शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

'मुक्त विद्यापीठाने गरजाधिष्टीत शिक्षण देण्याची गरज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 13:08 IST

Education : आतापर्यंत हजारो प्राथमिक शिक्षकांनी विद्यापीठाची  शिक्षणशास्त्राची पदवी मिळवून आपल्या शैक्षणिक वाटचालीत बढती आणि पदोन्नतीचे लाभ घेतले आहेत.

 - डॉ. प्रवीण घोडेस्वार  

शिक्षणाच्या प्रवाहातून सामाजिक, आर्थिक आणि इतर अनुषंगिक कारणांमुळे वंचित राहिलेल्या समुदायासाठी उत्तम पर्याय म्हणजे  मुक्त आणि दूरस्थ शिक्षण. समाजातल्या तळागाळातील उपेक्षित-अभावग्रस्त-गरीब घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य नाशिकस्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ गेल्या तीन दशकांपासून करत आहेत. आजवर लाखो लोकांनी आपले अर्धवट राहिलेले शिक्षण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पूर्ण करून व्यवसायिक नि कौटुंबिक जीवनात यश संपादन केलं आहे. शिक्षण घेण्यासाठी गरजेची असलेली मानसिक क्षमता असूनही शिक्षणाची संधी हुकलेल्या घटकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे आव्हान मुक्त विद्यापीठासमोर होते आणि आहेही. गेल्या तीन दशकांत हे आव्हान पेलण्यात विद्यापीठाला काही प्रमाणात यश आलेलं आहे हे नक्की. 

काम करताकरता शिक्षण आणि शिक्षण घेता घेता कामात कौशल्य विकसित करणारी प्रणाली हे मुक्त शिक्षणाचे वैशिष्ट्य. पारंपरिक शिक्षणापासून दुरावलेल्या मोठ्या जनसमूहाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य मुक्त विद्यापीठ अविरतपणे करत आहे. यात समाजिकदृष्ट्या वंचित-पिडीत-कष्टकरी-शेतकरी-अल्पसंख्याक आणि स्त्रिया यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यापीठाच्या कृषी शिक्षणक्रमांचा लाभ घेऊन अनेक शेतकरी आपल्या शेतीत नवनवे प्रयोग करत आहेत. 

मुक्त विद्यापीठाने सामाजिकशास्त्रे आणि मानव्यविद्या शाखेच्या विविध विषयांची (अर्थशास्त्र-राज्यशास्त्र-इतिहास-समाजशास्त्र-पत्रकारिता-ग्रंथालय व माहितीशास्त्र-उपयोजित कला-मराठी-हिंदी-इंग्रजी साहित्य) विकसित केलेली अत्यंत दर्जेदार अध्ययन सामग्री अनेक जाणकारांनी नि तज्ज्ञांनी वाखाणली आहे. याचा अभ्यास करून अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त केले आहे आणि करतही आहेत. तसेच आतापर्यंत हजारो प्राथमिक शिक्षकांनी विद्यापीठाची  शिक्षणशास्त्राची पदवी मिळवून आपल्या शैक्षणिक वाटचालीत बढती आणि पदोन्नतीचे लाभ घेतले आहेत. 

मुक्त विद्यापीठाची स्थापना करताना मातृभाषेतून उत्तम नि दर्जेदार उच्च शिक्षण देणे हा देखील महत्वाचा उद्देश होता. यातही विद्यापीठाने लक्षणीय कामगिरी केली आहे असे म्हणता येते. विज्ञान, तंत्रज्ञान, संगणकशास्त्र व  व्यवस्थापन वगळता बाकी विद्याशाखेचे शिक्षण माध्यम मराठीच आहे. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीद असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठाला commonwealth of learning चा उत्कृष्ट शैक्षणिक संस्थेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोनदा मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारे आपले भारतातले एकमेव मुक्त विद्यापीठ आहे. ही बाब तमाम मराठी जनतेसाठी भूषणावह आहे यात शंका नाही.

‘आयुष्यभरासाठी शिक्षण’ हे मुक्त विद्यापीठाचे अजून एक वैशिष्ट्य. याला अनुसरून भविष्यात अनेक शिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम विद्यापीठाला विकसित करावे लागणार आहेत. येत्या दशकात आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल अपेक्षित आहेत. विशेषत: information communication technology, digital platforms, web base teaching and learning, online learning-teaching-assessment-evaluation या नव तंत्रज्ञानाचा स्वीकार नि अवलंब करण्याशिवाय पर्याय नाहीये. मुक्त विद्यापीठाने काळाची पाऊले आधीच ओळखून या दिशेने २०११ नंतर म्हणजे मागील दशकाच्या प्रारंभी सुरुवात केली आहे. 

