शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘मनी’मामाचं चांगभलं..

By सचिन जवळकोटे | Updated: September 5, 2021 08:52 IST

लगाव बत्ती...

- सचिन जवळकोटे

उंदरगावचा ‘बाबा’ कळवळून सांगतोय जगाला, ‘मी स्वत:ला कधीच कुणाचा अवतार म्हणवून घेतलं नाही. ना मी कुणाचा वंशज.. ना मी भक्तांचा सद‌्गुरू. आता लोकंच स्वत:हून असं म्हणत असतील तर त्यात माझा काय दोष ?’ ..खरंच. या बिच्चाऱ्या ‘बाबा’चं खरंय. लोक काय हो.. काहीही बोलतात. उचलली जीभ टाळ्याला लावतात. आता बघा की.. याच ‘बाबा’ला जवळची माणसं लाडानं ‘मनू’मामा म्हणतात. आर्थिक लूट झाल्याची तक्रार करणारी मंडळी खाजगीत मात्र चक्क् ‘मनी’मामा म्हणतात. असो.. ‘मनू’ काय अन् ‘मनी’ काय, हे दोन्हीही शब्द सध्याच्या युगात वादग्रस्तच ठरतात. लगाव बत्ती..

फॉर्च्युनरमध्ये फिरणारा संत

‘मनी’मामा जेवढा हुश्शाऽऽर, तेवढाच भाग्यवानही. डीएड्ला दोनवेळा गटांगळ्या खाल्लेल्या. मात्र त्यानंतर ‘गुरुजी’ बनण्याचा सोडला नाद, बनला चक्क ‘सद‌्गुरू’. चालवायची होती शाळा. करू लागला  ‘शाळा’. छापायची होती पुस्तकं, छापू लागला पावत्या. किती हा विरोधाभास. कुठं टू-व्हिलरवर फिरणारे आपले टिचर.. अन‌् कुठं फॉर्च्युनरमध्ये फिरणारा हा आधुनिक संत. 

गावातल्याच फाटक्या झोपडीसमोर खाटेवर बसून त्यानं एकेकाळी ‘बघाबघी’चा कार्यक्रम सुरू केलेला. बघता-बघता सहा वर्षांत झोपडीतून आलिशान महालात प्रवेश केलेला. भक्तांच्या दृष्टीनं भलेही तो आश्रम असेल, मात्र ‘मामा’च्या हायप्रोफाईल लाईफस्टाईलला शोभेल असा महालच की. ‘प्युअर सिल्क’चे इम्पोर्टेड कपडे वापरणारा ‘मामा’ जेव्हा संतांच्या साध्यासुध्या राहणीमानाची स्तुती करायचा, तेव्हा साऱ्यांचेच कान कसे तृप्त-तृप्त व्हायचे.

घरातलं लेकरू जेव्हा पोळी भाजी खायला कां-कू करतं, तेव्हा त्याच्यासमोर केकचा तुकडा दाखवून आपण त्याच्याही नकळत त्याला वरण-भात भरवतो. त्याला केक अन् भातातला फरकही नाही कळत. संकटात सापडलेल्या भक्तांचीही मानसिक अवस्था अगदी तश्शीऽऽच. भ्रम अन् वास्तव यांच्यातला फरक न समजण्याजोगा. मंदीर ‘बाळू मामां’चं. दर्शन ‘मनी मामा’चं. खिशाला चाट मात्र फुकटचं. हे समजेपर्यंत खूप वेळ गेलेली. आपण फसलो गेलोत, हे समजलेली मंडळी आता पोलीस ठाण्यात धाव घेऊ लागलेली. ‘मनी’मामाचं चांगभलं. लगाव बत्ती..

चिठ्ठीवर मृत्यूची तारीख.. तिघांच्या

बदल्यात म्हणे वाचविला जीव !

