शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
2
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
3
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
4
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
5
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
6
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
7
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
8
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
9
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
10
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
11
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
12
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
13
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
14
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?
15
दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
16
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
17
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
18
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
19
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
20
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 

'नेते' महामूर; पण 'लोकप्रतिनिधी' किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 07:27 IST

लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी पुरेसे लोकप्रतिनिधीही हवेत. त्या पातळीवर आपल्याला अजून बरीच मजल मारावी लागेल हे स्पष्टच आहे.

वरुण गांधी, खासदार लोकसभा

एक भारतीय खासदार देशातील सरासरी २५ लाख नागरिकांचे प्रतिनिधित्व करतो. याच्या तुलनेत अमेरिकन संसदेचा एक सामान्य सदस्य ७ लाख नागरिकांचे प्रतिनिधित्व करतो. अशाच प्रकारे पाकिस्तान नॅशनल असेम्ब्लीचा सदस्य ६ लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतो, तर बांगलादेशमध्ये हे प्रमाण ५ लाख नागरिक आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये भारतात ४१२६ आमदार, लोकसभेचे ५४३ सदस्य आणि २४५ राज्यसभेचे सदस्य होते.

आपल्याकडे लोककल्याणासाठी जबाबदार असे खासदार आणि आमदार संख्येने कमी आहेत. लोकशाही व्यवस्थेमध्ये अगदी सुरुवातीपासूनच आपण मर्यादित लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहिलो, असे दिसते आहे. भारतीय परिप्रेक्ष्यात हा एक मोठा विरोधाभास ठरतो. कारण आपल्याकडे प्रत्यक्षात गणना करता येणार नाहीत इतके राजकीय नेते आहेत, पन्नास शंभर प्रभागाच्या हजाराहून अधिक खासदार, लोकसभा नगरपरिषदा, महापालिका आणि २,३८,००० पंचायतींमध्ये मिळून राष्ट्रीय आणि राज्यपातळीवर सरासरी ५ ते ३० सदस्य असतात. अशा प्रकारे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी आणि कायदे करण्यासाठी पुरेसे लोकप्रतिनिधी नाही हे लगेच लक्षात येते.

आपली राजकीय व्यवस्था विषमतेच्या दोषाने ग्रस्त असल्याचेही आपण पाहतो. अन्य देशांच्या तुलनेत विधिमंडळाचे महत्त्व निवडक देशात नागरिकांच्या बाजूने झुकलेले दिसते. भारताच्या उलट अमेरिकेत भिन्न राजकीय व्यवस्था आहे. तेथे प्रत्येक राज्यातून अमेरिकेच्या सिनेटमध्ये दोन सिनेटर दिले जातात. ते कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेला संतुलित करतात. प्रायः असे दिसते की प्रमाणाबाहेर सत्ता देण्याला प्रोत्साहन दिले जाते. द्विपक्षीय राजकीय व्यवस्था असलेल्या देशात असे चालू शकते कारण तेथे देशभर दोनच पक्ष एकमेकांशी स्पर्धा करतात. भारतात बहुजिनसी राजकीय व्यवस्था असताना विभिन्न राज्यात योग्य नसलेल्या हिस्सेदारीचा अर्थ निवडक राजकीय पक्षांना दुसऱ्यांच्या विरोधात सशक्त करणे असा होतो. मात्र मतदारसंघांची पुनर्रचना केली तर वरुण गांधी त्याचेही परिणाम संभवतात. 

१९७१ ते २०११ या काळातील राजस्थान आणि केरळचे उदाहरण घेऊ. ७१ साली राजस्थानची लोकसंख्या २.५ कोटी होती, तर केरळची २.१ कोटी. ११ साली ती अनुक्रमे ६८ आणि ३.३ कोटी इतकी झाली. तशाच प्रकारे २०१९च्या निवडणुकांच्या आधी उत्तर प्रदेशमधील प्रत्येक खासदार ३० लाख मतदारांचे प्रतिनिधित्व करत होता त्याचवेळी लक्षद्वीपमधला खासदार ५५ हजार मतदारातून निवडून यायचा, संसदेतील जागा ७५३ पर्यंत गेल्याचे गृहीत धरले, तर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ यांना साधारणतः सहा टक्के इतके वाढीव प्रतिनिधित्व मिळेल तर कर्नाटकला ११ टक्के वाढ मिळेल. दरम्यान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान यासारख्या उत्तरेकडील राज्यातील जागांच्या संख्येत ६३ टक्के वाढ  होईल. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यास हिंदी भाषिक पट्ट्याचे वजन वाढेल आणि निवडक राष्ट्रीय पक्षांच्या हाती जास्त सत्ता जाईल.

