शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

स्वप्ने, क्षमता आणि अपरंपार जिद्दीला सलाम!

By विजय दर्डा | Updated: August 9, 2021 08:32 IST

ऑलिम्पिकमध्ये सहभागी अनेक खेळाडूंना सुविधा सोडा, अन्नपाण्याचीही भ्रांत होती! केवळ हिमतीच्या बळावर ते लढले.

- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूहटोकियो ऑलिम्पिकमध्ये ‘जन गण मन’ची धून सुरू झाली... अवघ्या जगभरात ते शब्द निनादू लागले, तेव्हा अवघा भारत रोमांचित झाला होता. नीरज चोप्रामुळे हे घडले. अथक परिश्रमातून त्याने भारतमातेच्या मस्तकी सुवर्ण-तिलक लावला. उल्हसित भारतीयांच्या धमन्यांतून उसळते रक्त असे काही सळसळू लागले, की जणू नीरज विश्वयुद्ध जिंकून आला असावा!!

अवघ्या भारतवर्षाला आनंदाचे भरते आले आहे.. हरेक भारतीयाचे मन म्हणते आहे, नीरज, तुला सलाम.. पी.व्ही. सिंधू, तुला सलाम... चानूबाईला, पुनियाला सलाम.. आपल्या जिगरबाज मुलींना सलाम.. हॉकीला सलाम.. सगळ्या हॉकी खेळाडूंना सलाम.. कोणा कोणा खेळाडूचे नाव घेऊ? प्रत्येक खेळाडूला सलाम! जिंकला त्याला आणि हरला त्यालाही सलाम!! खेळातल्या ईष्येला सलाम, तिरंग्याला सलाम,  भारतमातेला सलाम!!रक्षाबंधनाचा सण येतोय आणि  करोडो भारतीयांनी आपले मनगट पुढे केले आहे.. जात, धर्म, ब्रांड काहीही जणू दिसेनासे झाले आहे... दिसतो आहे तो केवळ एक तिरंगा आणि कानाशी गुंजते आहे ‘जन गण मन’ची धून! ..हाच खरा हिंदुस्तान आहे, हाच माझा भारत आहे. एक काळ होता जेव्हा आपण फक्त हॉकीसाठी ओळखले जात होतो. पण काळ बदलला. आज जवळ जवळ सगळ्या खेळात भारत सहभागी आहे. येणाऱ्या काळासाठी हा शुभ संकेतच मानला पाहिजे.  मात्र हेही खरे, की क्रीडांगणावर  जिंकण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. या ऑलिम्पिकमध्ये भारताचे जे खेळाडू गेले त्यांच्यातले अनेक अतिसामान्य पार्श्वभूमीतून आलेले होते. अन्नपाण्याची भ्रांत होती, अंगावर घालायला कपडे अपुरे होते, पांघरूण नव्हते.. पण त्यांच्यातली जिद्द त्यांना ऑलिम्पिकपर्यंत घेऊन गेली. मीराबाई चानूकडे तिच्या गावापासून २५ किलोमीटरवरच्या इम्फाळला जाण्यासाठी पैसे नसत. वाळूच्या ट्रकमध्ये बसून ती अकादमीत जात असे. ऑलिम्पिक पदक जिंकल्यावर चानू या ट्रकचालकांना विसरली नाही. कठीणकाळात तिला लिफ्ट देणाऱ्या या जुन्या सहकाऱ्यांना बोलवून तिने त्यांचा खास सन्मान केला. 
सायना नेहवालच्या आयुष्यावरचा चित्रपट पाहत होतो. हरियाणातल्या छोट्याशा गावात सायनाचा जन्म झाला. तिच्या आईची हिंमत अशी की, सायना सात महिन्यांची पोटात असताना ती स्थानिक स्पर्धा खेळायला गेली. जन्मानंतर सायनाची कशी उपेक्षा झाली हे देशाला माहिती आहे. सायनाला तिच्या आईने बसमध्ये बसवून हैदराबादला लालबहादूर शास्त्री अकादमीत नेले. हातात रॅकेट दिली आणि तिला सांगितले, ‘तुला जग जिंकायचे आहे’ सायनाने पुढे काय केले हे नंतर जगाने पाहिले. अशीच कहाणी सिंधूची आहे. कोणाकोणाच्या धीराच्या, जिद्दीच्या कहाण्या सांगू? 
