शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हायव्हल ऑफ द ‘फिट्टेस्ट’ नव्हे, सर्व्हायव्हल ऑफ द ‘काइण्डेस्ट’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 09:31 IST

माणसाच्या उत्क्रांतीत करुणा अंगभूत आहे. आपण युगानुयुगे एकमेकांना मदत करूनच जगलो, इथवर पोहोचलो आहोत; हे विसरता कामा नये!

अमृत बंग, सहसंचालक, ‘सर्च’, ‘निर्माण’ या युवा उपक्रमाचे प्रमुख

तुम्हाला कधी फ्रॅक्चर झालंय? कधी डिप्रेशन वा आत्यंतिक चिंतेचा सामना केलाय? कधी ताप, संसर्गदोष झालाय?- असे काहीही झाले  असल्यास तुम्ही कमजोर आहात, दयनीय आहात, जगण्यास अपात्र आहात... तुम्ही मरायला हवे. शेवटी ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिट्टेस्ट’ हा निसर्गाचा नियम आहे, हेच तर उत्क्रांतीचे तत्त्व आहे, नाही का?

याच नियमाने आजारी व कुपोषित नवजात बाळांना वाचवणे चूक आहे, ते कमजोर असल्याने त्यांनी जगू नये,  काटक व बलवान बाळांनीच जगावे. याच तर्काला अनुसरून पुढे असेही म्हणता येईल की, अख्खे वैद्यकशास्त्रच चुकीचे आहे, गरिबांना  मदत करणाऱ्या सरकारच्या सर्व योजना चूक आहेत, सेवाभावी स्वयंसेवी संस्था चूक आहेत, जे जे मागे आहेत ते ते सर्वजण जगण्या व जगवण्यालायक नाहीत.. ही तर्कसंगती योग्य की अयोग्य?

उत्क्रांतीच्या सिद्धांताचा जनक चार्ल्स डार्विनची उद्या (१२ फेब्रुवारी)  जयंती! मानवी इतिहासातल्या सर्वात महान वैज्ञानिकांपैकी एक अशा डार्विनने ‘नैसर्गिक निवडीतून उत्क्रांती’ या  सर्वात प्रेरणादायी व भव्य गैर-गणितीय थेअरीतून विज्ञानाच्या इतिहासातील एक नाट्यमय क्रांती घडवली. दुर्दैवाने  डार्विनच्या उत्तुंग सिद्धांताचा अत्यंत चुकीचा अर्थ लावून त्यातून स्वत:ला सोयीस्कर मात्र समाजाला धोकादायक धोरणांचा अतिशय जोरात प्रचार करण्यात आला. ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिट्टेस्ट’ हे त्याचेच ओंगळ रूप. मुळात हे वाक्य चार्ल्स डार्विनचे नाहीच तर ब्रिटिश सोशिओलॉजिस्ट हर्बर्ट स्पेन्सर यांचे. ते डार्विनला चिकटवणे वा जणू डार्विन त्याचा समर्थक होता, असे मानणे हेच मुद्दलात चूक. 

डार्विनच्या मांडणीनुसार नैसर्गिक निवड ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे वातावरणास अनुकूल असे आनुवंशिक गुणधर्म असलेले जीव त्यांच्या अनेक संतती पुनरुत्पादित करण्यासाठी पुरेसा दीर्घकाळ जगतात आणि  हे अनुकूल जीन्स पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवतात.  जीवशास्त्रात, तंदुरुस्तीची व्याख्या ही पुनरुत्पादक यश आणि जीन्स पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची क्षमता यावर लक्ष केंद्रित करते, सर्वात मजबूत किंवा वेगवान किंवा श्रीमंत किंवा सत्ताधारी असणे यावर नाही. आजच्या गुंतागुंतीच्या आणि वेगाने बदलणाऱ्या जगात, उद्याच्यासाठी कोणते गुण सर्वात योग्य असतील, हे आपल्याला आताच ठाऊक नाही. म्हणूनच सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे विविधतेचे जतन करणे, विविधतेला प्रोत्साहन देणे, ज्यामुळे उद्याच्या कोणत्याही पर्यावरणीय परिस्थितीसाठी आणि आव्हानांसाठी आपण तयार राहू. दुसरी गोष्ट म्हणजे करुणा व एकमेकांना मदत करण्यासाठीची तयारी.  एकमेकांबद्दलची सहानुभूती, लहान मुलांची व आपापल्या समाजाची काळजी घेण्याच्या  प्रवृत्तीमुळेच मानवजात युगानुयुगे टिकून राहिली; शारीरिक सामर्थ्यामुळे! माणसाच्या उत्क्रांतीमध्ये करुणा अंगभूत आहे आणि आपण एकमेकांना मदत करूनच जगलो आहोत. 

डार्विननेच त्याच्या ‘द डिसेंट ऑफ मॅन’ या पुस्तकात म्हटले आहे की, ‘ज्या समुदायांमध्ये सर्वात जास्त सहानुभूती असलेल्या सदस्यांचा समावेश आहे, ते सर्वोत्कृष्ट वाढतील.’ या ‘सर्व्हायव्हल ऑफ द काइण्डेस्ट’साठी आपण सुयोग्य बनूया का?  डार्विनसारखेच १२ फेब्रुवारी १८०९ला जन्मलेल्या अब्राहम लिंकन यांच्याकडूनही आपल्याला हे शिकण्यासारखे आहे!     amrutabang@gmail.com

English
हिंदी सारांश
Web Title : Survival of the Kindest, Not Just the Fittest: Darwin's True Legacy

Web Summary : Darwin's theory emphasizes cooperation, not just strength, for survival. Kindness and mutual support drive human evolution, ensuring the community thrives. Compassion, not competition, defines our future.