तामिळनाडू, केरळ यांच्यासारख्या लोकसंख्यावाढ रोखणाऱ्या राज्यांना यातून शिक्षाच होईल. मतदारसंघांची पुनर्रचना अपरिहार्य असली तरी त्याचे गंभीर परिणाम कमी करता येतील. सर्वप्रथम संसदेतील जागा वाढवल्या पाहिजेत. राज्यांनी जागा गमावू नये यासाठी किमान ८४८ पर्यंत जागा असल्या पाहिजेत, जेणेकरून प्रमाणशीर प्रतिनिधित्व मिळू शकेल. केवळ लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांची पुनर्रचना होऊ नये, भौगोलिकता, आर्थिक उत्पादनशीलता, भाषिक इतिहास आणि एकंदर वाजवी मुद्दे लक्षात घेऊन ती केली जावी, सोप्या भाषेत सांगायचे तर बिहारची लोकसंख्या जास्त असली तरी संसदेत सिक्कीमचा आवाज ऐकू आला पाहिजे. पुनर्रचनेमुळे राज्यांना जाणाऱ्या निधीवर काय परिणाम होईल याचाही फेरविचार झाला पाहिजे.

लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुकांसाठी प्रमाणशीर प्रतिनिधित्वावर विचार करता येऊ शकतो. ऑस्ट्रेलियामध्ये कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीत मतदार एखादा उमेदवार पहिल्या फेरीत निवडून येऊ शकला नाही तर मतदारांच्या दुसऱ्या पसंतीचाही विचार होतो. सर्वात कमजोर उमेदवार बाजूला करून त्याची मते पुढच्या पसंतीच्या उमेदवाराला दिली जातात. एखाद्या उमेदवाराला स्पष्ट बहुमत मिळेपर्यंत असे केले जाते.

फ्रान्सच्या राष्ट्रीय असेम्ब्लीच्या निवडणुकीत दुहेरी मतपत्र प्रणालीची व्यवस्था आहे. पहिल्या फेरीत एखादा उमेदवार निवडून आला नाही तर दुसऱ्या फेरीत त्याच उमेदवारांचा विचार होतो ज्यांना आधीच्या फेरीत एकूण मतांच्या एक अष्टमांशपेक्षा जास्त मते मिळालेली असतात. भारतातील एक पसंतीची पद्धत निकाल त्वरित लावते; परंतु त्यात प्रायः एक आमदार बहुमताशिवाय कोणत्याही मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करू शकतो. आपल्याला अधिक राज्यांचीही गरज आहे. अमेरिकेचे सर्वात मोठे राज्य कॅलिफोर्नियाची लोकसंख्या केवळ ३९ लाख आहे. इतर राज्यांची सरासरी लोकसंख्या ५० ते ६० लाख आहे. भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसंख्या यापेक्षा नक्कीच अधिक आहे. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना १९५३ साली केली गेली होती. त्यावेळी १४ भाषिक राज्ये आणि सहा केंद्रशासित प्रदेश निर्माण केले गेले भारतात राज्यांची संख्या वाढवून ५० ते ७५ पर्यंत नेता येऊ शकते. आपल्याकडे राज्यांचा आकार छोटा झाला तर राजकीय वर्चस्वाविषयीची चिंता कमी होईल.

बुंदेलखंड, गुरखालॅण्ड, जम्मू, करू नाडू, कोंगू नाहू, मिथिला आणि सौराष्ट्र ही नवी राज्ये होऊ शकतात. आपल्याकडे भाषेच्या आधारावर पुष्कळ राज्ये आहेत. भारतात १००० पेक्षा अधिक शहरे आहेत, परंतु महापौरांची संख्या मात्र अजूनही शेकड्यामध्येच दिसते. लोकप्रतिनिधींची संख्या वाढवल्याने भारतातील लोकशाही मजबूत होईल. अशा प्रकारचे उपाय योजल्यास भारताच्या विविध भागात नागरिकांच्या चिंता कमी होतील आणि आपली लोकशाही व्यवस्था तंदुरुस्त होईल.