शहरं
Join us  
Trending Stories
1
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
2
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
3
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
4
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
5
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
6
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल
7
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
8
सावधान! RTO ने नियम बदलले, १ जूनपासून लागू होणार नवे रुल्स;...तर भरावा लागेल २५ हजारांचा दंड
9
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
10
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत
11
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
12
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
13
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
14
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
15
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
16
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
17
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
18
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
19
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
20
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 

माकडाच्या पिलाची झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:35 AM

प्रसिद्ध साहित्यिक वि.स. खांडेकरांनी म्हटले आहे की, ‘‘साहित्यावर प्रेम करण्यासाठी निसर्गाला गुरूकरा, वृक्षाला गुरू करा, आईला गुरू करा.’’ या वाक्यात खूप मोठा अर्थ दडला आहे. ज्यातून जीवनाचा बोध घडतो. ते सारे गुरुत्वातच असते.

- डॉ. रामचंद्र देखणे प्रसिद्ध साहित्यिक वि.स. खांडेकरांनी म्हटले आहे की, ‘‘साहित्यावर प्रेम करण्यासाठी निसर्गाला गुरूकरा, वृक्षाला गुरू करा, आईला गुरू करा.’’ या वाक्यात खूप मोठा अर्थ दडला आहे. ज्यातून जीवनाचा बोध घडतो. ते सारे गुरुत्वातच असते. निसर्गाकडे, निसर्ग घटकांकडे आणि विशेषत: प्राणीजीवनाकडे जरा बारकाईने पाहा, कितीतरी गोष्टी आपल्याला शिकता येतील.ज्ञानदेवांनीही वृक्षाला सद्गुरू म्हटले आहे. एके ठिकाणी सुंदर रूपक मांडले आहे. एक प्रवासी रखरखीत उन्हात पायी प्रवास करतो आहे. चालताना एक छानसे झाड दिसते आणि त्याच्या दाट सावलीखाली तो विसावतो. ज्ञानदेव म्हणतात, ‘‘अशा वृक्षाची सावली, वाटे जाता मीनली’’ ती सावली कितीही सुसह्य असली तरी घरी घेऊन जाता येत नही. तिला आसक्तीने बळेच ओढून घरी नेता येत नाही. सावली हवी असेल तर वृक्षाखालीच विसावा घ्यायला हवा. अवास्तव आसक्ती काय कामाची? नुकताच मी एका गावी व्याख्यानाला गेलो होतो. एका अतिथीगृहात माझी निवासाची व्यवस्था केली होती. अतिथीगृहाच्या पाठीमागे काही कौलारु आणि पत्र्याची घरे होती आणि काही अंतरावर दाट झाडी होती. मी खिडकीतून पाहत होतो. एक माकडाचे टोळके त्या पत्र्याच्या घरावर बसले होते आणि शेजारी उभ्या असलेल्या झाडाची काही पाने, फळे ओढून खात होते. त्यामध्ये एक माकडीण होती आणि तिच्या पोटाला लहान पिल्लू बिलगून बसले होते. माकडाचे या घराच्या छपरावरून त्या घराच्या कौलांवर तिथून पुन्हा झाडावर उड्या मारणे चालले होते. पण ते बिलगलेले पिल्लू काही माकडीणीला सोडेना. तिने त्याला पोटाशी धरूनच प्रथम उडी मारली आणि क्षणभर थांबून पुन्हा पहिल्याच पलीकडच्या छपरावर जाऊन थांबली. पिलाला पोटापासून वेगळे केले आणि त्याला तिथेच ठेवून त्या छतावरून पुन्हा पलीकडच्या छतावर उडी मारली. पिलाने ते पाहिले. तो एकटाच राहिला. थोडा घाबरला. सगळी माकडे अलीकडच्या छतावर तो एकटाच तिकडे. माकडीणीने पिलाकडे पाहिले आणि त्या पिलाने मोठ्या धैर्याने पलीकडच्या छतावर झेप घेत उडी मारली. ते आईजवळ पोचले आणि मी खिडकीतून टाळ्या वाजवल्या. आपल्या पिलाच्या अंगात बळ द्यायच असतं. हे देखील कळलं आणि केव्हा द्यायचं हे देखील. जगण्याच्या सामर्थ्याचे यापेक्षा मोठे शिक्षण कोणते?

टॅग्स :newsबातम्या