शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

आॅनलाइन बँकिंग क्षेत्र

By admin | Updated: January 31, 2016 01:14 IST

इंटरनेटच्या आगमनानंतर बँकिंग क्षेत्रात मोठी क्रांती घडली. अनेक आर्थिक व्यवहार, बिल पेमेंट्स, पैशांची देवाण-घेवाण क्लिकवरती शक्य झाली. सध्या या क्षेत्रात काय नवे घडते आहे

(लोक'तंत्रा')

- प्रसाद ताम्हनकर

इंटरनेटच्या आगमनानंतर बँकिंग क्षेत्रात मोठी क्रांती घडली. अनेक आर्थिक व्यवहार, बिल पेमेंट्स, पैशांची देवाण-घेवाण क्लिकवरती शक्य झाली. सध्या या क्षेत्रात काय नवे घडते आहे, त्याचा हा आढावा- व्हिसा प्रीपेड - आॅनलाइन व्यवहारांसाठी 'आॅक्सिजन वॉलेट'ने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. सतत काही नवे देण्याचा प्रयत्न करत असलेल्या आॅक्सिजन वॉलेटने, 'व्हिसा प्रीपेड' ही सुरक्षित अशी सेवा ग्राहकाना दिली आहे. आॅनलाइन व्यवहार करताना, अनेकदा क्रेडिट वा डेबिट कार्ड वापरणे हे अनेकांना असुरक्षित वाटते. अशा वेळी एखाद्या विशिष्ट व्यवहारापुरतेच वापरता येणारे आणि त्यानंतर आपोआप नष्ट होणारे व्हर्च्युअल डेबिट कार्ड मिळाले तर? याच संकल्पनेला आॅक्सिजन वॉलेटने प्रत्यक्षात उतरवले आहे. आता असे कार्ड हवे असणाऱ्या ग्राहकांनी वेबसाइटवर लॉग इन केल्यानंतर या सोईचा फायदा घेता येणार आहे. हे व्हर्च्युअल कार्ड पिन नंबरसह उपलब्ध असणार आहे. व्हिसाच्या मदतीने साकारलेल्या या संक२ल्पनेला 'व्हिसा प्रीपेड' असे नाव दिले आहे.साउंड पे - ई-कॉमर्स आणि मोबाइल वॉलेट क्षेत्रातील आघाडीच्या पेटीएम कंपनीने 'साउंड पे' हे ध्वनीच्या साहाय्याने आर्थिक व्यवहार करता येऊ शकणारे तंत्रज्ञान आणत आहे. एकदा हे तंत्रज्ञान दाखल झाले की, ग्राहकाला फक्त ज्या बिलिंग अ‍ॅपद्वारे आर्थिक व्यवहार करायचे आहेत, त्या अ‍ॅपच्या जवळ पेटीएमचे अ‍ॅप उघडून 'साउंड पे' हा पर्याय निवडायचा आहे आणि आर्थिक व्यवहाराची रक्कम व क्रेडेंशिअल्स सांगायचे आहेत. पेटीएमचे अ‍ॅप या ध्वनिलहरी संबंधित मर्चंट अ‍ॅपपर्यंत पोचवेल आणि त्यानंतर पेटीएम वॉलेटची तपासणी होऊन त्यातील रकमेद्वारे हा व्यवहार पूर्ण होईल. अल्ट्रासॉनिक ध्वनिद्वारे गोळा केली जाणारी ही माहिती, पुढे डिजिटल स्वरूपात ट्रान्सफर करण्याचे कौशल्य या तंत्रज्ञानात आहे.वन टॅप - पेयूबीझ ही मोबाइल पेमेंट फर्म, 'वन टॅप टेक्नॉलॉजी' हे हटके तंत्रज्ञान घेऊन आली आहे. या 'वन टॅप पेमेंट' तंत्रज्ञानात यूजर्सना सिव्हीव्ही नंबर न टाकताच व्यवहार करण्याची सोय उपलब्ध आहे. ग्राहकांचा व्यवहार क्षणात पूर्ण व्हावा आणि वेळेची बचत व्हावी, यासाठी वन टाइम पासवर्ड, जो सेकंड लेव्हल आॅथेंटिकेशनसाठी महत्त्वाचा आहे, तो आॅटोमॅटिक वाचला जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. सिव्हीव्ही नंबरशिवाय व्यवहार पूर्णत्वाकडे कसा नेला जाईल, या संदर्भात पेयूबीझचे सीईओ नितीन गुप्ता यांनी हीच या तंत्रज्ञानाची खासियत असल्याचे आणि ते गुप्तच ठेवले जाणार असल्याचे सांगितले. पेयूबीझने या तंत्रज्ञानाचे पेटंट घेतले असून, आम्ही पेयूबीझद्वारे कोणतेही सिव्हीव्ही नंबर साठवण्यास उत्सुक नसल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले. एका वर्षात ५ लाख ग्राहकांचा उद्देश पेयूबीझने ठेवला असून, त्यासाठी त्यांनी Peppertap, Redbus, Goibibo, Grofers, Big basket, Just dial, xiaomi, Musafir, nearbuy  सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. परदेशात हे तंत्रज्ञान सहजपणे रुळले असले, तरी भारतीयांसाठी मात्र हे आकर्षणाचा केंद्र्रबिंदू ठरू शकते.