शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

लक्ष्मीची मनोभावे पूजा; पण अजूनही आशीर्वादाची प्रतीक्षा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 09:10 IST

देशात वेगवेगळ्या वेळी लक्ष्मीची पूजा केली जाते. पूर्व भागात नुकतीच ही पूजा झाली; पण देवी ‘प्रसन्न’ व्हावी यासाठी अजूनही ते आस लावून आहेत.

जवाहर सरकार, राज्यसभेचे खासदार तृणमूल काँग्रेस

त्रिपुरा, ओडिशा, आसाम आणि बंगाल या भारताच्या पूर्वेकडील भागात परवा लक्ष्मीची पूजा झाली. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात कोजागरी पौर्णिमेला हे लक्ष्मीपूजन होते. देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागात लक्ष्मीची पूजा थोडी उशिरा अमावास्येला केली जाते. दिवाळीतला तो दिवस असतो. दक्षिणेत नवरात्रीच्या तीन रात्री लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे. या एका भारत देशात वैविध्य आहे ते असे.महिषासुरमर्दिनीसाठी  उभारलेल्या ज्या मोठ्या मंडपात नुकतीच दुर्गापूजा, विजयादशमी साजरी झालेली असते, तेथेच लक्ष्मीचे पूजन होते. दिव्यांचा झगमगाट जल्लोष संपलेला असतो. त्यामुळे लक्ष्मी काहीशी एकटी, उदास, मोठ्या रंगमंचाच्या छोट्याशा भागात तिची छोटीशी मूर्ती बसलेली दिसते. पूर्व भागात लक्ष्मीची उपेक्षा होते काय? इकडे दारिद्र्यही आहे आणि आर्थिक वाढीची गती मंदच दिसते. मात्र पूर्वेकडचे लोक आणि बंगाली घरात तिची  यथासांग पूजा मांडतात. स्त्रियांनी रेखाटलेल्या पावलांनी लक्ष्मीला घरात प्रवेश करण्याचा मार्ग दाखवला जातो. लक्ष्मी प्रत्येक घराला रात्री भेट देते आणि ज्या खोलीत पावलं काढलेली असतील तेथे प्रवेश करते. म्हणून घरभर पावले काढली जातात. अगदी जिन्यांवरही.

तांदळाच्या पिठीपासून केलेले रंग वापरून फुलाफुलांची चित्रे काढण्याच्या या कलेला अल्पना कला म्हणतात. बंगाली स्त्रियांच्या दृष्टीने ही प्रथा शुभ मानली जाते. त्याचबरोबर त्यांच्या कलागुणांना ती वावही देते. अलीकडच्या काळात ही अल्पना कला रस्त्यावर प्रकटू लागली आहे. गुरुदेव टागोरांनी स्थापन केलेल्या विश्वभारतीच्या प्रांगणातही सणाच्या दिवशी ती प्रकटत असते. अलीकडे रस्त्यांवर मोठ्या आणि कल्पक अल्पना रांगोळ्या काढण्याची पद्धत पडली आहे. आधुनिक रंग आणि ब्रशचा वापरही केला जातो. प्राय: अल्पनातील रंग  पांढरे असतात, पण आता त्यात अन्य रंगही भरले जातात. बंगालमधली ही लक्ष्मी कमळावर आरूढ झालेली असून धनराशीचा कुंभ तिच्या मांडीवर आहे. देशाच्या इतर भागात उभी नसलेली दोन हत्ती स्नान घालत आहेत अशी लक्ष्मी दाखवली जाते तशी ही नाही. लक्ष्मी पूजेच्या दिवशी श्रीफळ ठेवलेला कलश किंवा घट घराच्या प्रवेशद्वारापाशी ठेवला जातो. लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी घरातील स्त्री-पुरुष सकाळी लवकर स्नान करतात.

पिकलेल्या भाताची साळ भरभराटीचे प्रतीक म्हणून पसरली जाते. पूर्वी लक्ष्मीचे स्तोत्र, लक्ष्मी पांचाली ऐकण्यासाठी परिवार घरातल्या आईजवळ येऊन बसत असे. आता हे चित्र फारसे दिसत नाही.बहुतेक ठिकाणी खीर करून ती चंद्रप्रकाशात ठेवली जाते. नंतर दुसऱ्या दिवशी ती प्रसाद म्हणून वाटून खाल्ली जाते. खास शाकाहारी खिचडी आणि अगदी साध्या भाज्या तसेच पाम शुगरपासून केलेला तालेर बोरा, गूळखोबऱ्याचे छोटे लाडू, भातापासून केलेली मिठाई (स्वीट मोआ) या दिवशी केली जाते. लक्ष्मीला फळांबरोबर या भाताचा नैवेद्य दाखवतात. नंतर तो ग्रहण करतात. पूर्वेकडे लक्ष्मीची मनोभावे पूजा होते, पण या देवतेने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.