शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
4
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
5
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
6
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
7
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
8
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
9
VIDEO : टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना विचारला स्कीन केअर रुटीनसंदर्भातील प्रश्न
10
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
11
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
12
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
13
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
14
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
15
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
16
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
17
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
18
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
19
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
20
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट

मिसाबंदी अन् खाली तिजोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:19 IST

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती. अजेंड्यावरील विषय फारसे गंभीर नसल्यामुळे हास्य, विनोदात बैठकीचे कामकाज चालू होते. गिरीश बापट आणि पांडुरंग फुंडकर मंत्रिद्वय मात्र अशा वातावरणातही गंभीर दिसत होते. दोघेही गप्प होते. काहीतरी बिनसल्याचे सीएम साहेबांनी ताडले.

-दिलीप तिखिलेराज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती. अजेंड्यावरील विषय फारसे गंभीर नसल्यामुळे हास्य, विनोदात बैठकीचे कामकाज चालू होते. गिरीश बापट आणि पांडुरंग फुंडकर मंत्रिद्वय मात्र अशा वातावरणातही गंभीर दिसत होते. दोघेही गप्प होते. काहीतरी बिनसल्याचे सीएम साहेबांनी ताडले....काय बापटसाहेब... एनी प्रॉब्लेम?मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाला ‘काही नाही’ असे त्रोटक उत्तर देऊन बापटजी पुन्हा गप्प झाले....काही कसं नाही. इकडे तुम्ही गप्प. तिकडे फुंडकरसाहेब आपल्याच विचारात मग्न. काय, ‘नमो अ‍ॅप’चा धसका घेतला की काय?‘नमो अ‍ॅप’चा उल्लेख येताच सगळे दचकून सावरून बसले. हास्य, विनोदाचे वातावरण गंभीरतेने घेतले. मग बापटांच्या एका निकटस्थ मंत्र्यानेच खुलासा केला......त्या ‘अ‍ॅप’ची तूर्त तरी भानगड नाही...आहे ती या दोघांच्या घरातली बाब आहे.मग सांगा की, आपणही घरातच बसलो आहोत ना!-मुख्यमंत्रीमंत्रिमहोदय : त्याचे काय झाले, परवा तुम्ही मिसाबंदींना दहा हजार रु. मासिक मानधन देण्याचे जाहीर केले आणि या दोन (बापट, फुंडकर) हरिश्चंद्राच्या अवतारांनी लगेच आपले मानधन समाजकार्यासाठी देण्याचे जाहीर करून टाकले. झाले घरचे वातावरण तापले. सौ. मंडळीचा बोल सुरू झाला. ‘‘मानधन आपलेच सरकार देत आहे ना! कुठे तिजोरीवर डाका तर टाकणार नव्हते. मग गुपचूप घ्यायला काय झाले. आमदार, मंत्र्यांचे भत्ते वाढविण्याचा प्रस्ताव विधिमंडळात येतो तेव्हा कशी चूपचाप सहमती देता. तेव्हा नाही येत समाजकार्याची आठवण...’’ वगैरे... वगैरेअहो पण, मी नाही म्हणालो, समाजकार्यासाठी देतो म्हणून...फुंडकरांची मधेच स्पष्टोक्ती.मंत्रिमहोदय : आता नाही म्हटले... पण म्हणावे लागणार. तुम्हीसुद्धा बापटांसोबतच मिसाखाली बंदी होता ना! मग बापटांनी जाहीर केले तर तुम्हालाही नैतिक दबावापोटी ते जाहीर करावेच लागेल.बरं ते जाऊ द्या!...मुख्यमंत्री आवरते घेत म्हणाले...मी हे मानधन जाहीर तर केले. पण...मनाला नाही पटत.का नाही पटत... एक युवा मंत्री उसळून म्हणाला. लीलातार्इंचे बोल तुम्ही फारसे मनावर घेऊ नका.मुख्यमंत्री : कोण लीलाताई... काय म्हणाल्या त्या...?युवा मंत्री : त्या आपल्या नागपूरच्याच तर आहेत. मूल्य, अवमूल्यानाच्या गोष्टी करतात... ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यासाठी केलेल्या त्यागाची किंमत मागणार आहात का?’ असा त्यांचा सवाल आहे. मी म्हणतो...कसलं मूल्य नि कसलं अवमूल्यन. इकडे रुपयाचे सारखे अवमूल्यन होत आहे. १० हजाराने काय होणार? मी तर म्हणतो, २५ हजार द्यायला पाहिजे आणि तेही रिट्रॉरिस्पेक्टिव्ह म्हणजे ४०-४२ वर्षांपासूनच्या प्रभावाने. (या मंत्र्याचा नातेवाईक मिसाबंदीचा लाभार्थी आहे हे नंतर कळले.)मुख्यमंत्र्यांनी मग कॅलक्युलेटर हातात घेऊन हिशेब लावला. १० हजार देतो तर तिजोरीवर ताण येतो. २५ म्हटले तर राज्याचे पूर्ण बजेटच कोलमडते आणि रिट्रॉरिस्पेक्टिव्ह म्हटले तर...बापरे... संपूर्ण देशाची एक पंचवार्षिक योजनाच खड्ड्यात जाते.बरं तर.. पीएम साहेबांशी बोलून ठरवू या! एवढे बोलून मुख्यमंत्र्यांनी मग निरोप घेतला.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र