शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

आधुनिकतेचे फंडे

By admin | Updated: July 3, 2016 02:40 IST

अमेरिकेच्या लास वेगास शहरात एक लग्नसोहळा रंगला होता. लिटिल वेगासचे पादरी जातीने लग्न लावण्यासाठी हजर होते. नवरदेव एरॉन चेर्वेर्नाक अत्यंत खुशीत होता. पण या सगळ्यात

- प्रसाद ताम्हनकरअनोखे लग्न : अमेरिकेच्या लास वेगास शहरात एक लग्नसोहळा रंगला होता. लिटिल वेगासचे पादरी जातीने लग्न लावण्यासाठी हजर होते. नवरदेव एरॉन चेर्वेर्नाक अत्यंत खुशीत होता. पण या सगळ्यात अनोखे काय होते? हे नवरदेव एरॉन चेवेर्नाक चक्क स्मार्टफोनशी लग्न करत होते. आहे ना अनोखी बात? द लिटिल लास वेगास या चॅपलचा मालक मायकल केली याच्या हवाल्याने अनेक वृत्तसंस्थांनी ही अनोख्या लग्नाची गोष्ट छापली आहे. केलीच्या मते आधी सगळ्यांना हा सोहळा बघून आश्चर्यच वाटले, मात्र ‘ठीक आहे.. असेदेखील घडते’ असे म्हणत सगळ्यांनी त्याचा आनंददेखील लुटला. पादरीनी चक्क एरॉन चेर्वेनाकला ‘एरॉन तू या स्मार्टफोनला कायद्यानं पत्नी मानतोस? तिचा सन्मान करतोस? तू तिच्यावर प्रेम करतोस,’ असे प्रश्न एकामागोमाग एक विचारले आणि एरॉननेदेखील, ‘हो.. मी असे करतो!’ असे सांगत या विधीच्या पूर्ततेला हातभार लावला. सध्या ह्या अनोख्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.ट्विटर डॅशबोर्ड : सध्या युवकांबरोबरच फेसबुक, ट्विटरसारख्या मातब्बर सोशल नेटवर्क्सनी आपले लक्ष आता छोट्या व्यावसायिकांवरतीदेखील केंद्रित केले आहे. अत्यंत कमी खर्चात त्यांना जाहिरातीसाठी आणि ग्राहकांशी जोडले जाण्यासाठी विविध तंत्रज्ञान आणि सोशल स्पेस पुरवायची हे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. त्याचा त्यांना प्रचंड मोबदलादेखील मिळू लागला आहे. ट्विटरनेदेखील आता या क्षेत्रात एक पाऊल टाकत छोट्या व्यावसायिकांना डॅशबोर्ड हे अनोखे अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. छोट्या व्यावसायिकांना टिष्ट्वटरवरचा जास्तीतजास्त उपयोग हा मनोरंजनापेक्षा, आपल्या व्यवसायाची जाहिरात आणि ग्राहकांशी थेट संवाद ह्यासाठी करायचा असतो. त्यांची हीच गरज लक्षात घेऊन विविध सोयींसह हे अ‍ॅप टिष्ट्वटरने दाखल केले आहे. वेब आणि आयएसओ दोन्ही प्रणाल्यांवरती हे उपलब्ध आहे. लवकरच हे अ‍ॅप एण्ड्रोइडसाठीदेखील ट्विटरद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.रोबोचे आधुनिक तंत्रज्ञान : ‘एक मशीन अर्थात रोबो, तुमच्या घरातली सर्व कामे झाडणे, पुसणे, कपड्याच्या घड्या इ. अगदी सराईतपणे करेल आणि तोच रोबो गरज पडला तर सीमेवरती एखाद्या कुशल जवानाचे कार्यदेखील पार पाडेल’ असे तुम्हाला सांगितले, तर तुम्ही कितपत विश्वास ठेवाल? मात्र अमेरिकेतील बोस्टन डायनॅमिक्सने असा उच्च तंत्रज्ञान असलेला रोबोट तयार करण्यात यश मिळविले आहे. त्याच्या सफाईदार हालचाली, कामाचा आवाका पाहून उपस्थित सगळेच आश्चर्यचकित झाले. या रोबोटच्या हालचाली आणि तंत्रज्ञान अजून थोडे अद्ययावत करण्यासंदर्भात काही सूचना कंपनीला अमेरिकन संरक्षण दलातर्फे देण्यात आल्या आहेत. आता येत्या काळात हे रोबो सीमेवरती रक्षणाला उभे दिसले तरी आश्चर्य वाटायला नको.