शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

न्यूझीलंडमध्ये तरुणांची ‘विडी-काडी’ बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 09:01 IST

२०२२ साली १४ वर्षांचे असतील अशा व्यक्तींना न्यूझीलंडमध्ये कायद्याने धूम्रपान करता येणार नाही! धूम्रपान टप्प्याटप्प्याने संपवणे हे त्यांचे ध्येय आहे!

हेरंब कुलकर्णी, शिक्षण चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्तेव्यसनांवर नियंत्रण आणण्यासाठी सरसकट बंदी घालावी की नियंत्रण करावे ? - हा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. चंद्रपूरची दारूबंदी उठवल्यानंतर बंदीवर चर्चा झाल्या; परंतु त्यातून फार काही निष्पन्न झाले नाही. ज्याचे व्यसन लागते त्या पदार्थांवर बंदी आणि नियंत्रण याबाबत टप्प्याटप्प्याने व्यावहारिक निर्णय घेतले व नियंत्रण वाढवत नेले, पुरवठा कमी केला, तर त्याचा परिणाम अधिक प्रभावी होईल का? - हा प्रश्न व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये सतत चर्चेचा राहिलेला आहे. याबाबत न्यूझीलंड या देशाने एक मॉडेल समोर ठेवले आहे. धूम्रपानाला परवाना असण्याचे कायदेशीर वय टप्प्याटप्प्याने खाली आणत धूम्रपानावर सरसकट बंदी न घालता ते टप्प्याटप्याने कमी करत संपवण्याचे (फेझिंग आउट) हे धोरण आहे. त्याचा सर्व देशांनी व व्यसनमुक्ती कार्यकर्त्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे.

तसा तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्याचा इतिहास जुना आहे. १५७५ साली रोमन कॅथॉलिक चर्चने पहिली बंदी घातली, १६२७ मध्ये रशियात, १७२३ मध्ये बर्लिनमध्ये व १९९० साली कॅलिफोर्निया शहरात बार, हॉटेलात धूम्रपान बंदी घालण्यात आली. त्यानंतर  इटली, आयर्लंड, तुर्की आदी देशांत कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदीचे वेगवेगळे प्रयत्न झाले. २०१२ मध्ये ब्राझीलने सर्व प्रकारच्या तंबाखूवर बंदी घातली. या सर्व बंदी- उपायांचा कमी- अधिक प्रमाणात नियंत्रणासाठी उपयोग झाला.

न्यूझीलंडने मात्र याबाबतीत थोडे वेगळे पाऊल  उचलले आहे.  २०२२ साली ज्यांचे वय १४ वर्षांचे असेल अशा व्यक्तींना धूम्रपान करता येणार नाही; असा कायदाच या देशात होऊ घातला आहे. याचा अर्थ पुढील वर्षी १४ वर्षांची होणारी मुले यानंतरच्या आयुष्यात कधीच कायदेशीररीत्या धूम्रपान करू शकणार नाहीत व त्या खालील वयोगटाच्या सर्वच मुलांच्या आयुष्यात धूम्रपान बंदी असेल, अशी ही कल्पना! ‘आमच्या देशातल्या तरुण मुलांच्या हाती सिगारेट कधी लागूच नये,’ असा उद्देश  असल्याचे देशाच्या आरोग्यमंत्री डॉ. आयेशा वेरल सांगतात. 

जवळपास ५० लाख लोकसंख्या असलेल्या या देशाला धूम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण २०२५ पर्यंत पाच टक्क्यांच्याही खाली आणायचे आहे. या देशात २००८ नंतर जन्माला आलेली कोणीही व्यक्ती आयुष्यभर सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करू शकणार नाही. देशात १५ वर्षांखालील ११.६ टक्के तरुण सिगारेट ओढतात.  मूळ रहिवासी असलेल्या माओरी समूहात हे प्रमाण २९ टक्के आहे. 

संपूर्ण देशात सर्व वयोगटांसाठी बंदी घातली की, त्यात विरोध व काळाबाजार सुरू होतो व शासन यंत्रणा इतक्या मोठ्या संख्येने व्यसनांच्या काळ्या बाजाराला आळा घालू शकत नाही. आपल्याकडील गुटखाबंदी हे अशा  अपयशी आणि विसंगत बंदीचे सर्वांत प्रभावी उदाहरण आहे! आटोकाट प्रयत्न करूनही दुकानात पसरलेल्या गुटख्याच्या पुड्यांबाबत शासन काहीच करू शकले नाही. अशा स्थितीत टप्प्याटप्प्याने बंदी केली, तर विशिष्ट वयोगटावरच लक्ष केंद्रित करायचे असल्याने यंत्रणेचे काम सोपे होते व टप्प्याटप्प्याने पुढे जाता येते, हे एक स्वागतार्ह मॉडेल आहे. व्यसने करण्याचे कायदेशीर वय १८ की  २१ याचा वाद आपण घालत असताना शाळकरी वयात अगदी लहानपणीच मुले व्यसनात ओढली जात आहेत. अशावेळी भारतात आणि महाराष्ट्रातही तरुण मुलांचा वयोगट लक्ष्य करून आपण अशा निर्णयांचा विचार करायला हवा.

अर्थात, अशा निर्णयात फक्त धोके असू शकतात. मुख्यत: सर्व वयोगटांत सरसकट बंदी नसल्याने मोठ्या वयोगटाची व्यसनाधीन माणसे तरुणांच्या आजूबाजूला असतात.अशावेळी लक्ष्यगटाची व्यसनमुक्ती टिकवणे हे आव्हान असते. न्यूझीलंडच्या या धोरणात्म्क निर्णायाला दुसरीही एक स्वागतार्ह बाजू आहे :  व्यसनांचा पुरवठा कमी कमी करत न्यायचा. त्यासाठी त्यांनी तंबाखू आणि धूम्रपानाशी संबंधित दुकानांची संख्याच कमी करायचा निर्णय घेतला आहे.   त्याचबरोबर अति तीव्र तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालून सौम्य तंबाखू वापरणाऱ्या उत्पादनांना परवानगी दिली आहे. हे दोन्ही निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहेत.  अशा धोरणांचा विचार आपण महाराष्ट्रात अवश्य करायला हवा. 

दारू दुकानांच्या परवान्यासाठी लोकसंख्येची अट अण्णा हजारे यांच्या प्रयत्नाने लावण्यात आली होती. ती काढून टाकण्यात आली. आज कितीही कमी लोकसंख्येच्या गावात दारूचे दुकान उघडता येते. त्यातून व्यसनाधीनता वाढते आहे. गावाच्या परवानगीची अटही काढून टाकण्यात आली. व्यसनाचा पुरवठा कमी कमी केला, तर नियंत्रण आणणे सोपे जाते, हा महत्त्वाचा धडा न्यूझीलंडच्या या निर्णयात आहे. महाराष्ट्राने या निर्णयाच्या आधारे तसा विचार करायला हरकत नाही.महाराष्ट्रात शाळांच्या जवळ दुकानांत तंबाखूजन्य पदार्थ मिळणार नाहीत, असा नियम करूनही सर्रास विक्री सुरू आहे. राज्यात गुटखाबंदी आहे हे प्रत्यक्ष खेड्यापाड्यांतल्या दुकानांमध्ये फिरल्यावर खरेसुद्धा वाटत नाही. ती जबाबदारी अन्न व नागरी प्रशासन विभागाकडे व त्याचे कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी अशा कोंडीत या बंदी अडकल्या आहेत.

राज्यस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत व्यसनमुक्तीसाठी नेमलेल्या समित्या कार्यरत नाहीत त्या सक्रिय करायला हव्यात!सुदैवाने महाराष्ट्रात तंबाखूमुक्त शाळा ही चळवळ वेगाने काम करते आहे व त्या या चळवळीतून अनेक शाळा व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करत आहेत. नशाबंदी मंडळ व सलाम मुंबई फाउंडेशन या संस्थांनी धारावी पासून तंबाखूजन्य पदार्थांविरोधी मोहीम सुरू केली आहे. अशा प्रयत्नांची संख्या वाढायला हवी. 

‘व्यसनांवर बंदी की नियंत्रण’ या वादात न अडकता टप्प्याटप्प्याने बंदी व नियंत्रणाची भूमिका घेऊन न्यूझीलंडने खूप महत्त्वाची दिशा दाखवली आहे. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारनेही असा विचार करायला हरकत नाही.herambkulkarni1971@gmail. com

टॅग्स :Smokingधूम्रपानNew Zealandन्यूझीलंड