शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

आता मनुस्मृती

By admin | Updated: April 21, 2016 03:53 IST

दोन वर्षांपूर्वी विकासाच्या नावावर भारतीय जनता पक्ष सत्तारुढ झाला खरा; पण प्रत्यक्षात दोन वर्षात विकासापेक्षा असहिष्णुता, गोहत्त्या-बंदी, भारतमाता की जय

दोन वर्षांपूर्वी विकासाच्या नावावर भारतीय जनता पक्ष सत्तारुढ झाला खरा; पण प्रत्यक्षात दोन वर्षात विकासापेक्षा असहिष्णुता, गोहत्त्या-बंदी, भारतमाता की जय, अफजल गुरूची फाशी, अशा गैरलागू मुद्यांचीच जास्त चर्चा झाली. त्यासाठी भाजपा व त्या पक्षाचे निंदक परस्पराना दोष देत आहेत. आता या यादीत मनुस्मृती या आणखी एका मुद्याची भर पडणार की काय, असे वाटू लागले आहे. सध्या देशभर समरसता अभियान चालवित असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय सह-प्रचार प्रमुख जे. नंदकुमार यांनी मनुस्मृतीचा मुद्दा नव्याने चर्चेत आणला आहे. कोणताही हिंदू मनुस्मृती मानत नाही, उलट हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी काही लोक जाणीवपूर्वक मनुस्मृतीला चर्चेत आणू पाहात आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. आम्ही मनुस्मृती नव्हे, तर आंबेडकर स्मृती (राज्यघटना) मानतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. संघ मनुस्मृतीऐवजी राज्यघटनेला मानत असेल, तर ते स्वागतार्हच म्हणावे लागेल; पण आता काहीही औचित्य वा निमित्त नसताना मनुस्मृती पुन्हा चर्चेत आणण्यामागचे कारण काय? जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) अफझल गुरूच्या फाशीचा निषेध झाल्यानंतर काही दिवसांनी, संघ परिवारातील विद्यार्थी संघटना असलेल्या अ. भा. विद्यार्थी संघटेनेने जेएनयूच्या आवारात मनुस्मृतीचे दहन केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मनुस्मृतीची चर्चा सुरू होणे, हा निव्वळ योगायोग म्हणावा, की त्यामागे संघ परिवाराचे काही निश्चित असे तर्कशास्त्र आहे? सध्या देशात पाच राज्यांमधील विधानसभांची निवडणूक सुरू असली तरी, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना वेध लागले आहेत, ते उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे! लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर अवघ्या वर्षभरातच पिछेहाट सुरू झालेल्या भाजपासाठी तर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक म्हणजे जीवनमरणाचाच विषय आहे. त्या राज्यात भाजपाला सत्तारुढ समाजवादी पक्षासोबतच मायावतींच्या नेतृत्वातील बहुजन समाज पक्षाशीही टक्कर द्यावी लागणार आहे. दलित मतांचे राजकारण करणाऱ्या मायावतींनी, जेएनयूमधील अभाविपप्रणित मनुस्मृती दहनानंतर मनुस्मृती दहनाची आवश्यकता नसल्याचे विधान केले होते. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी मायावती तूर्त बौद्ध धर्माचा अंगिकार करणार नसल्याची बातमी आली होती. दहा वर्षांपूर्वी दलित व ब्राह्मण समाजाची अशक्यप्राय वाटणारी युती प्रत्यक्षात घडवून सत्ता हस्तगत करणाऱ्या मायावतींचा आताही तोच प्रयत्न आहे. मनुस्मृती दहनाची आवश्यकता नसल्याचे वक्तव्य आणि बौद्ध धर्माचा तूर्त अंगिकार न करणे, हे त्यांचे दोन्ही डावपेच दलित-ब्राह्मण युती घडविण्याशी जोडले जात आहेत. या पार्श्वभूमीवर दलित मतदारांचा बुद्धिभेद घडविण्यासाठी तर जाणीवपूर्वक मनुस्मृतीचा मुद्दा उकरून काढला जात नाही ना?