शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नवव्या महिन्यात गर्भवती अडीचशे किलोमीटर चालली; तेव्हा 'लोकमत'ची लेखणीही तिच्या मदतीला धावली !

By सचिन जवळकोटे | Updated: May 16, 2020 08:54 IST

सोलापुरात 'पत्रकारिता परमोधर्म:'चा नवा अध्याय..

- सचिन जवळकोटे

डोक्यावर रणरणतं ऊन. पायाखाली वितळू लागलेलं डांबर. चाळीस-बेचाळीस अंश सेल्सिअस तापमानात ती कशीबशी आपलं पोट सावरत निघालेली. तिच्यासोबत असलेल्या पतीचा वेग जास्त होता. मात्र, तिच्यासाठी तोही हळुवारपणे चालू लागलेला. त्यांच्यासोबत असलेले बाकीचे खूप पुढे गेलेले. रस्त्यावर चिटपाखरू देखील नव्हतं. नजरेआड होईपर्यंतचा हायवे पुरता सन्नाटा घेऊन पसरलेला. नाही म्हणायला एखादं दुसरं वाहन मागून पुढून जायचं. मात्र, 'त्याला आता थांबवावं,' ही इच्छाही या दाम्पत्याची न राहिलेली. कोणी आपल्यासाठी थांबणार नाही, याची त्यांना पुरेशी खात्री झालेली.. कारण हा दाहक प्रवास गेले पाच-सहा दिवस ते सातत्याने करत होते. रात्री कुठेतरी हायवेलगतच्या झाडाखाली पाठ टेकून थोडीशी विश्रांती घेत होते. भल्या पहाटे पुन्हा उठून चालत होते.

 होय.. पुण्याहून सोलापूरपर्यंत खडत-रखडत पायी चालत हे जोडपं आलं होतं. आता आपल्या कानावर रोज हजारो किलोमीटर चालणाऱ्या मजुरांच्या कहाण्या आदळताहेत. त्यामुळे एवढ्याशा अडीचशे किलोमीटरचं काय कौतुक, असाही सवाल बंद दरवाजाच्या घरात बसून आपल्याला पडू शकतो.. तर मंडळी, हीच तर आहे या दाम्पत्याची मोठी कहाणी. केवळ पोटासाठी नव्हे तर पोटातल्या बाळासाठी संकटांशी संघर्ष करणाऱ्या 'शीला'ची आहे ही दर्दभरी कहाणी. नवव्या महिन्यात एखाद्या गर्भवतीनं एवढी पायपीट केल्याची कदाचित ही पहिलीच असावी घटना.

नाव तिचं शीला. पती खासगी वायरमनचं काम करतो. दोघेही मूळचे गुलबर्ग्याचे. कर्नाटकातले. पोट भरण्यासाठी पुण्यात स्थायिक झालेले. त्यांच्या संसारात आता लवकरच 'गुड न्यूज'ही येणार आहे. याच महिन्यात तिच्या बाळंतपणाची तारीख डॉक्टरांनी  सांगितलेली. केवळ याच कारणामुळे दीड महिन्यांपूर्वी 'लॉकडाऊन' होऊनही ते दोघे पुण्यातच थांबलेले. मात्र, या काळात त्यांना खूप विचित्र प्रसंगांना सामोरं जावं लागलं. नेहमीच्या दवाखान्यात जाताना कुठलंच वाहन मिळालं नाही. आजूबाजूचे इतर दवाखानेही बंद झालेले. त्यावेळी दोघांच्या पूर्णपणे लक्षात आलं की, पुण्यात या काळात बाळंतपण करणं खूप त्रासदायक. खूप अवघड. त्यापेक्षा कसंही करून आपल्या गावी गेलं तर घरचे तरी मदतीला येऊ शकतात.. म्हणून त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपलं गाव गाठण्याचा निर्धार केला. योगायोगानं पुण्यातले इतर नातेवाईकही याच वेळी निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांनीही गावाकडची वाट धरली.