दोनच दिवसांपूर्वी पुण्याचा एक व्यापारी करमाळा पोलीस ठाण्यात येऊन थडकला. तीन महिन्यांपूर्वीची ‘आपबिती’ त्यानं कथन करताच ‘खाकी’ अवाक् झाली. गेल्या वर्षी बिझनेसमध्ये लॉस आला म्हणून कुणाच्या तरी सांगण्यावरून तो आश्रमात आला. दर्शनासाठी दहा हजार रुपये त्यानं एका चेल्याला  ‘गुगल पे’वर पाठविले. नंतर त्याला त्याच्या मृत्यूची तारीखही सांगण्यात आली. ‘दोन मेला तो मरणार’ असं चिठ्ठीवर लिहून दिलं जाताच तो जागेवरच अर्धमेला झाला.त्यावर उपाय म्हणून त्याला बावीस हजार विटा दान करायला लावल्या. करमाळ्याच्या वीटभट्टीवाल्यानं दोन लाख मिळताच त्या स्पॉटवर पाठविल्या. त्यानंतर होमहवनसह अघोरी पूजाही करायला लावली. नंतर इतर लोकांना सांगितलं की या व्यापाऱ्यावर आलेला मृत्यू इतर तीन कामगारांवर गेला. ते तिघे दगावले. यानंतर अशाच पद्धतीनं व्यापाऱ्यांच्या इतर मित्रांकडूनही २५ ते ३० पेट्यांची वसुली केली गेली. हा विचित्र प्रकार ऐकून जबाब टाईप करणाऱ्याचेही हात थरथरले. मात्र हीही तक्रार अर्जावरच राहिली. चौकशीच्या नावाखाली  गुन्हा दाखल झालाच नाही. दरम्यान व्यापारी बाहेर पडताच लगेच मिटवा-मिटवीसाठी प्रचंड दबाव येऊ लागला. घरी रडारडी सुरू झाली. ‘मनीपॉवर’ पुन्हा एकदा खदाखदा हसली. ‘मनी’मामाचं चांगभलं. लगाव बत्ती..

काही माणसं जात्याच हुशार असतात. कधी कुणाला कुठं वापरायचं, याचं नैसर्गिक ज्ञानच त्यांना लाभलेलं असतं. लोक त्याला ‘दैवी शक्ती’ म्हणतात, हा भाग वेगळा. आता ‘मामा’चंच बघा ना. नुसत्या गंडा-दोऱ्यावर काम भागेना म्हटल्यावर ‘बाळूमामां’च्या नावाचा वापर झाला. त्यानंतर त्यांच्या पालखीच्या नावाखाली वारकरी संप्रदायाचा उपयोग झाला. पुरोगामी  ‘बारामतीकरां’च्या बंगल्यातही केवळ याच इमेजमुळे शिरकाव झाला. त्यांच्या सोबतच्या फोटोचा पद्धतशीरपणे वापर करून कैक ‘घड्याळ’वाल्या नेत्यांनाही पाय पडायला लावलेलं. खरंतर, ‘आमच्या फोटोचा गैरवापर झाला तर याद राखा’ असा इशाराही म्हणे त्यावेळी  ‘ताईं’नी दिलेला. खरं-खोटं तेच जाणोत. नंतर हे फोटो मात्र पेजवरून डिलिट झालेले.मात्र ‘इंदापूर’चे ‘भरणेमामा’ अन् ‘फलटण’चे ‘रणजितदादा’ या आश्रमापासून पद्धतशीरपणे दूर राहिलेले. नेहमीच्या सवयीप्रमाणं पहिल्याच भेटीत म्हणे त्यांनाही ‘मठासाठी फुकटात जागा’ मागितली म्हणे. उडत्या पाखरांची पिसं ओळखणारी ही नेतेमंडळी. तेव्हापासून त्याला लांबूनच ‘जय महाराष्ट्र’ केलेला. ‘एकनाथभाई’ अन‌् ‘संजयमामां’सोबतचे फोटोही अनेकांनी पाहिलेले. मात्र आता एकेक किस्से बाहेर येऊ लागताच ‘संजयमामा’ लगेच सावधपणे तटस्थ बनलेले. काहीही म्हणा.. राजकारणातले दोन्ही ‘मामा’ या आश्रमातल्या ‘मामा’पेक्षा हुशार निघाले.

राहता राहिला विषय नारायणआबांचा. त्यांना म्हणे या ‘मामा’च्या दैवी शक्तीचा चांगला अनुभव आलेला. क्या बात है... गेल्या विधानसभेला बहुधा या ‘मामा’नंच त्यांना ‘बंडखोरी करायला सांगितली होती वाटतं. ‘आबा’ पडले. ‘संजयमामा’ आमदार झाले. म्हणजे या ‘मामां’च्या नावावर त्या ‘मामा’नं चांगलीच पावतीच फाडली म्हणायची. 

