शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

निषेधार्ह संवेदनशून्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 05:27 IST

इराकमधील मोसुल या शहराजवळ असलेल्या बादोश या खेड्यालगतच्या एका सामूहिक दफनभूमीत ३९ भारतीयांचे मृतदेह सापडले असून त्या साऱ्यांची इराकमधील इसीस या दहशतवादी संघटनेने निर्घृण हत्या केल्याचे आढळले आहे.

इराकमधील मोसुल या शहराजवळ असलेल्या बादोश या खेड्यालगतच्या एका सामूहिक दफनभूमीत ३९ भारतीयांचे मृतदेह सापडले असून त्या साऱ्यांची इराकमधील इसीस या दहशतवादी संघटनेने निर्घृण हत्या केल्याचे आढळले आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या या हत्याकांडाविषयी भारत सरकारने आजवर मौन पाळले. मृतांच्या नातेवाईकांना त्यांच्या मृत्यूची साधी खबरही मिळू दिली नाही. उलट ही सारी माणसे हयात असल्याच्या भ्रमातच त्यांना ठेवले गेले. ‘इराक सरकारकडून अधिकृतरीत्या यासंबंधीची माहिती येण्याआधी ती जाहीर करणे परराष्टÑ खात्याच्या नियमात बसणारे नाही म्हणून ही गुुप्तता राखली गेली.’ हे परराष्टÑ व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत याविषयीचे दिलेले स्पष्टीकरण कुणालाही मान्य होऊ नये असे आहे. तालिबान, बोको हराम किंवा अल् कायदा यासारख्या अतिरेकी संघटनांच्या हिंसक कारवाया साºया जगाला दूरचित्रवाहिन्यांवर पाहता येतात. बोको हरामने अपहृत केलेल्या तीनशेवर मुलींची त्यांच्या बंदिवासातील छायाचित्रे जगाने अशी पाहिली आहेत. तालिबानांनी अफगाणिस्तानच्या फुटबॉल मैदानावर अनेक दुर्दैवी स्त्रियांच्या डोक्यात गोळ्या घालून त्यांना मृत्युदंड दिल्याची भीषण चित्रेही भारतासह साºया जगाने पाहिली. या स्थितीत प्रत्यक्ष भारतीय नागरिकांची इराकमध्ये सामूहिक हत्या झाली असल्याची माहिती भारत सरकारला इराक सरकारने सांगितल्यानंतरच समजावी ही बाब जेवढी संशयास्पद तेवढीच आपले परराष्टÑ खाते व त्याचे जगात वावरणारे लोक कमालीचे सुस्त व आपल्याच नागरिकांच्या जीवाविषयी भरपूर बेफिकीर असल्याचे उघड करणारी आहे. ही बाब तुम्ही एवढे दिवस का दडविली आणि मृतांच्या नातेवाईकांना त्याविषयीच्या भ्रमात का ठेवले हा विरोधी पक्षाने सरकारला संसदेत विचारलेला प्रश्न त्यामुळेच रास्त आहे आणि विरोधक आम्हाला बोलू देत नाहीत हा सरकार पक्षाचा कांगावाही त्याचमुळे खोटा व अमान्य होणारा आहे. आता या मृतांचे देह एवढ्या वर्षानंतर त्या सामूहिक दफनभूमीतून उकरून काढण्यात आले असून त्यांची डीएनए तपासणी करण्यात आली आहे. त्यातील एक अपवाद वगळता साºयांची ओळख पटली असून ते मृतदेह देशात आणायला परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री इराकला जात आहेत. तुमच्या घरचा माणूस मारला गेल्याचे वृत्त तब्बल चार वर्षांनी घरच्या लोकांना कळविणे ही बाब सरकारसाठी जेवढी लांच्छनास्पद तेवढीच त्याची बातमी देशापासून एवढा काळ दडवून ठेवण्याचे त्याचे कृत्यही निंद्य आहे. जगातील कोणताही लोकशाही व जागरूक देश आपल्या नागरिकांच्या जीविताबद्दल एवढा बेपर्वा वा निगरगट्ट असणार नाही आणि तसे सरकारही स्वत:ला डोळस म्हणवू शकणार नाही. सरकारांच्या सावध दृष्टीविषयीची एक गोष्ट येथे नोंदविण्याजोगी आहे. दुसºया महायुद्धात मृत्यू पावलेल्या आपल्या हजारो सैनिकांचे मृतदेह वॉशिंग्टनजवळील एका मोठ्या स्मशानभूमीत त्या देशाने पुरले आहेत. त्यातील तीन सैनिकांची ओळख पटू न शकल्याने त्यांच्या नातेवाईकांपर्यंत त्यांची खबर सरकारला पोहचविता आली नाही. तेवढ्यासाठी ते नातेवाईक कधी तरी त्यांचा शोध घेत या स्मशानभूमीत येतील म्हणून त्या सरकारने त्यांची ओळख पटविता यावी म्हणून लष्कराचे एक पथक त्या स्मशानभूमीत ४० वर्षांहून अधिक काळ तैनात ठेवले. ते पथक जॉर्ज बुश (ज्यू.) यांच्या कारकीर्दीतच तेथून काढले गेले. या पार्श्वभूमीवर आपल्या परराष्टÑ खात्याची संवेदनशून्यता निषेधार्ह म्हणावी अशीच आहे.

टॅग्स :ISISइसिस