शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वेध - ग्रंथमंदिरातील सभ्यता खुंटीवर !

By admin | Updated: April 1, 2017 00:28 IST

नाशिकच्या साहित्यिक व सांस्कृतिक मिरासदारीचे अंगण असलेल्या सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक यंदा ज्या पद्धतीने लढली जाते आहे ते पाहता, ग्रंथप्रेमींनी चिंतित होणे अस्वाभाविक ठरू नये.

निवडणुकांचे राजकारण समाजमनाला असे काही व्यापून राहते की, त्याचा प्रभाव अगर परिणाम सहजासहजी सरत नाही. त्यामुळे निवडणूक म्हटली की, ती कोणतीही व कुणाचीही असो, त्यात राजकारण डोकावल्याखेरीज राहत नाही; साहित्य प्रांतही त्याला अपवाद ठरू नये. संपन्न व समृद्धतेचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तसेच विमादी पटवर्र्धन, अ.वा. वर्टी, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर व प्रा. वसंत कानेटकरांसारख्या दिग्गजांनी नेतृत्व केलेल्या सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या होत असलेल्या निवडणुकीकडेही याच संदर्भाने पाहता यावे.नाशिकच्या साहित्य सांस्कृतिकविश्वात मानाचा शिरपेच धारण करून असणाऱ्या व शतकोतरी अमृतमहोत्सवी वाटचालीचा टप्पा पार केलेल्या सार्वजनिक वाचनालयाची (सावाना) यंदाची निवडणूक खुद्द या संस्थेच्या सभासदांनाच नव्हे तर समस्त पुस्तकपे्रमींना व्यथित करणारी ठरली आहे, कारण राजकीय व सहकारी संस्थांसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये जे जे काही होते ते ते सारे यात होताना दिसत आहे. विविध पॅनल्सच्या माध्यमातून म्हणायला साहित्य व सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती उमेदवारी करीत असल्या तरी प्रचारात राजकारणाप्रमाणे जाहीरपणे एकमेकांचे वाभाडे काढण्यापासून ते मंगल कार्यालयात भोजनावळी उठवण्यापर्यंत सारे सुरू आहे. सभासदसंख्या अवघी ३६००, पण चौकाचौकांतील प्रचाराची होर्डिंगबाजी व पत्रकबाजी अशी की एखाद्या सहकारी साखर कारखान्याची निवडणूक भासावी. पातळी सोडून सुरू असलेला प्रचार, त्यात डोकावणारे जातीयवादाचे रंग यामुळे या निवडणुकीतील सभ्यताच खुंटीवर टांगली जाते आहे, पण साहित्य शारदेच्या मंदिरात जाऊ पाहणारे त्याचे भान राखताना दिसू नये हे दुर्दैवी आहे.मुळात ‘सावाना’तील राजकारणाचा चंचूप्रवेश दशकभरापूर्वीच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त होऊन गेला होता. संस्थेतील तत्कालीन धुरिणांनी एका राजकीय नेत्याच्या हस्तक्षेपातून काही जणांना सोबत घेऊन निवडणूक लढली होती. तत्पूर्वी राजकारणात असलेल्या काही व्यक्ती या संस्थेत होत्या, नाही असे नाही. पण त्यांनी राजकारण संस्थेत आणले नव्हते. त्यामुळे निवडणुका झाल्या, परंतु त्यात पातळी सोडली गेली नव्हती. निवडणुका संपताच सारे एकदिलाने साहित्यसेवेत लागायचे. परिणामी वाद वैचारिक पातळीपर्यंत मर्यादित असायचा. गेल्या काही वर्षांत मात्र सत्तेच्या राजकारणातून वाद कोर्टापर्यंत गेलेत. माहिती अधिकाराचा वापर करून मिळविल्या गेलेल्या बाबींतून पदाधिकाऱ्यांची लक्तरे वेशीवर टांगण्याचे प्रयत्न झाले. हे सर्व होताना संस्थेच्या प्रतिमेला व प्रतिष्ठेलाही गालबोट लागत असल्याची फिकीर बाळगली गेली नाही. खरे तर अतिशय देदीप्यमान वारसा लाभलेली ही संस्था अलीकडे कात टाकून उभी राहिलेली दिसत असतानाच सूडबुद्धीच्या राजकारणाने वेग घेतला. यातून या साहित्य मंदिराचे रूपांतर जणू आखाड्यात होत गेले, ज्यांचे प्रत्यंतर आज होत असलेल्या निवडणुकीत प्रकर्षाने येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, कारभारातील अनागोंदी पुढे आणण्याच्या सबबीखाली ‘सावाना’च्या प्रतिष्ठेची ऐशीतैशी करणारे घटक सत्ताधाऱ्यांचे हात हाती घेऊन निवडणुकीला सामोरे जाताना दिसत असल्याने सभासदांची उद्विग्नता वाढली आहे. तर पर्याय म्हणून पुढे आलेल्यातील काहींचा साहित्यविषयक आवाका संशोधनाचा भाग ठरावा, असा आहे. नगरपालिकेपासून वाचनालयापर्यंतच्या साऱ्या निवडणुकांत उमेदवारी करू पाहणारे काही ‘धरतीपकड’ व पुस्तकांशी फारसा संबंध न आलेल्यांमुळे निवडणूक गाजते आहे खरी, परंतु या निवडणूक प्रक्रियेला सुस्पष्ट आचारसंहिताही नसल्याने विविध आक्षेपांना व आरोप-प्रत्यारोपांना वाव मिळून जाणे स्वाभाविक ठरले आहे. त्यामुळे आता कसोटी सभासदांची आहे. अर्थात, ‘उडदा माजी काळे-गोरे, काय निवडावे बरे’ अशीच एकूण स्थिती असून, शहराचे साहित्यिक सांस्कृतिक वैभव मानली जाणारी संस्था ज्या वळणावर आणून उभी केली गेली ते वेदनादायीच आहे. - किरण अग्रवाल