शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

छायाचित्रांतले पर्रीकर लोकांना नकोत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 09:55 IST

केवळ दिखावा करून प्रशासन सुधारणार काय ?

- राजू नायकमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जरी एकापाठोपाठ अशा तीन बैठका घेऊन आपण सक्रिय असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न चालविला असला तरी प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमे यांच्यावर त्याचा बिलकुल परिणाम झालेला नाही. हा केवळ दिखावा आहे, तो करून प्रशासन सुधारणार काय, असा प्रश्न त्यांनी जाहीरपणे विचारला आहे. त्यामुळे पर्रीकरांची छापून येणारी छायाचित्रे जनमत बदलण्यास कारण ठरणार नाहीत, असाच एकूण माहौल आहे.पर्रीकरांनी गेल्या तीन दिवसांत सतत तीन बैठका घेतल्या. पहिली बैठक गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाबरोबर, दुसरी तीन महिने खोळंबलेली मंत्रिमंडळ बैठक व गुरुवारी भाजपाच्या गाभा समितीबरोबरची बैठक. भाजपा नेत्यांनाही ते सहा महिने भेटले नव्हते. निरीक्षक मानतात की पर्रीकरांची प्रकृती नाजूक असतानाही त्यांनी या बैठका घेण्याचा अट्टाहास केला, यामागे पक्षश्रेष्ठींचा तगादा असू शकतो. सध्या प्रसारमाध्यमांनी त्यांच्यावर टीकेचा भडिमार चालविला आहे. त्यांच्याकडे एकूण 26 खाती आहेत. ते खात्यांचा ताबा सोडत नाहीत, उपमुख्यमंत्री नेमत नाहीत व स्वत: तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामाही द्यायला तयार नाहीत. या काळात त्यांच्याच मंत्र्यांनी प्रशासन कोसळल्याची व अधिकारी मुजोर बनून ते कोणाचेच ऐकत नसल्याची टीका केली आहे.काँग्रेस पक्षाने अधिक आक्रमक होऊन 'बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला' अशी जाहीर भूमिका घेतल्यानंतर पर्रीकर यांचे छायाचित्र लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न झाला यात तथ्य आहे; परंतु छायाचित्रातील पर्रीकर अत्यंत मलूल, निष्प्रभ वाटतात. मंत्र्यांनी अपल्या बैठकीनंतर पर्रीकरांची वागणूक व प्रकृती चांगली असल्याचा निर्वाळा दिला असला तरी ते पर्रीकर हे नाहीत, असे लोक म्हणतात.

पर्रीकरांनी एकेकाळी कठोरपणे राज्यकारभार हाताळला. मंत्र्यांमध्ये शिस्त आणली, अर्थव्यवस्थेला दिशा दिली व राजकारणात नैतिकता निर्माण केली होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल धाक निर्माण झाला होता.दुर्दैवाने ते आजारी असतानाच्या गेल्या सात महिन्यांच्या काळात राज्यकारभार संपूर्णत: ढेपाळला असून हे सरकार बरखास्त करणे चांगले, या निर्णयावर जनता पोहोचली आहे. 'लोकमत'ने दोन दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यातील जनमताचा कानोसा घेतला असता लोकांनी पर्रीकरांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे व संपूर्णत: बरे होऊनच मुख्यमंत्रिपदी परत यावे, असे सुचविले आहे. भाजपालाही राज्यकारभार कोसळला आहे व या परिस्थितीत भाजपाला लोकांचा प्रचंड रोष सहन करावा लागणार आहे, याचा अंदाज आलेला आहे. तरीही गोव्यात बदल होत नाही, याबद्दल सारेच आश्चर्य व्यक्त करतात.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा