शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

मोर्शीकर गुरुजी

By admin | Updated: May 25, 2015 23:30 IST

मोर्शीकर गुरुजींच्या खिशात केस कापण्याची एक कात्री नेहमी राहायची. केस वाढवून हेअर स्टाईल करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या केसांवरून ही कात्री कधी फिरणार,

मोर्शीकर गुरुजींच्या खिशात केस कापण्याची एक कात्री नेहमी राहायची. केस वाढवून हेअर स्टाईल करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या केसांवरून ही कात्री कधी फिरणार, याचा नेम नसायचा. पण हेच मोर्शीकर गुरुजी शाळेची फी भरायला मुलांकडे पैसे नसले की खिशात हात घालायचे, त्यावेळी कात्रीऐवजी पैसे बाहेर निघायचे. पांढऱ्या केसांचा, मळकट कपडे घातलेला एक वृद्ध शिक्षक अकोला आणि आसपासच्या खेड्यांतील कुठल्या तरी शाळेत प्रार्थनेच्या वेळी रोज जायचा. ‘मला मुलांसोबत बोलायचे आहे! बोलू द्याल का, तुमचे फक्त पाचच मिनिटे हवीत!’ ही विनंती ऐकून शिक्षकांना अप्रूप वाटायचे आणि मुलांना कुतूहल. मग हा शिक्षक पानाफुलांच्या, माणसांच्या गोष्टी सांगायचा. मुले भान हरखून एकेक शब्द मनात साठवायची. शाळेतून परत जाताना प्रत्येक मुलगा त्याच्या पायावर डोके ठेवायचा आणि शिक्षकांचेही हात आपसूक जोडले जात असत. मोरेश्वर गणेश मोर्शीकर हे त्याचे पूर्ण नाव. पण मोर्शीकर गुरुजी म्हणूनच ते ओळखले जायचे. परवा ते गेले.पश्चिम विदर्भातील शिक्षण क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याबद्दल सर्वांनाच आदर वाटायचा. विद्यार्थ्यांना घडविण्याचा ध्यास इतका की संसाराच्या मोहात अडकणे त्यांनी जाणीवपूर्वक टाळले. अकोल्यातील न्यू इंग्लिश हायस्कूल ही त्यांची शाळा. याच शाळेचे ते विद्यार्थी. मुख्याध्यापक म्हणून येथूनच निवृत्त झाले. शाळेत आले की पहिल्यांदा त्यांचे लक्ष मैदानावर पडून असलेल्या दगडांकडे जायचे. खेळताना मुलांना ते लागू नये म्हणून गुरुजी दगड उचलून बाजूला ठेवायचे. ‘न्यू इंग्लिशमध्ये मी विद्यार्थी असताना गाडगेबाबा शाळेच्या आवारात येऊन संपूर्ण परिसर स्वच्छ करायचे, मुलांना ओरडून...जारे जा! शिका, असे म्हणायचे’ मोर्शीकर गुरुजी कधी तरी ही आठवण सहज सांगायचे तेव्हा सेवेचा हा संस्कार नकळत असा झिरपायचा.मुख्याध्यापक असले तरी ते खुर्चीत फारसे बसत नव्हते. त्यांच्या खिशात केस कापण्याची एक कात्री नेहमी राहायची. केस वाढवून हेअर स्टाईल करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या केसांवरून ही कात्री कधी फिरणार, याचा नेम नसायचा. पण हेच मोर्शीकर गुरुजी शाळेची फी भरायला मुलांकडे पैसे नसले की खिशात हात घालायचे, त्यावेळी कात्रीऐवजी पैसे बाहेर निघायचे. पुढे उच्च शिक्षणासाठीही त्यांनी शेकडो मुलांना मदत केली. अनेक पालकांना मुलांच्या लग्नासाठी पैसे दिले; पण याचा कुठे गाजावाजा नाही किंवा परतफेडीची अपेक्षाही नाही. त्यांनी पगार कधीही घरी नेला नाही. स्वत:च्या गरजेपुरते पैसे ठेवायचे आणि उर्वरित विद्यार्थ्यांसाठी खर्ची घालायचे. हे व्रत त्यांनी आयुष्यभर जोपासले. सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनचे काय करावे, हेही त्यांनी आधीच ठरवून टाकले होते. एकदा एका सन्माननीय गृहस्थाने विचारले, ‘गुरुजी तुम्ही आतापर्यंत किती दान दिले’. मोर्शीकर गुरुजी म्हणाले, ‘बापाने पोरावर किती पैसा खर्च केला, तुम्ही सांगू शकाल?’ तो गृहस्थ निरुत्तर झाला. इंग्रजी हा त्यांचा आवडता विषय. प्रत्येकाला इंग्रजी बोलता यावे, ही त्यांची तळमळ. त्याच तळमळीतून ते खेड्यापाड्यातील शाळेत जाऊन मुलांना इंग्रजी शिकवायचे. ‘वीस दिवसांत इंग्रजी बोलणे-वाचणे-लिहिणे’ हे त्यांचे पुस्तक त्यांच्या व्रतस्थ अध्यापनाचे द्योतक होते. तयार केलेल्या विविध फलकांची मदत घेऊन मुले सहज इंग्रजी शिकू शकतात, हा प्रयोग त्यांनी हजारो विद्यार्थ्यांसमोर सिद्ध करून दाखवला. केवळ पगारासाठी शिकवणारा शिक्षक हा त्यांच्या सात्विक संतापाचा विषय होता. आजचे शिक्षक केवळ पैशामागे धावत असतात. ‘विद्यार्थी मेरीटमध्ये आले की तुम्ही श्रेय घेता, मग त्याच वर्गातील चार मुलं नापास होतात, त्याचे अपश्रेय कोण घेणार?’ या त्यांच्या जळजळीत प्रश्नाने शिक्षकांच्या माना खाली जायच्या. मोर्शीकर गुरुजी रोज सकाळी फिरून घरी परत येताना एक रोपटे घेऊन यायचे, अंगणात आधीच असलेल्या रोपट्यांशेजारी त्याला ठेवायचे, काही दिवस सांभाळायचे आणि थोडे मोठे झाले की त्याला गावातल्याच एखाद्या रस्त्यालगत किंवा स्मशानभूमीत नेऊन लावून द्यायचे. आता या रोपट्यांना माझी गरज नाही, ती आपोआप वाढतील, असे ते सांगायचे. मुलांनाही त्यांनी असेच घडवले. परवा उमरीच्या स्मशानभूमीत त्यांना शेवटचा निरोप देताना त्यांनी घडवलेली मुले होती आणि लावलेली झाडेही होती... - गजानन जानभोर