आपल्या राज्यात online प्रवेश प्रक्रिया राबवणारे आणि मूल्यमापन करणारे  मुक्त विद्यापीठ  हे पहिले विद्यापीठ आहे असे अभिमानाने नमूद करावेसे वाटते. तसेच करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर online परीक्षा उत्तमपणे आणि यशस्वीरीत्या पार पडणारे हे  एकमेव विद्यापीठ आहे. म्हणजे विद्यापीठ तंत्रस्नेही झाले असल्याचे  स्पष्ट होते. विद्यापीठाची बहुतांशी अभ्यासकेंद्रे ही पारंपारिक विद्यापीठांना संलग्न महाविद्यालयांमध्ये कार्यरत आहेत. करोना साथीच्या काळात ह्या व इतरही अभ्यासकेंद्रांनी online counseling (online समंत्रण) करून  विद्यापीठ techno savvy असल्याचा प्रत्यय आणून देत ज्ञानगंगेचा प्रवाह खंडीत होऊ दिला नाही. येत्या दशकात मुक्त विद्यापीठाने खालील घटकांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या गरजा काय आहेत (need assessment)  याचा अभ्यास करून शिक्षणक्रम विकसित करायला हवेत. 

युवक : दहावी-बारावी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण युवकांसाठी विविध कौशल्ये शिकवणारे शिक्षणक्रम तयार करणे. यामध्ये सध्या ITI मध्ये उपलब्ध असलेल्या ट्रेडस शिवाय इतर काय देता येईल याचा विचार व्हावा. शिवाय सध्या उपलब्ध प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी यात कालानुरूप बदल करून त्यांचे अद्यावतीकरण करता येईल. उदा. संविधान साक्षरता-समाज माध्यमांचा विवेकी वापर-लिंगभाव संवेदनशीलता या सारख्या घटकांचा समावेश करता येईल. विद्यापीठाच्या  सावित्रीबाई फुले अध्यासनाने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने ‘लिंगभाव संवेदनशीलता’ यावर अभ्यासक्रम तयार केला असून तो लवकरच कार्यान्वित केला जाणार आहे.

शासकीय कर्मचारी/अधिकारी : शासनाच्या सेवेत असलेले कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी देखील त्यांच्या गरजांनुसार छोटे अभ्यासक्रम विकसित करता येतील. शासकीय अधिकारी /कर्मचारी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सेवेत आलेले असतात, हे खरे आहे. शिवाय त्यांना नियुक्तीनंतर प्रशिक्षण देखील दिले जाते. पण तरीही त्यांच्यासाठी विशिष्ट विषयाचे उद्बोधन करण्यासाठी शिक्षणक्रम विकसित करता येऊ शकतात. उदा. ग्रामसेवक,तलाठी, विविध विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी, अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षक आणि इतरांचाही समावेश करता येईल.

व्यावसायिक : विविध क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक, कलावंत, माध्यमकर्मी, NGOs मधील कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, वकील, लेखापाल, event mangers, सेवा क्षेत्रातील कर्मचारी, लहान उद्योजक, आदरातिथ्य व्यवस्थापनातील कर्मचारी, खाजगी रेडीओवरील कर्मचारी इत्यादी समूहासाठी त्यांच्या गरजा विचारात घेऊन त्यांच्या कौशल्ये वृद्धीसाठी शिक्षणक्रम विकसित करता येऊ शकतात. वरील तिन्ही समूहातल्या स्त्रियांच्या गरजांकडे विशेष लक्ष द्यायला हवे.

बदलत्या काळात २०-२५ वर्षांपूर्वी घेतलेल्या शिक्षणावर उर्वरित करिअर करता येणार नाहीये. त्यासाठी प्रत्येकाला वेळोवेळी काही नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे आता शिक्षणाचे विशिष्ट वय असते ही धारणा बदलावी लागणार आहे. अशा समूहाला शिक्षित करण्यासाठी मुक्त विद्यापीठाशीवाय दुसरा उत्तम पर्याय नाही. फक्त अशा समूहासाठी शिक्षणक्रम विकसित करताना ‘प्रौढ/अनुभवी लोकं कसे शिकतात?’ या बाबतचे विविध सिद्धांत नि अभ्यास ध्यानात घ्यावे लागतील. त्या आधी वरील समूहाच्या शिक्षणाच्या नेमक्या गरजा काय आहेत याचं शास्त्रशुद्ध आकलन होणे फार महत्वाचे आहे.येत्या दशकात सर्व प्रकारच्या समूहासाठी घरी राहून, काम करता करता, व्यवसाय नोकरी करता करता शिक्षण घेण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ जनमानसात प्रस्थापित व्हावे अशी अपेक्षा. म्हणजे खऱ्या अर्थाने हे महाराष्ट्रचे ‘लोकविद्यापीठ’ म्हणून नावाजले जाईल.

(लेखक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक असून लेखात व्यक्त केलेले विचार वैयक्तिक आहेत.)

टॅग्स :Educationशिक्षणuniversityविद्यापीठ