शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

PM Narendra Modi Birthday: अद्भूत आत्मबलाचा चकित करणारा बळकट स्रोत म्हणजे पंतप्रधान मोदी: नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 8:43 AM

भारताने स्वातंत्र्योत्तर काळात पाहिलेल्या व अनुभवलेल्या पंतप्रधानांपैकी विद्यमान पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे व्यक्तिमत्त्व सर्वात वेगळे आहे.

भारताने स्वातंत्र्योत्तर काळात पाहिलेल्या व अनुभवलेल्या पंतप्रधानांपैकी विद्यमान पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे व्यक्तिमत्त्व सर्वात वेगळे आहे. आत्यंतिक राष्ट्रप्रेम, प्रचंड कष्ट घेण्याची तयारी, निर्धार व निर्णय क्षमता, भारताला परम वैभव प्राप्त करून देण्यासाठी ध्यास घेऊन काम करण्याची धाटणी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. भारताला सर्व क्षेत्रांत आत्मनिर्भर बनवण्यासाठी चहू बाजूंनी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या मागे नरेंद्रभाईंचे दूरदृष्टीचे नेतृत्व आणि मार्गदर्शन आहे. गेल्या सात वर्षांहून अधिक काळात त्यांनी दाखविलेले आत्मबल माझ्या दृष्टीने केवळ अभूतपूर्व असे आहे.

भाजप हा पक्ष एकेकाळी राजकीय अस्पृश्यतेचा बळी  होता. ती अस्पृश्यता आमचे नेते अटलजी, अडवाणीजी यांनी संपवली आणि भाजपने एनडीएच्या निमित्ताने देशाच्या राजकारणालाच नव्हे; तर एकूण स्वरूपाला एक नवी दिशा दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवर आज भारताचा डंका वाजतो आहे. देशात एम्स, आयआयएम, आयआयटी यांसारख्या ख्यातकीर्त शैक्षणिक संस्थांचे जाळे विणले जाते आहे. उज्ज्वला किंवा जनधन योजनांसारख्या उपक्रमांनी सामान्य जनांचे कल्याण होते आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुले बांधली जात आहेत. देशाच्या सीमा आता अधिक सुरक्षित आहेत, व्यापार उदिमाला प्रोत्साहन, पायाभूत सुविधांचा विकास, करप्रणालीचे सुसूत्रीकरण, तीन तलाकसारख्या अनिष्ट पद्धतीचे उच्चाटन,  प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराची उभारणी, जम्मू - काश्मीरमध्ये तसेच अनेक प्रलंबित प्रश्न त्यांनी मार्गी लावले. 

कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान त्यांच्या नेतृत्त्वाचा कस लागला. परंतु, त्याही संकटातून त्यांच्या नेतृत्त्वात आपण मार्गक्रमण केले. आज भारत जगातील सर्वात मोठी मोफत लसीकरणाची मोहीम राबवीत आहे. सबका साथ, सबका विकास असे ब्रीद ठेवून नरेंद्रभाई ज्या पद्धतीने या देशाला पुढे नेत आहेत, ते कार्य अद्वितीयच मानले पाहिजे. 

एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेली व्यक्ती भारताची पंतप्रधान होऊ शकते, हे जसे त्यांच्या निमित्ताने सिद्ध झाले, तसेच प्रखर राष्ट्रवादाचा विचार देशाच्या वैभवात वेगळ्या प्रकारची भर घालू शकतो, हेही सिद्ध झाले आहे. मोदीजींना  स्वार्थ नाही. त्यामुळे त्यांची राष्ट्रसेवा ही निःस्पृह स्वरुपाची आहे. तिला आत्मबलाचे अधिष्ठान आहे आणि अतीव राष्ट्रप्रेमाचे, मेहनतीचे, कल्पकतेचे कोंदण आहे. त्यांना ईश्वराने राष्ट्रकार्य आणि लोकसेवेसाठी उदंड आयुरारोग्य द्यावे, हीच त्यांच्या जन्मदिनी ईश्वराला प्रार्थना! 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी