शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

न्यू नॉर्मल जगात पासवर्ड फुटणार, पैसे लुटले जाणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 08:23 IST

डार्क वेब वापरकर्त्यांना तीन गोष्टी देतं : ओळख लपवण्याची सोय, थ्रिल आणि वैविध्य म्हणून तर हॅकिंगच्या लटकत्या तलवारीचा धोका अधिक गडद आहे !

- दीपक शिकारपूर, उद्योजक, संगणक साक्षरता प्रसारककोरोनाच्या उद्रेकामुळे जगभरातील काम करण्याच्या पद्धतीवर ‘न भूतो न भविष्यति’ असा परिणाम झाला.  कामकाजाच्या नवनवीन पद्धतींचा अवलंब करण्याकडे सर्वच देशांचा कल वाढला. न्यू नॉर्मल जीवन पद्धतीत निर्जंतुकीकरण, डिजिटल उपकरणे वापरून व्हर्च्युअल नाते संबंध यांचा मोठा वाटा असणार आहे . वर्क फ्रॉम होम हे आवडो वा न आवडो, पण आता अनेकांच्या हळूहळू अंगवळणी पडले आहे. यामुळे सतत ऑनलाइन असणे हे अनेकांचे वास्तव आहे. त्यात काहींची नोकरी गेली आहे किंवा धोक्यात आहे. अशा वेळी  झटपट अर्थार्जन करण्यासाठी काही अनुभवी संगणक तद्न्य सायबर गुन्हेगारीचा मार्ग पत्करत आहेत. 

 संगणकप्रणाली ‘हॅक’ करून माहिती चोरण्याची तर इतकी विविध तंत्रे आहेत की बस्स !  सोशल मीडियावर ह्या बाबतीत मार्गदर्शन करायला काही तज्ज्ञ हॅकर्स व गुन्हेगार तयारच असतात. नेटवर केलेल्या व्यवहारातील फसवणूक, इमेलचा वा सोशल नेटवर्कवरील खात्याचा पासवर्ड मिळवून त्यावर प्रक्षोभक मजकूर घुसडणे, नेटबँकिंगशी संलग्न असलेल्या खात्यातील पैसे चोरणे वा अन्यत्र वळवणे, औद्योगिक कंपन्यांच्या वेबसाइट्सवर त्यांच्या उत्पादनांबाबत चुकीची माहिती लिहिणे वा असलेली पुसून टाकणे, सरकारी विभागांच्या वेबसाइट्सवर चुकीची माहिती लिहून दिशाभूल करणे - संगणकीय महाजालाच्या प्रसारासोबतच हॅकिंगची व्याप्तीदेखील जगभर तितक्याच वेगाने वाढते आहे.
इथे ज्याचा वापर होतो त्या सायबर प्रदेशाचे नाव आहे डार्क वेब. डार्क वेब हा इंटरनेटचा असा  एक कोपरा आहे जिथे हजारो वेबसाइट अनोळखी राहून काळेधंदे करत असतात. या साइट्स कुठल्याही सर्च इंजिनवर लिस्ट होत नाहीत. हा एक बंकर आहे. डार्क वेबची सुरुवात १९९०च्या दशकात झाली. अमेरिकी लष्करानं त्यांची गोपनीय माहिती कुणाच्या हाती लागू नये यासाठी डार्क वेबची सुरुवात केली होती, सध्या मात्र इथे अनेक प्रकारचे काळे धंदे चालतात. क्लिष्ट  एनक्रिप्शन किंवा नेटवर्क लेअरिंगचा वापर केला जातो.  काही डार्क तज्ज्ञ मानधन घेऊन गुन्हेगारांना मार्गदर्शनही करतात. डार्कनेट वेबसाइट्समधील संकेतस्थळ पत्ता  अनोख्या स्वरूपाचा असतो व तो सतत बदलत असतो त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना त्याचा माग  काढणे जिकिरीचे असते. खुले  इंटरनेट आणि सर्वसामान्य सर्च इंजिनवर होणाऱ्या व्यवहारांवर लक्ष ठेवणं सोपं असतं.  तुमच्या वापराचा इतिहास तिथे साठवला जातो. गुप्तचर संस्था की-वर्डवरून कोणतीही माहिती मिळवू शकतात, पण डार्कवेबवर लक्ष ठेवणं सोपं नाही. येथील सायबर व्यवहारांसाठी पैशांची देवाणघेवाण आभासी चलन (क्रिप्टोकरन्सी) द्वारे  केली जाते. या डिजिटल चलनाचा मागोवा ठेवणं महाकठीण आहे. त्यामुळेच बेकायदेशीर व्यवसायांसाठी त्याचा वापर होतो. डार्क वेब वापरकर्त्यांना  तीन सोयी  देतं : ओळख लपवण्याची सोय, थ्रिल  आणि वैविध्य !  अनेक संगणक प्रशिक्षित व्यक्ती केवळ लोभापोटी अनेक गुन्हे करण्यासाठी प्रवृत्त होत आहेत. संगणक उद्योगांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून भरीव तरतूद यासाठी केली पाहिजे. हजारोंच्या संख्येने सायबर सुरक्षा व्यावसायिक निर्माण व्हायला हवेत. भविष्यात हे एक उत्कृष्ट करिअर ठरणार, हे नक्की !           deepak@deepakshikarpur.com 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम