शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

आॅनलाइन फार्मसी धोकादायकच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 00:09 IST

औषध निर्यातीत जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताला जगाची फार्मसी म्हणून ओळखले जाते. जगाला लागणारी ८0 टक्के औषधे भारत निर्यात करतो. या क्षेत्राला आता आॅनलाइन फार्मसी ते बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आक्रमण असे अनेक अडथळे भेडसावू लागले आहेत.

- कैलास तांदळे(अध्यक्ष, महाराष्ट्र रजि. फार्मा. असो.)औषध निर्यातीत जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताला जगाची फार्मसी म्हणून ओळखले जाते. जगाला लागणारी ८0 टक्के औषधे भारत निर्यात करतो. या क्षेत्राला आता आॅनलाइन फार्मसी ते बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आक्रमण असे अनेक अडथळे भेडसावू लागले आहेत. २५ सप्टेंबर हा दिवस जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. फार्मसी आणि रुग्णांसमोरील धोक्यांबाबतची चर्चा यानिमित्ताने होणे गरजेचे आहे.१९९0 च्या दशकात दहा ते बारा हजार कोटींच्या घरात असलेल्या भारतीय औषधी उद्योगाने २१ व्या शतकात ४0 बिलियन डॉलरकडे झेप घेतली. भारत देशांतर्गत औषधनिर्मितीमध्ये स्वयंपूर्ण आहे. देशामध्ये उपलब्ध असलेले मनुष्यबळ, ज्ञान व कौशल्यामुळे ही प्रगती करणे भारतासारख्या देशाला सहज शक्य झाले. भारतात दरवर्षी तयार होणारे ७0 हजार फार्मासिस्ट औषध संशोधन, उत्पादन, विक्र ी व निर्यात क्षेत्रात काम करतात. याबरोबरच क्लिनिकल रिसर्च, ट्रायल, डेटा मॅनेजमेंट, फार्माकोविगीलन्ससारखी औषधनिर्मितीसाठीची महत्त्वपूर्ण कामेही फार्मासिस्ट करत असतात. या सर्व गोष्टी फार्मासिस्ट करतो याची माहिती बºयाच जणांना नसते.अन्न व सौंदर्य प्रसाधन कायद्याच्या तरतुदीनुसार औषधविक्री परवानाधारक औषध पेढीतून राज्य औषध व्यवसाय परिषदेत नोंदणीकृत फार्मासिस्टच्या उपस्थितीत व देखरेखीखाली झाली पाहिजे. फार्मासिस्टला औषध व्यवसायात असणाºया संधीबरोबरच थेट डॉक्टरांनी रुग्णांना सुरू केलेली औषधविक्री व आॅनलाइन /ई-फार्मसी आव्हानेही आहेतच. आजकालच्या डिजिटल जमान्यात जीवनावश्यक वस्तू आॅनलाइन वेबसाइट व अ‍ॅप्सच्या माध्यमातून खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. विविध वेबसाइट व अ‍ॅप्सवर औषधेही आॅनलाइन उपलब्ध आहेत. भारतासारख्या देशाची औषधांचा प्रचंड खप असलेली बाजारपेठ बहुराष्ट्रीय कंपन्यांना खुणावत आहे. या कंपन्याही लवकरच किरकोळ औषधविक्र ी व्यवसायात उतरत आहेत. यात रिटेल फार्मासिस्टबरोबरच नुकसान होणार आहे ते रुग्णांचे. कारण आॅफलाइन रिटेल फार्मसीसाठी असणाºया औषधविक्रीसाठी अन्न व सौंदर्य प्रसाधन कायद्याअंतर्गत अनेक नियम आहेत, तसे नियम, मार्गदर्शक तत्त्वे अथवा नियंत्रण आॅनलाइन फार्मसीसाठी नसल्याने आॅनलाइन औषधविक्र ी विनानिर्बंध धडाक्यात सुरू आहे. या आॅनलाइन फार्मसीचे दुष्परिणाम व धोके तरुण पिढीला आहेत.बरीच कुमारवयीन मुले-मुली आॅनलाइन फार्मसीचा वापर नशा व गुंगी आणणाºया झोपेच्या तसेच गर्भपाताच्या गोळ्या मिळवण्यासाठी करत असल्याचे दिसून आले आहे. नफ्यासाठी सुरू असलेल्या आॅनलाइन फार्मसीवाल्यांना याच्याशी काही घेणे-देणे नाही. आॅनलाइन फार्मसीच्या माध्यमातून खोट्या प्रिस्क्रिप्शनच्या आधारे होणारी विक्री तसेच कुरिअरच्या माध्यमातून होणाºया विक्रीमुळे ३-४ दिवसांच्या कालावधीत औषधांचे तापमान नीट राखले जात नसल्याने औषधी घटक कुचकामी ठरू शकतात. त्यामुळे अशी औषधे योग्य परिणाम साधतील याची हमी नसते.आॅनलाइन फार्मसीला सरकारने परवानगी दिली तर देशातील नऊ लाख किरकोळ औषध व्यवसायातील फार्मासिस्ट्सबरोबरच या व्यवसायातील जवळपास दोन कोटी लोकांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार जाऊन त्यांचे भवितव्य अंधकारमय होण्याची भीती आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयmedicinesऔषधंnewsबातम्या