शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल 'बोलण्यासाठी' ? - नव्हे, 'टाळण्यासाठी'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 09:31 IST

Mobile News: मोबाइलचा उपयोग आपण कशासाठी करतो? किंवा कोणत्याही फोनचा प्रमुख उपयोग काय? -तर फोनवर बोलणं, दुसऱ्याशी संवाद साधणं. खरंतर मोबाइलची निर्मितीच त्यासाठी झालीय. त्या जोडीला इतर अनेक गोष्टी मोबाइलमध्ये आल्या आणि त्या डोइजड झाल्या ही गोष्ट वेगळी, पण...

मोबाइलचा उपयोग आपण कशासाठी करतो? किंवा कोणत्याही फोनचा प्रमुख उपयोग काय? -तर फोनवर बोलणं, दुसऱ्याशी संवाद साधणं. खरंतर मोबाइलची निर्मितीच त्यासाठी झालीय. त्या जोडीला इतर अनेक गोष्टी मोबाइलमध्ये आल्या आणि त्या डोइजड झाल्या ही गोष्ट वेगळी, पण तरुणाई; त्यातही टिनेजर्स मोबाइलच्या स्क्रीनमध्ये सतत डोळे खुपसून असतात, एक मिनीटही ते मोबाइल नजरेआड होऊ देत नाही, तरीही आलेला 'कॉल' ते चटकन उचलत नाहीत, हे एक नवं वास्तव आहे. अगदी मोबाइल हातात असला आणि रिंग वाजत असली तरीही ते कॉल रिसिव्ह करीत नाहीत!

बऱ्याचदा आपल्या जवळच्या मित्राचा किंवा आई-वडिलांचा कॉलही ते घेत नाहीत. अनेक पालकांना आपल्या मुलांची ही 'मोबाइल वर्तणूक' ओळखीची असेल, त्याचा त्यांना त्रास होत असेल आणि चिंताही वाटत असेल; पण आहे हे असं आहे. - का? का करतात टिनेजर्स असं? कारण फोनवर 'बोलणं' ही संवादाची ठरलेली पद्धत त्यांना उपयुक्त वाटत नाही. बरेच टिनेजर्स आणीबाणीच्या, अडचणीच्या क्षणी किंवा जेव्हा त्वरित आधार हवा असतो त्यावेळीच फोन उचलतात. फोनऐवजी टिनेजर्सचा मुख्य भर असतो तो 'टेक्स्ट'वर. तोच त्यांचा 'संवाद' असतो. अर्थातच आळशीपणा त्याला कारणीभूत नाही, तर त्यांच्यासाठी संवादाची हीच प्रचलित रीत आहे. फोन उचलण्याची टाळाटाळ हा केवळ पिढीतला फरक नाही; संवादाच्या पद्धती, सामाजिक नियम आणि डिजिटल शिष्टाचारांमध्ये झालेल्या बदलांचं हे लक्षण आहे.

फोन उचलणं म्हणजे संबंधित ठिकाणी आत्ता, लगेच 'उपस्थित' राहणं, कोणतीही तयारी न करता थेट संवाद साधणं. याउलट टेक्स्ट स्वरूपातील संवादात अधिक नियंत्रण असतं. त्यामुळेच टिनेजर्स मोबाइलचा उपयोग बोलण्यासाठी नव्हे, तर बोलणं 'टाळण्यासाठी' करतात कधी, कोणाशी आणि कसा संवाद साधायचा, नात्यांतला समतोल कसा राखायचा, यासाठी त्यांना 'टेक्स्ट' किंवा व्हॉइस नोट अधिक महत्त्वाच्या वाटतात.

टॅग्स :Mobileमोबाइल