकानुसार करदात्यास जीएसटीआर-२ ए मध्ये जेवढा आयटीसी दिसत आहे त्यापेक्षा जास्तीत जास्त २0 टक्के अधिक आयटीसी घेऊ शकतो, असा नवीन वादग्रस्त नियम आला आहे. तर हे काय आहे?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, जशी क्रिकेटमध्ये २0-२0 मॅच खेळली जाते तशी आता जीएसटी आयटीसी २0-२0 मॅच सुरू झाली आहे. प्राप्तकर्ता फलंदाज तर पुरवठादार गोलंदाज आहे आणि प्रत्येक महिन्याच्या रिटर्नला हा सामना खेळावा लागेल. या सामन्यात नक्कीच करदात्यांचा तोटा होणार आहे.सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार करदाता जीएसटीआर - २ ए मध्ये जेवढा आयटीसी दिसत आहे त्यापेक्षा जास्तीत जास्त २0 टक्के अधिक आयटीसी घेऊ शकतो. म्हणजे जेवढा आयटीसी जीएसटीआर-२ ए मध्ये दिसत आहे, त्याच्या २0 टक्के किंवा खातेपुस्तकातील आयटीसी या दोन्हीपेक्षा जे कमी आहे तेच आयटीसी क्रेडिट मिळेल. हे तर क्रिकेटच्या डकवर्थ लुईस नियमापेक्षाही अवघड आहे. या क्रिकेटमध्ये तिसरा पंच जीएसटीएन आहे आणि जीएसटीएनचा निर्णय अंतिम राहील.अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर-२ ए काय आहे?कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर-२ ए हा जीएसटीएन सिस्टम जनरेटेड अहवाल असून त्यात करदात्यांची खरेदी आणि त्यावरील आयटीसी क्रेडिटची माहिती मिळते. जेव्हा पुरवठादार म्हणजे फलंदाज जीएसटीआर-१ फाइल करतो त्याची माहिती प्राप्तकर्ता म्हणजे फलंदाजाच्या जीएसटीआर-२ एमध्ये दिसते. हे आपण एका उदाहरणासह समजून घेऊ. जर ‘अ’ने रु. २,५0,000 चा पुरवठा ‘ब’ ला केला, तर ‘अ’ पुरवठादार असल्यामुळे त्याला त्याची विक्री जीएसटीआर-१ मध्ये २,५0,000 दाखवावी लागेल. एकदा जर पुरवठादाराने ‘अ’ जीएसटीआर-१ फाइल केला तर तो व्यवहार ‘ब’च्या जीएसटीआर-२ ए मध्ये दिसतो. याचा अर्थ प्रत्येक खरेदी करणाऱ्याने आपले जीएसटीआर-२ ए तपासावे, पूर्वीप्रमाणे आता आयटीसी क्रेडिट मिळण्यास त्रास होणार आहे.अर्जुन : कृष्णा, यात पुरवठादाराची भूमिका आणि जबाबदारी काय आहे?कृष्ण : अर्जुना, नवीन नोटिफिकेशननुसार पुरवठादाराला जीएसटीआर-१ देय तारखेच्या आत फाइल करावेच लागेल. जेणेकरून त्यानंतरच्या जीएसटीआर-३ बीमध्ये आयटीसी घेऊ शकेल. जसे वाइड बॉल टाकल्यास फलंदाजाला खेळावयास त्रास होतो तसेच आता खरेदीदारास विक्री करणाºयाने जीएसटीआर-१ फाइल न केल्यास होणार आहे.अर्जुन : कृष्णा, प्राप्तकर्त्याच्या भूमिका आणि जबाबदारीत नव्या परिस्थितीत काय बदल आहे?कृष्ण : अर्जुना, प्राप्तकर्त्यास जीएसटीआर-२ ए आणि खरेदी पुस्तकाचे नियमन करावे लागेल.- प्राप्तकर्त्यास पुरवठादाराकडे नियमित पाठपुरावा करावा लागेल. जेणेकरून पुरवठादार त्याचा जीएसटीआर-१ देय तारखेच्या आत दाखल करेल आणि प्रत्येक इनव्हाइस अपलोड होईल.अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी यातून काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, आता करदात्यास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल. करदात्यास कधी व कसे आयटीसी काढावे हा मोठा प्रश्न पडणार आहे. जसे इनव्हाइस, पुरवठादार आणि रिटर्ननुसार. मिसमॅचचे क्रेडिट कसे पुढे मिळेल व त्यावरील व्याज इत्यादी ज्वलंत व किचकट प्रश्नांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. अशा अनेक जाचक नियमांमुळे जीएसटी सोपे होण्यापेक्षा खूपच अवघड झाले आहे.

- उमेश शर्मा । सीए