कोणताही देश त्या देशातले खेळाडू, सैनिक, वैज्ञानिक, तंत्रज्ञ यांच्या नावाने ओळखला जातो; त्या देशात करोडपती, अब्जोपती किती झाले यावरून नाही हे आपण समजून घेतले पाहिजे. अर्थात, या करोडपतींनी देशाला दिलेले योगदान महत्त्वाचे असते. त्यातून हातांना काम मिळते.  खेळाचा विस्तार, पोषण यातही उद्योग महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. सरकारने या उद्योगांना बरोबर घेतले पाहिजे. त्यासाठी सरकारकडे पक्के धोरण असावे लागेल. आजवर भारताला जितकी ऑलिम्पिक पदके मिळाली, त्यातली सर्वाधिक हॉकीत मिळाली आहेत. हा इतिहास झाला; त्याची पुनरुक्ती मी करू इच्छित नाही. जादूगार ध्यानचंद, याचे हिटलरशी काय बोलणे झाले असे आणखी कितीतरी किस्से आहेत, ते बाजूला ठेवू! आपला ऑलिम्पिक- इतिहास १२१ वर्षांचा आहे. छोट्या छोट्या देशांनी ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट केली असेल तर ते आपल्याला का जमू नये? यात कळीची भूमिका असते सरकारची! हाच मुद्दा  मी २००४ साली संसदेत मांडला होता. समग्र क्रीडा धोरण तयार करून सरकारने ते काटेकोरपणे राबवले पाहिजे. सात वर्षाच्या मुलापासून त्याची सुरुवात होईल. उत्तम गुणवत्ता असलेल्या मुलांची  सगळी जबाबदारी सरकार घेईल. ही गुणवत्ता जोखल्यावर त्या मुलांचे प्रशिक्षण, आहार, विहार, प्रशिक्षण, खेळाचे दर्जेदार साहित्य, मानसिक प्रबोधन याची उत्तम व्यवस्था करावी लागेल. त्याकरिता  उद्योगजगतातून मदत घेता येईल.  .. हे आपण क्रिकेटमध्ये करून दाखवले खरे; पण तो मूठभर देशांचा खेळ आहे. मान्यताप्राप्त खेळात त्याला काही जागा नाही. एक काळ होता जेव्हा आपण आयटी हार्डवेअर क्षेत्रावर वर्चस्व  मिळवू शकलो असतो. संसदेत मी याकडे लक्ष वेधले होते; पण वेळ गेली. आज तैवानसारखे छोटे देश आयटी हार्डवेअरची शेकडो पेटंट बाळगून आहेत. आपण मागे पडलो, तसे खेळाचे होऊ नये. वेळ घालवून चालणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: खेळाडूंचे मनोबल वाढवले, ही विशेष  उल्लेखनीय गोष्ट!  खेळांबद्दल ते अत्यंत सजग आहेत.
- देशात एरवी दबदबा असलेल्या आपल्या महाराष्ट्राचे ऑलिम्पिकमधले योगदान पाहिले तर शरमेने मान खाली जाते. जुन्या गोष्टी उकरून काढण्याची ही वेळ नव्हेे; पण  अंजली भागवतचे काय झाले होते? ती विश्वचषकासाठी जात असताना तिला पिस्तुलाचा परवानाच मिळाला नव्हता. ‘तिथे जाऊन काय करणार?’ असे तिला विचारले गेले होते. लोकांनी तिला अक्षरश: रडवले... असे किस्से देशभर चिक्कार आहेत. - हे बदलले पाहिजे. ही सगळी स्थिती बदलली पाहिजे. क्रीडा प्राधिकरणाचा पूर्ण  दृष्टिकोन बदलला पाहिजे. अन्य कुठल्याही जबाबदारीचे ओझे नसलेला एक पूर्णवेळ मंत्री क्रीडाखात्यासाठी असावा.  आदिवासी मुलांना आपण खेळाच्या मुख्य प्रवाहात आणले तर गुणवत्तेची कमतरता राहणार नाही. मात्र त्यांना क्रिकेटच्या ग्लॅमरपासून वाचवावे लागेल. मी क्रिकेटच्या विरुद्ध नाही. पण त्या एका खेळाच्या झगमगाटात बाकीच्यांचा बळी देणे थांबले पाहिजे. आणि हो, ऑलिम्पिकमध्ये  भारताची तुलना चीन, जपानशी केली तर निराशाच पदरी येईल. त्यापासून सध्या तरी दूर राहावे. स्वप्नांना मर्यादा नाहीत आणि क्षमतांचा अभाव तर नाहीच नाही.  गरज आहे ती खेळाचे पर्यावरण सुधारण्याची ! तेवढे साधले,  तर आपण जगाला कमाल करून दाखवू. देशात सुवर्णपदके आली पाहिजेत, त्यांच्यामागोमाग ‘जन गण मन’ची धून सतत गुंजत राहिली पाहिजे.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Mirabai Chanuमीराबाई चानूNeeraj Chopraनीरज चोप्रा