शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

खिलाडूवृत्तीमुळे व्यक्तिमत्त्वाला मिळतो आकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 4:28 AM

क्रीडाप्रकारात चपळाईच्या जोडीला साहसी वृत्ती आणि समयसूचकतेला महत्त्व असते.

-सुनील वालावलकरक्रीडाप्रकारात चपळाईच्या जोडीला साहसी वृत्ती आणि समयसूचकतेला महत्त्व असते. परंतु त्याहुनी प्रभावी कौशल्य म्हणजे खिलाडूवृत्ती. खेळाडूंनी प्रतिस्पर्धीविषयी निकोप भावना ठेवून जर स्पर्धेत भाग घेतला, तर त्या खेळाडूंची कामगिरी सरस ठरण्याची शक्यता अधिक असते.मैदानी खेळात भाग घेतल्यामुळे शरीराला फायदा होतो, हे लहानपणापासून आपल्या सर्वांना माहीत असतेच आणि प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार कुठल्या ना कुठल्या क्रीडा प्रकारात सहभागी झालेला असतोच. वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या जबाबदाºयांमुळे प्रौढ व्यक्तींचा खेळांशी प्रत्यक्ष संबंध दुरावतो. परिणामी अनेक शारीरिक अडचणींचा सामना करण्याची वेळ चाळिशीपुढील प्रत्येकावर येत असते. तंदुरुस्तीसाठी खेळांचा जसा फायदा होतो, त्याचप्रमाणे खेळातून निर्माण होणाºया खिलाडूवृत्तीमुळे व्यक्तिमत्त्वाला आकार मिळत असतो.दैनंदिन जीवनात घडणारी प्रत्येक लहानमोठी घटना, प्रत्यक्ष घडण्याआधी क्रीडांगणात खेळाच्या माध्यमातून अनुभवता येते. त्यामुळे खेळांच्या मैदानाला जीवनाची प्रयोगशाळा मानली जाते. वास्तव जगातील आव्हानांना तोंड देताना मैदानातील क्रीडा कौशल्याची मदत घेतल्यास तणावांवर मात करणे सुलभ होते, असा सार्वत्रिक अनुभव आहे. सर्व प्रकारच्या क्रीडाप्रकारांत चपळाईच्या जोडीला साहसी वृत्ती आणि समयसूचकतेला खूप महत्त्व असते. परंतु त्याहुनी अधिक प्रभावी कौशल्य म्हणजे खिलाडूवृत्ती. खेळताना खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्याविषयी निकोप भावना ठेवून जर का स्पर्धेत भाग घेतला, तर त्या खेळाडूंची कामगिरी सरस ठरण्याची शक्यता अधिक असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकर. सचिनला जी जगतमान्यता लाभली, ती त्याच्याजवळ असलेल्या अमर्याद खिलाडूवृत्तीमुळे. याविषयी कोणाचे दुमत होणार नाही. स्वत:च्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक वेळा सचिनने खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करून सर्वांची मने जिंकली आहेत.खिलाडूवृत्ती असलेल्या खेळाडूला स्पर्धा जिंकायची ईर्षा नसते, तर निव्वळ खेळायची संधी मिळली याविषयी तो जास्त रोमांचित असतो. त्याच वृत्तीमुळे त्याच्याकडून सरस कामगिरी घडत असते. हल्ली सर्वत्र स्पर्धेचे वातावरण आहे. क्रीडांगणापासून वॉर्डरूमपर्यंत आणि शाळा-कॉलेजपासून ते लोकसभेपर्यंत प्रत्येक जण शर्यतीत भाग घेतल्याप्रमाणे कसून सराव करत असतो. परंतु फारच थोडे जण यशस्वी होताना दिसतात, याचे कारण म्हणजे खिलाडूवृत्तीचा अभाव.ज्या व्यक्तीकडे खिलाडूवृत्तीची कमतरता असते, ती व्यक्ती स्पर्धेत मागे पडते. याउलट उपलब्ध संधींविषयी कृतज्ञता बाळगून प्रयत्न केलेल्या व्यक्तीची कामगिरी लक्षवेधक ठरते. खिलाडूवृत्तीची जोपासना करण्यासाठी कुठलाही प्रमाणित अभ्यासक्रम उपलब्ध नाही. आपल्या आवडीच्या व्यक्तींच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचा अभ्यास केल्यास त्यातून खिलाडूवृत्ती कशी रुजवता येते याविषयी मार्गदर्शन मिळू शकते.(लेखक क्रीडा संघटक आहेत.)