शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकरांचा बाष्कळपणा

By admin | Updated: June 5, 2015 23:47 IST

फाट, बेफाम, बेलगाम, बाष्कळ, बालिश अशी कितीही विशेषणे लावली, तरी कमी पडतील, इतकी मुक्ताफळे मोदी सरकारातील मंत्री आणि भाजपा व संघाचे नेते गेले वर्षभर उधळत आहेत.

फाट, बेफाम, बेलगाम, बाष्कळ, बालिश अशी कितीही विशेषणे लावली, तरी कमी पडतील, इतकी मुक्ताफळे मोदी सरकारातील मंत्री आणि भाजपा व संघाचे नेते गेले वर्षभर उधळत आहेत. त्यात आता शहाणेसुरते म्हणून ओळखले जाणारे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भर पडली आहे. पण पर्रीकरांची आणि या नेत्याची वक्तव्ये व विधाने यांना एकच निकष लावता येणार नाही. याचे कारण म्हणजे पर्रीकर हे भारताचे संरक्षणमंत्री आहेत. भारत हा एक अण्वस्रधारी देश आहे. आजच्या २१व्या शतकातील जगात एक सामर्थ्यवान देश म्हणून भारताचा उदय होत आहे. सामर्थ्याला संयमाची जोड अत्यावश्यक असते. तशी ती नसली तर असे सामर्थ्य विघातक ठरू शकते. आंतरराष्ट्रीय राजकारणात गेल्या साडेसहा दशकांत एक संयमी व वस्तुनिष्ठ मर्यादांचे भान असलेला संवेदनशील लोकशाही देश म्हणून भारताची प्रतिमा उभी राहिली आहे. अनेकदा हा संयम म्हणजे पळपुटेपणा वा कमकुवतपणा असे मानले जात आले आहे. मात्र वेळ पडल्यास ‘वज्रादपि कठोरानि मृदुनि कुसुमाद्पि’ होऊनही भारताने दाखवले आहे. त्यामुळेच कोणताही मुद्दा वा समस्या असो, त्याबाबत भारताने घेतलेल्या भूमिकेकडे जग नेहमीच आदराने बघत आले आहे. भारताच्या या प्रतिमेवरच संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी पहिला ओरखडा ओढला, तो ‘काट्याने काटा काढण्याच्या पद्धतीने आम्ही दहशतवाद निपटण्यासाठी दहशतवादाचाही वापर करू’, असे जाहीरपणे मर्दुमकी गाजवायला निघण्याच्या आविर्भावात सांगून. वस्तुत: आपल्या परराष्ट्र धोरणाचा एक भाग म्हणून पाकिस्तान दहशतवादाचा वापर करीत असल्याचा भारताचा आरोप आहे. अमेरिकेत ९/११चा हल्ला झाल्यावर जगाने या आरोपाकडे गांभीर्याने बघायला सुरुवात केली आणि आज आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे मूळ पाकच्या या धोरणात आहे, याबाबत जवळ जवळ एकमत आहे. इतकी वर्षे भारताने घेतलेल्या संयमी, पण ठाम भूमिकेचा हा परिपाक आहे. मात्र पर्रीकर यांनी बेजबाबदारपणे केलेल्या विधानामुळे ‘भारत आमच्या देशात अस्थिरता माजवत आहे, असे आम्ही सांगत होतोच; आता भारताचे संरक्षणमंत्रीच कबुली देत आहेत’, अशी शेखी मिरविण्याची संधी पाकला मिळाली आहे. या संधीचा पाक पुरेपूर फायदा उठवत आहे. पाक पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अझीझ यांनी अमेरिकेत जाऊन या आरोपाचा पुनरुच्चार केला. एवढेच नव्हे, तर पाकमध्ये शिया-सुन्नी संघर्षापायी जो हिंसाचार चालू आहे, त्यास भारतच कारणीभूत आहे काय, असा संशयही व्यक्त करायला अझीझ यांनी कमी केलेले नाही. पाकचे लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांनीही ‘दहशतवादाचे शस्त्र वापरून देश कमकुवत करण्याचा परकीय शक्तींचा डाव आम्ही हाणून पाडू’, असा इशारा दिला आहे. पर्रीकर यांनी बेजबाबदारपणे केलेल्या विधानामुळे हे घडत आहे. पण भारत सरकार एक अवाक्षरही उच्चारायला तयार नाही. अन्यथा हिंदुत्ववादी बेफाटपणामुळे अडचणीत आल्यावर ‘ते व्यक्तिगत मत होते, पक्षाची वा सरकारची ही भूमिका नाही’, असा खुलासा गेल्या वर्षभरात अनेकवेळा करण्याची पाळी मोदी सरकारवर व खुद्द पंतप्रधानांवरही आली आहे. म्हणजेच पर्रीकर यांच्या या विधानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संमती आहे. त्यामुळेच बहुधा दिल्लीतील विवेकानंद इंटरनॅशनल या संघ परिवारातील संस्थेत बोलताना पर्रीकर यांनी पुन्हा हाच मुद्दा एका प्रश्नाला उत्तर देण्याच्या निमित्ताने घोळवला. ‘माझ्या वक्तव्याने पाकच्या नाकाला मिरच्या झोंबल्या, अगदी आंध्रच्या तिखट मिरच्या’, असं उत्तर पर्रीकर यांनी दिले. वस्तुत: पाकच्या नाकाला मिरच्या झोंबल्या हे पर्रीकरांचे अनुमान आंतरराष्ट्रीय स्तरावर परिस्थितीबाबतचे त्यांचे अगाध अज्ञान दर्शवते. खरे तर मिरच्या झोंबण्याऐवजी, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलीन करण्याची सुवर्णसंधी मिळाली, म्हणून पाकला आनंदाच्या उकळ्याच फुटत असतील. पर्रीकर यांच्या अशा बेजबाबदार वागण्याचे मोठे विपरीत परिणाम भारताला भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या वर्षाच्या अखेरीस अमेरिकी व नाटो फौजा अफगाणिस्तानातून माघारी जाणार आहेत. त्या देशात नवे सरकार आले आहे. तालिबान्यांच्या काही गटांचा सत्तेत सहभाग असल्याविना देशात स्थिरता येणार नाही, असे अध्यक्ष अशरफ गनी यांना वाटते. ‘चांगले तालिबान, वाईट तालिबान’, अशी विभागणी अमेरिका व नाटो राष्ट्रांनाही सोईची वाटत आहे. हे घडून येण्यासाठी पाकची मदत निर्णायक ठरणार आहे. पण भारताचा अफगाणिस्तानातील वावर बंद झाल्यासच आम्ही मदत करू, अशी अट पाकने घातली आहे. अध्यक्ष गनी यांना ते मान्य आहे. त्यामुळेच अलीकडे चीनमध्ये अफगाण नेते व तालिबान यांच्यात चर्चा झाली. त्याचबरोबर पाकची ‘आयएसआय’ आणि अफगाण गुप्तहेर संघटना यांच्यात एक करार झाला आहे. त्यानुसार या दोन्ही संघटना एकमेकांच्या विरोधात कारवाया करणार नाहीत आणि ‘परकीय शक्तीं’च्या - म्हणजेच भारताच्या - कारवायांना संयुक्तपणे तोंड देतील. हा करार होण्यासाठी ब्रिटनची मध्यस्थी कारणीभूत ठरली आहे. याचे पर्रीकर यांना काहीच सोयरसुतक दिसत नाही. नुसती ‘मिरच्या झोंबल्या’ची प्रतिक्रिया देऊनच पर्रीकर थांबलेले नाहीत. भारताची लोकसंख्या कमी करायची असल्यास एक अणुबॉम्ब टाकायला हवा, असे माझे वडील पूर्वी म्हणत असत, असेही एक प्रश्नाला उत्तर देताना पर्रीकर यांनी सांगून टाकले. इतके बाष्कळ विधान करणारा व बेजबाबदारपणे बोलणारा नेता २१व्या शतकातील अण्वस्रधारी भारताचा संरक्षणमंत्री असावा, यापेक्षा या देशाचे दुर्दैव ते कोणते?