शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

इतिहासाची पाने...स्थैर्य अन् एकात्मतेसाठी पुन्हा एकदा काँग्रेसच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 02:56 IST

जनता पक्षाचा प्रयोग फसला. त्याचे तीन प्रमुख पक्षांत विभाजन झाले. समाजवाद्यांनी धर्मनिरपेक्ष जनता दलाची स्थापना केली. जनसंघवाल्यांनी जनता पक्षाची स्थापना केली, तर चौधरी चरणसिंग यांनी पुन्हा लोकदलाची स्थापना केली होती.

- वसंत भोसलेजनता पक्षाचा प्रयोग फसला. त्याचे तीन प्रमुख पक्षांत विभाजन झाले. समाजवाद्यांनी धर्मनिरपेक्ष जनता दलाची स्थापना केली. जनसंघवाल्यांनी जनता पक्षाची स्थापना केली, तर चौधरी चरणसिंग यांनी पुन्हा लोकदलाची स्थापना केली होती. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी घरवापसी केली आणि इंदिरा गांधी यांचे हात बळकट करण्याचा निर्धार केला. देश प्रथमच मध्यावधी निवडणुकांना सामोरे जात होता. १९५२ पासून दर पाच वर्षांनी पाच निवडणुका पार पडल्या होत्या. आणीबाणीच्या कालखंडाने पाचव्या लोकसभेची मुदत एक वर्षाने वाढविण्यात आली होती. मार्च १९७७ मध्ये सहाव्या लोकसभेची निवडणूक झाली आणि सत्तांतर झाले, ते टिकले नाही. देश पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाकडे आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाकडे आशेने पाहू लागला. १९८० मध्ये निवडणुका लागल्या.आता भारताची स्वातंत्र्यानंतरची मतदारांची संख्या दुप्पट झाली होती. पहिल्या निवडणुकीत १७ कोटी मतदार होते. ती संख्या आता ३५ कोटी ६२ लाख ५ हजार ३२९ वर पोहोचली होती. ५४२ मतदारसंघ झाले होते. काँग्रेसने सर्वाधिक ४९२ जागा लढविल्या. एकूण ५६.९२ टक्के मतदान झाले. मतदानाची टक्केवारी चारने घसरली होती. झालेल्या मतदानांपैकी काँग्रेसने ४२.६९ टक्के मते घेत ३५३ जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळविले. विरोधी एकाही पक्षाला दहा टक्के जागा मिळाल्या नाहीत. जनता पक्षाला केवळ ३१, धर्मनिरपेक्ष जनता पक्षाला ४१, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला ३३, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाला दहाच जागा जिंकता आल्या. मावळते पंतप्रधान चौधरीचरणसिंग यांच्या नेतृत्वाखाली लोकदलास केवळ तीनच जागा जिंकता आल्या.काँग्रेसला पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात (८५ पैकी ५१), महाराष्ट्र (४८ पैकी ३९), मध्य प्रदेश (४० पैकी ३५), बिहार (५४ पैकी ३०), ओडिसा (२१ पैकी २०), कर्नाटक (२८ पैकी २७), आंध्र प्रदेश (४२ पैकी ४१), राजस्थान (२५ पैकी १८), पंजाब (१३ पैकी १२), तामिळनाडू (३९ पैकी २०), नवी दिल्ली (७ पैकी ६) या राज्यांनी भरभरून साथ दिली. धर्मनिरपेक्ष-जनता पक्षाला उत्तर प्रदेशातून २९ जागा मिळाल्या. इंदिरा गांधी आणि संजय गांधी पुन्हा एकदा अनुक्रमे रायबरेली आणि अमेठीतून लोकसभेवर निवडून गेले. अटलबिहारी वाजपेयी यांची नवी दिल्लीतून निवड झाली. इंदिरा गांधी यांनी जास्तीत जास्त सभांना हजेरी लावण्याचा प्रयत्न केला. इंदिरा गांधी यांनी आंध्र प्रदेशातील मेडकमधूनही निवडणूक जिंकली. १४ जानेवारी १९८० रोजी त्यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.महाराष्ट्रात ४८ पैकी ३९ जागा जिंकत काँग्रेसने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले. त्याकाळी महाराष्ट्रात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘पुलोद’चे सरकार होते. यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील संघटना काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. इंदिरा गांधी यांनी अनेक बड्या नेत्यांना लोकसभेसाठी रिंगणात उतरविले होते. यात वसंतदादा पाटील (सांगली), शंकरराव चव्हाण (नांदेड), यशवंतराव मोहिते (कºहाड), विठ्ठलराव गाडगीळ (पुणे), शंकरराव पाटील (बारामती), गुलाब नबी आझाद (वाशिम), पी. व्ही. नरसिंहराव (रामटेक), वसंतराव सावे (वर्धा), आदींचा समावेश होता. काँग्रेसने ३९ जागा जिंकल्या तरी मुंबई आणि कोकण पट्ट्यात मात्र जनता पक्षाने पुन्हा एकदा बाजी मारली. मुंबईतील सहापैकी पाच जागा जनता पक्षाने जिंकल्या. राम जेठमलानी, सुब्रह्मण्यम स्वामी, प्रमिला दंडवते, रामभाऊ म्हाळगी, प्रा. मधू दंडवते, बापूसाहेब परुळेकर आदी निवडून आले. केवळ दक्षिण मुंबईतून मुरली देवरा विजयी झाले. सर्वांत गाजलेली निवडणूक त्यांची ठरली. संघटना काँग्रेसतर्फे यशवंतराव चव्हाण विरुद्ध इंदिरा काँग्रेसतर्फे शालिनीताई पाटील यांच्यात लढत झाली. पुलोद सरकार स्थापन करताना शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या आशीर्वादाने राजकारण केले, असा आक्षेप वसंतदादा पाटील यांचा होता. त्यामुळे या दोघांत तीव्र मतभेद निर्माण झाले होते. वसंतदादा पाटील यांनी शालिनीताई पाटील यांना साताऱ्यातून उभे केले. चव्हाण यांना अत्यंत कठीण गेलेली ही निवडणूक होती. त्यात त्यांचा केवळ ३५ हजार मतांनी विजय झाला. संघटना काँग्रेसलाही एकमेव जागा महाराष्ट्रात मिळाली. पुढील निवडणूक होईपर्यंत यशवंतराव चव्हाण यांचे निधन झाले. त्यामुळे ही निवडणूक त्यांची अखेरची ठरली.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकIndira Gandhiइंदिरा गांधी