मात्र, जसं-जसं ते चालत पुढे आले तसं त्यांच्या लक्षात आलं की, एकही गाडी आपल्याला रस्त्यात मिळणार नाही. तरीही मोठ्या आशेनं त्यांनी चालणं चालूच ठेवलं. हडपसरचा स्टॉप गेला. लोणी-काळभोरही मागं पडलं, तरीही कुठली गाडी ब्रेक दाबायलाही तयार नव्हती. एखादं दुसरं वाहन तिच्या पोटाकडे पाहून सहानुभूतीनं क्षणभर थांबायचं. मात्र, माणुसकीपेक्षाही कोरोनाची भीती अधिक मोठी ठरल्याचं ड्रायव्हरच्या डोळ्यातून दिसून यायचं. गाडी निघून जायची. दोघेही हताश होऊन एकमेकांकडे बघायचे. पुन्हा हातात हात घालून चालत निघायचे. नाही म्हणायला त्यांच्या बॅगा इतर नातेवाईकांनी घेतल्या होत्या, एवढंच काय ते समाधान. हायवेवरच्या कैक गावांमध्ये त्यांना जरी सहारा मिळाला नसला, किमान तिरस्कार तरी त्यांच्या वाटेला नाही आला. काही ठिकाणी स्वतःहून डबेही मिळाले. कुठे एखाद्या मावशीनं गरमागरम चपाती करून दिली, तर कुठं एखाद्या आजीबाईनं लांबून स्वतःच्या डोक्यावर हाताची बोटं मुडपत तिला आशीर्वादही दिले. पंधराची बाटली पंचवीस रुपयांना विकणाऱ्या एखाद्या बंद टपरीवाल्यानं पैसे न घेताच पाणीही दिलं.

   असं करत-करत दोघे सोलापूरपर्यंत चालत आले. सोलापूरजवळ आल्यानंतर जुना पुणे नाक्याच्या पुलाखाली सुदैवानं यांची भेट 'लोकमत टीम'सोबत झाली. फोटोग्राफर यशवंत सादूल यांनी घटनेचं गांभीर्य तत्काळ ओळखलं. त्यांनी पटापट फोटो काढले. त्यांची मुलाखतही घेतली.

 खरं तर, 'नवव्या महिन्यातल्या गर्भवती स्त्रीचा अडीचशे किलोमीटरचा पायी प्रवास,' एवढी बिग स्टोरी हाती आल्यानंतर टीम तातडीनं ऑफिसकडे रवाना झाली असती. मात्र, या 'लोकमत टीम'नं पत्रकारितेइतकाच माणुसकीचाही धर्म खूप मोठा असल्याचा प्रत्यय या चौकाला आणून दिला. पुलाखाली उभारलेल्या एका ट्रॅफिक हवालदाराला तिच्या शारीरिक अवस्थेची माहिती दिल्यानंतर यंत्रणा हलली. भले हा पूल 'वसुली'साठी कितीही बदनाम असला तरी 'सोलापुरी खाकी'मधली 'माणुसकीची दिलदारी' सर्वश्रुत होती. त्या दाम्पत्याला पुलाखाली सावलीत थांबवून ठेवलं गेलं. बऱ्याच काळानंतर एक मोटरसायकलस्वार समोरून येताना दिसला. पोलिसाला पाहून त्यांनं घाबरून दुचाकीचा वेग वाढविला. मात्र, हवालदारानं पळत जाऊन त्याला रस्त्यातच थांबविलं. नीट समजावून सांगितलं. आदेश नव्हे तर विनंती केली.

  मग काय.. त्यानं या दाम्पत्याला आपल्या दुचाकीवर बसविलं. बसताना ती थोडीफार अवघडली. मात्र, तळपत्या उन्हात कसंबसं चालण्यापेक्षा हा त्रास तिला क्षणभर बरा वाटला असावा. त्या दुचाकीस्वारानं त्यांना हैदराबाद रस्त्यावरील मार्केट यार्डाजवळ सोडलं. योगायोगानं कर्नाटकला जाणारी काही वाहनं तिथंच थांबली होती. त्यांनाही नीट समजावून विनंती केल्यानंतर या दाम्पत्याची कष्टातून सुटका झाली. त्यांच्या गावी जाण्यासाठी त्यांना गाडी मिळाली. जाताना 'लोकमत टीम'कडं अत्यंत कृतज्ञतेनं पाहणाऱ्या या दाम्पत्याच्या डोळ्यात पत्रकारितेबद्दलचा विश्वास अन् आदर स्पष्टपणे उमटला होता. कारण, 'पत्रकारिता परमो धर्म:' लोकमत नेहमीच जपत आला होता.

 ( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसLokmatलोकमत