शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

दुष्काळी ब्राझीलमध्ये संत्री बहरतात, भारताचे घोडे कुठे अडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 09:32 IST

सतत दुष्काळ आणि पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य असलेल्या ब्राझीलचा शेतकरी संशोधक आणि सरकारच्या साहाय्याने आपली संत्राबाग फुलवतो. हे त्या देशाला कसे जमले?

- राजेश शेगोकार(वृत्तसंपादक, लोकमत, नागपूर)

ब्राझीलची चर्चा सुरू झाली की, आपल्याला दाेन गाेष्टी आठवतात, एक म्हणजे डीजेच्या तालावर ‘ब्राझील.. ब्राझील..’ हे गाणे ऐकत धुंद हाेणे अन् दुसरे ब्राझीलचे फुटबाॅल प्रेम. पण ब्राझीलची एवढीच ओळख नाही. दक्षिण अमेरिका खंडातील हा देश संत्रा उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे स्थान मिळविण्यासाठी ब्राझीलच्या शेतकऱ्यांचा संघर्ष आणि त्यांना  मिळालेली संशाेधकांची साथ महत्त्वाची  आहे. या देशाला २०१५ ला दुष्काळाचा सामना करावा लागला, त्यानंतर पुन्हा तीन वर्षांपूर्वी दुष्काळाचा फटका बसला. ९० टक्के संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची ७५ टक्के संत्र्याची झाडे जळाली. माेठे नुकसान झाले. त्यानंतर ‘फायटाेप्थेरा’ने फळबागांवर आक्रमण केले. यामुळे तेथील शेतकऱ्यांनी सिट्रस शेतीकडे पाठ फिरवली; अशा स्थितीत तेथील सरकारने सबसिडी दिली, सिंचनाच्या व्यवस्था वाढविल्या.

ब्राझीलच्या संशाेधन संस्थांनी त्यांचे संशाेधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाेहोचविले. आजारी झाडांचे रूट स्टाॅकच काढून टाकले व फायटाेप्थेरा आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. पाण्याची गरज कमी करण्यासाठी झाडांचा आकार कमी केला. ब्राझीलमध्येही भारताप्रमाणे पाण्याचे दुर्भिक्ष असते. ५०० मीटरपर्यंत खाेदल्यानंतरच पाणी मिळते. अशाही स्थितीत ड्रीप सिंचनाच्या सुविधा विस्तारल्या. तेथील संत्रा उत्पादक तरला व आज जगभरात संत्रा उत्पादनात नावारूपाला आला.

ब्राझीलच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची ही यशाेगाथा नागपुरात भरलेल्या जगातील पहिल्या ‘एशियन सिट्रस काँग्रेस-२०२३’मध्ये सहभागी झालेल्या संशाेधकांकडून ऐकायला मिळाली अन् जे ब्राझीलला जमले ते आपल्या भारताला का नाही, असा प्रश्न मनात आला. जगात १५० देशांमध्ये लिंबूवर्गीय फळांची लागवड होते, त्यामध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र आंतरराष्ट्रीय मानकाच्या दृष्टीने भारतीय सिट्रसची उत्पादकता व गुणवत्ता फार कच्ची आहे. लिंबूवर्गीय फळांचा आरोग्याशी अत्यंत जवळचा असा संबंध आहे. भारतात २७ विविध प्रकारच्या लिंबूवर्गीय प्रजाती असून, नागपुरी संत्र्याप्रमाणे यातील काही प्रजातींना भौगोलिक संकेतांक (जीआय मानांकन) प्राप्त झालेले आहे. 

हवामान बदलाचा फटका तसेच लिंबूवर्गीय फळांची उत्पादकता, गुणवत्ता आणि नवनवीन आजारांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे संत्रा बेल्टचा विस्तार कमी हाेत चालला आहे. संत्रा व माेसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी फळगळती आणि झाडे सुकविणारा फायटाेप्थेरा आजार ही माेठी समस्या ठरली आहे. ही समस्या ब्राझीलप्रमाणेच अमेरिकेतील शेतकऱ्यांसमाेरही हाेती. मात्र फ्लाेरिडा विद्यापीठाच्या संशाेधकांनी ‘बीझेड-नॅनाेटेक्नाॅलाॅजी’च्या तंत्राने या आजारावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविल्याचे नागपूरच्या एशियन सिट्रस काँग्रेसमध्ये समाेर आले. हवामान बदलामुळे ही लढाई आणखी बिकट हाेणार आहे. ब्राझील असाे की अमेरिका, येथील शेतीमधील संशाेधन हे प्रयाेगशाळेपुरते मर्यादित राहत नाही, ते थेट बांधावर जाते. त्यामुळे  तेथील शेतकरी तरला आहे. केवळ एकाच शेतात संशाेधन पाेहोचविले जात नाही, तर सर्व शेती क्षेत्राचा समावेश केला जाताे. सरकार - संशाेधन संस्था हातात हात घालून चालतात, नाहक सरकारी हस्तक्षेप हाेत नाही.

दर्जेदार उत्पादनासाठी कलमांची गुणवत्ता हवी असते. आपल्या देशात दरवर्षी संत्रा, माेसंबी या लिंबूवर्गीय फळबागांच्या लागवडीसाठी सरासरी १.७० काेटी कलमांची गरज असून, सरासरी ३० लाख दर्जेदार व राेगमुक्त कलमांची निर्मिती केली जाते. ही तफावत माेठी आहे. त्यामुळे आगामी काळात लिंबूवर्गीय फळपिकांसाठी व्यापक अशा धाेरणाची गरज भासणार आहे. एकीकडे सिट्रस काँग्रेस भरली असतानाच दुसरीकडे बांगलादेश सरकारने नागपुरी संत्र्याच्या आयातीवर ४४० टक्क्यांपर्यंत आयात शुल्कामध्ये वाढ केली होती. वाढते आयात शुल्क व वाहतूक खर्चामुळे संत्र्याची निर्यात अर्ध्यावर आली आहे. देशांतर्गत बाजारातील संत्र्याची मागणी कायम असल्याने दर प्रतिटन ६२ ते ७० हजार रुपयांवरून २० ते २५ हजार रुपये प्रतिटनावर आले आहेत. लागवडीला प्राेत्साहन देताना आयात-निर्यातीचे धाेरण शेतमालाच्या हिताचे असावे, ही अपेक्षा चुकीची नाही.

सिट्रसबाबत भारत-अमेरिका किंवा इतर देशांची परिस्थिती वेगवेगळी असली तरी समस्या एकसारख्या आहेत, हे या सिट्रस काँग्रेसमध्ये जगभरातील १६ देशांमधील १०० पेक्षा अधिक लिंबूवर्गीय फळशास्त्रज्ञ आणि संशाेधकांनी केलेल्या मार्गदर्शनात समाेर आले आहे. त्यांचे हे मार्गदर्शन, विचार शास्त्रज्ञ संशाेधकांपुरतेच राहिले, असे होता कामा नये. ज्या विदर्भात ही काँग्रेस झाली, किमान त्या विदर्भातील संत्रा-माेसंबी उत्पादक शेतकऱ्यांना यामध्ये सामावून घेता आले असते तर भविष्यात संशाेधनाची फळे अधिक रसाळ झाली असती. 

टॅग्स :droughtदुष्काळBrazilब्राझील