प्रिय डॉक्टर..

आज आपली खूप आठवण येतेय. एकेकाळी मंद्रुपच्या ‘शेखूबाबा’पासून शावळच्या ‘बालमुत्त्या’पर्यंत अनेक प्रकरणं आपण बाहेर काढली. आजही आपण कदाचित असता तर या ‘बाबा’चं प्रकरण कानावर पडताच तत्काळ साताऱ्याहून निघून करमाळ्यात पोहोचला असता. स्वत: गुन्हा दाखल केला असता. ‘तपास-बिपास नंतर करा. अगोदर केस रजिस्टर करा,’ असं स्पष्टपणे इथल्या ‘एसपीं’ना निक्षून सांगितलं असतं. त्या ‘मामा’चा पोलीस बंदोबस्त काढून घ्या, असंही बजावलं असतं.किती दुर्दैव पहा ना डॉक्टर. आयुष्यभर जीव धोक्यात घालून तुम्ही लढत राहिलात. कैक हल्ले झेलत राहिलात. तरीही कधी बंदोबस्त मिळाला नाही. मात्र ‘राजकीय वरदहस्त’ असल्याचा आव आणून समाजाच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्यांना मात्र दोन-दोन जिल्ह्यांकडून बंदोबस्त मिळाला.असो. आपले ‘हमीद’ही या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न साताऱ्यातून करताहेत. त्यांनी म्हणे कसली तरी सत्यशोधन समिती नेमलीय. या समितीतल्या कार्यकर्त्यांनाही आठ दिवसांनंतर करमाळ्यात जायला वेळ मिळालाय. मात्र लोकांना वाटतंय की सरकारी समितीसारखीच हीही चौकशी होणार.. फायलीवर फायली भरणार. काही दिवसांनी हे प्रकरण विस्मरणात जाणार. चॅप्टर क्लोज होणार. डॉक्टर.. अशा मोठ्या धेंड्यांना टक्कर देण्यासाठी खूप मोठं धाडस असावं लागतं. ते तुमच्यासारखंच तुमच्या पुढच्या पिढीतही उतरलंय. पिता गमाविल्यानंतरही ती चळवळ तशीच पुढं चालू ठेवण्याची जिगर त्यांनी दाखविलीय; मात्र कधीकाळी रस्त्यावर उतरून दंड थोपटणारी टीम आता ‘सॉफिस्टिकेटेड’  बनलीय. फक्त कागदी निवेदनं देणं अन् घरात बसून पत्रकं काढणं, म्हणजेच चळवळ असं समजू लागलीय. खरंच डॉक्टर.. अशावेळी तुमची खूप आठवण येते. आज तुम्ही हवे होता.

 निकाल जनतेच्याच कोर्टात..

असो. जगाचं भविष्य सांगणाऱ्या या ‘मामा’ला आता आपलं स्वत:चंही भविष्य समजलेलं वाटतं. म्हणूनच गेल्या आठ दिवसांपासून हा थेट जिल्ह्याबाहेर. वकिलांचा फौजफाटाही सोबतीला. म्हटलं ना.. कधी कोणतं शस्त्र कुठं वापरायचं, याचं खूप चांगलं ज्ञान ‘मामा’ला. अनेक तक्रारदार सध्या पोलीस ठाण्यात हेलपाटे घालताहेत. समजा ‘एसपी’ मॅडमनी कडक भूमिका घेऊन गुन्हा दाखल केलाच तरीही भविष्यात दाैंड प्रकरणासारखी ‘फाइल क्लोज’ होण्याची शक्यताही नाकारता न येणारी.. कारण साम, दाम, दंड अन् भेदमध्ये तो पुरून उरलेला. कायद्याच्या कचाट्यातून तो कसा सुटेल, हे त्यालाच माहीत. मात्र, जनतेच्या कोर्टात त्याचा पुरता निकाल लागलेला. जनता भलेही भोळी असते; मात्र खुळी नसते. एखाद्याला डोक्यावर घेऊन नाचणारं हेच पब्लिक नंतर खाली आपटायलाही मागं-पुढं पाहत नसतं.. अमावस्या पुढं आहेच म्हटलं.  ‘मनी’मामाचं चांगभलं.

लगाव बत्ती..

टॅग्स :Solapurसोलापूरkarmala-acकरमाळाSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे