शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

प्लास्टिकमुक्तीसाठीचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:33 IST

कोल्हापूरकरांनी एकदा ठरवले की ते करून दाखविणारच, अशी त्यांची ख्याती आहे. आज कोल्हापूरचे नाव अनेक क्षेत्रात आघाडीवर आहे. त्यात भर टाकण्यासाठी कोल्हापूरकरांनी आता चंग बांधला आहे तो शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा.

कोल्हापूरकरांनी एकदा ठरवले की ते करून दाखविणारच, अशी त्यांची ख्याती आहे. आज कोल्हापूरचे नाव अनेक क्षेत्रात आघाडीवर आहे. त्यात भर टाकण्यासाठी कोल्हापूरकरांनी आता चंग बांधला आहे तो शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा. त्यादिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली आहे.कोल्हापुरी जगात भारी, असा एक वाक्प्रचार बोलीभाषेतून पुढे आला आहे. त्यामध्ये कोल्हापुरी किंवा कोल्हापूरकर असण्याचा एक स्व-अभिमान आहे. त्याचवेळी काहीतरी वेगळे, विधायक करण्याची प्रेरणाही आहे. त्यानुसार सर्वच पातळीवर वेगळा ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला जातो. कोल्हापुरातील क्लीन अ‍ॅण्ड ग्रीन सिटी मुव्हमेंट या संस्थेनेही असाच जगात भारी काहीतरी करून दाखविण्याचा विडा उचलला आहे.परवा रविवारच्या आठवडी बाजारात या संस्थेने २० हजार कापडी पिशव्या भाजीपाला, फळे खरेदी करण्यासाठी आलेल्यांना मोफत वाटल्या. शहराला प्लास्टिकमुक्तीच्या दिशेने नेणारे हे आणखी एक पाऊल होते. गेल्या नवरात्रोत्सवावेळी ऐतिहासिक भवानी मंडपात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांसाठीसुद्धा अशीच एक मोहीम राबविण्यात आली होती. छत्रपती घराण्याच्या मोठ्या सूनबाई संयोगिताराजे यांनी पुढाकार घेऊन मंदिर परिसरातील फळे, फुले, नारळ, कापूर, उदबत्ती, आदी विक्री करणाºयांना एकत्र करून बैठक घेतली. प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी कापडी पिशव्याच विक्रीसाठी ठेवाव्यात आणि पाच रुपये प्रती पिशवी या दराने त्या विकाव्यात असा निर्णय या बैठकीत करण्यात आला. त्याला सर्वांनी प्रतिसाद दिला. भवानी मंडप प्लास्टिकमुक्त झाला. आता कोल्हापुरातील सर्व भाजीपाला बाजारपेठांत ही मोहीम क्लीन अ‍ॅण्ड ग्रीन सिटी मुव्हमेंटमार्फत राबविण्यात येत आहे.आपल्याकडे एखादी मोहीम राबविण्याची संकल्पना पटली की, ती यशस्वी करणे अशक्य नाही. कारण मनुष्यबळ भरपूर आहे. तसेच देवाण-घेवाण मोठी असते. जुन्या कपड्यांपासून पिशव्या तयार करण्याचा व्यवसाय अनेकांना रोजगार देऊन जाऊ शकतो. घनकचरा व्यवस्थापनात प्लास्टिकच्या पिशव्या आणि वस्तूंचा फार मोठा अडथळा आहे. ते प्लास्टिक नष्ट करण्याची सोपी पद्धत नाही. शिवाय ते ओल्या कचºयाबरोबर एकत्र आले तर ते वेगळे करणे कठीण असते. पुण्यात १४०० ते १६०० टन दररोज घनकचरा तयार होतो. सोलापुरात ६०० तर सांगली, कोल्हापुरात प्रत्येकी २०० टन घनकचरा प्रतिदिन तयार होतो.या घनकचºयाचे वर्गीकरण घरा-घरांपासून होत नाही. त्यातील प्लास्टिक हा सर्वात मोठा अडसर आहे. नागरिकांनीच प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचा निर्धार केला, तर घनकचºयाचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांनी प्लास्टिकमुक्तीसाठी उचललेले पाऊल फार महत्त्वाचे ठरणार आहे. सर्व शहरातील सामाजिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा. त्याला नागरिक, व्यापारी, व्यावसायिकांनीही साथ दिली तर अशक्य काही नाही.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी