शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

एक पक्ष, एक झेंडा, दोन नेते, दोन मैदाने!

By यदू जोशी | Updated: September 30, 2022 10:03 IST

‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’...हेच शब्द! फरक इतकाच की यावेळी दसरा मेळाव्यात असे ‘दोन आवाज’ घुमतील!!

यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

शिवाजी पार्क आणि शिवसेना हे वर्षानुवर्षांचे समीकरण यंदाही कायम आहे. महापालिकेने ‘नरो वा कुंजोरोवा’ची भूमिका घेतल्यानंतर न्यायालयाने उद्धव ठाकरेंचाच आवाज शिवाजी पार्कवर घुमेल, असा कौल दिला आहे. एक पक्ष, एक झेंडा, एक नेता (ठाकरे), एक मैदान हे सूत्र मात्र यावेळी असणार नाही. पक्ष एकच असेल, झेंडाही (भगवा) एकच असेल पण नेते दोन (ठाकरे, एकनाथ शिंदे) आणि मैदानेही दोन (शिवाजी पार्क, बीकेसी मैदान) असतील. 

भाषणाची सुरूवात ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ अशीच होत आली आहे; फरक इतकाच, की यावेळी दसरा मेळाव्यात असे दोन आवाज घुमतील. न्यायालयाने फैसला दिला पण दसऱ्याला ‘किस मे कितना है दम’चा फैसला जनतेच्या न्यायालयात (मैदानात) होईल. मैदान ए जंग महाराष्ट्राला बघायला मिळेल. 

- सत्ता गमावलेले ठाकरे विरुद्ध ठाकरेंना सत्तेतून हटवून सत्तेत आलेले शिंदे असा हा सामना आहे. ठाकरेंची शिवसेना पळविली पण ठाकरी शैली कशी पळविणार? बाळासाहेबांसारखे वाक्चातुर्य नसलेल्या उद्धव ठाकरेंनी चिमटे घेणारी, घायाळ करणारी ठाकरी शैली मात्र जपली आहे. राज ठाकरे हुबेहूब बाळासाहेब स्टाइलमध्ये बोलतात. यावेळी ठाकरेशाहीला आव्हान देणाऱ्या शिंदेशैलीचा दसरा मेळाव्यात कस लागेल. उद्धव आणि राज यांचे गारुड मनावर असलेल्या मराठी माणसांची मने जिंकण्याचे आव्हान शिंदेंसमोर असेल. विधानसभेतील शिंदेंचे तुफान भाषण ‘बंदे मे है दम’चा अनुभव देणारे होते. टेंभी नाक्यावरचे शिंदे, आनंदाश्रमातले शिंदे, विधानसभेतले शिंदे यांच्या आजवरच्या राजकीय जीवनातील टर्निंग पॉईंट भाषण हे दसऱ्याचे असेल. विश्वासघाताचा आरोप असलेले शिंदे कसा विश्वास देतात, हेही महत्त्वाचे.

- गर्दी जमविण्याचे जे नियोजन सुरू आहे, त्यावरून बीकेसीवर अधिक गर्दी असेल, असा अंदाज आहे. तो खरा ठरला तर केवळ आमदारच नाहीत तर शिवसैनिकही आपल्यासोबत आहेत, या शिंदेंच्या दाव्याला बळकटी येईल. शिवसेना तुटते तेव्हा अधिक त्वेषाने वाढते, हा आजवरचा अनुभव याहीवेळी आला तर शिवाजी पार्कवरही रेकॉर्ड ब्रेक गर्दी होऊ शकते. एकमेकांवर कुरघोडी करण्याची मानसशास्त्रीय लढाई मेळाव्याच्या निमित्ताने टिपेला पोहोचेल. ‘मुले पळविणारी टोळीे’ असते, तसे ‘बाप पळविणारी टोळी’ फिरत असल्याचा चिमटा काढत उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे वारसदार तेच असल्याचे ठणकावले आहे.

ते बाळासाहेबांचे वारसदार आहेत यात शंकाच नाही; ‘आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार’ ही शिंदेंच्या दसरा मेळाव्याची थीम असेल. विचारांच्या वारसाहक्काची ही लढाई आहे. या वारशाचा सातबारा शिवसैनिक लिहितील. ठाकरे गटाला तडाखा देण्यासाठी काही धक्कादायक प्रवेश बीकेसीवरील मेळाव्यात होऊ शकतात. शिवाजी पार्कची क्षमता ८० हजारांची तर बीकेसीची दोन लाखांची आहे म्हणतात. सेना भवनपर्यंत वा त्याही पार गर्दी ठाकरेंना जमवावी लागेल. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेला महाराष्ट्रात राष्ट्रवादी साथ देईल, असे दिसते. त्याच तत्वाने दसरा मेळाव्याला राष्ट्रवादी-काँग्रेसची साथ मिळाली तर? - राजकारण चालू द्या पण दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रात लोकांना एसटीने जायला मिळेल की नाही? दोघांनी मिळून पाच हजार एसटी बुक केल्यात म्हणे! सणाचा दिवस आहे;  लोकांची गैरसोय होणार नाही, असेही बघा! 

अन् हा दुसरा गौप्यस्फोटकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला, की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप-शिवसेनेचे सरकार असतानाच शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव दिलेला होता. तशी चर्चा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आपल्याशी केली होती. हा झाला एक गौप्यस्फोट. दुसरा गौप्यस्फोट असा की, शिवसेनेची साथ सोडून भाजपने राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा विचार केला होता. तशी चर्चाही झाली होती पण जसे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार होऊ शकले नाही तसेच भाजप-राष्ट्रवादी सरकार होऊ शकले नाही. एकमेकांसोबतच्या संसाराला कंटाळलेल्या दोघांनीही दुसरा घरठाव शोधून पाहिला होता, पण दोघांनाही जमले नाही. आम्ही या वृत्ताची पुष्टी करत नाही वगैरे सांगून हात वर करण्याचा बेजबाबदारपणा या गौप्यस्फोटात नाही बरं! हे वृत्तपत्र आहे; चॅनेल नाही.

जाता जाता : छगन भुजबळ म्हणाले, ‘आम्ही देवी सरस्वतीला पाहिले नाही मग आम्ही सरस्वतीची पूजा का करायची?’ आपला सोशल मीडिया मोठ्ठा हुश्शार... छगन भुजबळ हे लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन घेत असल्याचे फोटो व्हायरल करून नेटकऱ्यांनी लिहिले... ‘अच्छा! म्हणजे भुजबळांनी गणपतीला प्रत्यक्ष पाहिले तर?’

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेDasaraदसरा