शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

सुटलेले भान आणि समानतेचा विसर

By admin | Updated: February 10, 2015 23:42 IST

मराठवाड्याचे महसुली विभाजन करण्यासाठी नवीन आयुक्तालय नांदेड की लातूर, असा कलगीतुरा २४ फेब्रुवारीला संपण्याची आशा करूया.

सुधीर महाजन -

मराठवाड्याचे महसुली विभाजन करण्यासाठी नवीन आयुक्तालय नांदेड की लातूर, असा कलगीतुरा २४ फेब्रुवारीला संपण्याची आशा करूया. कारण नवीन आयुक्तालय स्थापन करून काही फायदा होईल का, याचा अंदाज नाही; पण या मुद्द्याने अस्मितेचे स्वरूप धारण केले आणि नांदेड विरुद्ध लातूर अशीच चक्क झुंज लागली. दोन्ही जिल्ह्यांनी बाह्या सरसावल्या; आक्षेप व समर्थन नोंदविण्यासाठी स्पर्धा रंगली, लॉबिंग झाले; पण मराठवाड्याची प्रादेशिक अस्मिता आपण कमजोर करीत आहोत काय, याचे भान सर्वच विसरले. मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी विकास आंदोलनाचा लढासुद्धा विसरले. याच लढ्यात संपूर्ण मराठवाडा विकासासाठी एकवटला होता. नांदेडकरांनी आयुक्तालयाच्या समर्थनासाठी १२,०६९ पत्रे सरकारकडे सादर केली, तर लातूरकरांनी ८४९ हरकती नोंदविल्या. हा संघर्ष या पातळीवर पोहोचला. आयुक्तालय कोठेही झाले तरी त्याचा फायदा काय? एक तर या कार्यालयात सर्वसामान्यांचे काम नसतेच आणि प्रदेशाच्या विकासासाठी त्याचा संबंधही नसतो. मग हा वाद का पेटला? प. महाराष्ट्राचे उदाहरण घेऊ या. बारामती हा तालुका आहे. या शहराची आणि परिसराची प्रगती झालेली आहे; पण बारामती जिल्हा करावा यासाठी कोणी आपल्यासारखे इरेला पेटत नाही. आयुक्तालयासाठी बाह्या सरसावणाऱ्यांनी याचाही शोध घ्यावा. कारण आपण कोणत्या मुद्द्याचे राजकारण करून प्रादेशिक अस्मितेला तडा देण्याचा प्रयत्न करीत आहोत याची कल्पना येईल. अशा वादात आपण अडकलो, की कोणी आपल्याला फशी पाडले, याचा शोध घेतला पाहिजे. ही संपूर्ण बाब प्रशासकीय असून, ती सामोपचाराने सुटणे आवश्यक आहे. वडीलकीच्या नात्याने कोणीतरी हस्तक्षेप केला पाहिजे. मानव विकास निर्देशांकाच्या निकषावर मराठवाडा कोठे आहे, याचा विचार करणे आवश्यक आहे. आपण कशासाठी भांडतो, याचे भान सगळेच विसरले.मानव विकास निर्देशांकाचा विषय निघाला त्याच वेळी सामाजिक समतेच्या विचाराचाही नवा मुद्दा आहे. समतेचा मुद्दा म्हणून झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे आंदोलन याच मराठवाड्यात झाले. बाबा आढावांनी ‘एक गाव, एक पाणवठा’ चळवळ राबविली. याहीपेक्षा आर्य समाजाचा प्रसार असलेल्या लातूर जिल्ह्यात एका दलित महिलेची अर्धनग्न धिंड काढली जाते. चाकूर तालुक्यातील बोरगावच्या घटनेने हा हादरा दिला. या प्रकरणातील आठपैकी सहा आरोपी मातंग समाजातील आहेत. पीडित महिलाही मातंग. असा हा प्रकार वरवर एकाच समाजातील असला, तरी त्याची पाळेमुळे निवडणुकीच्या सत्ताकारणापर्यंत पोहोचतात. गेल्या आठ दिवसांत प्रशासन येथे पोहोचले. त्या महिलेला दिलासा दिला. गावातील वातावरणही निवळले; पण सामाजिक समतेचा मुद्दा कायम आहे. सवर्णांच्या गल्लीत ही दोन घरे दलितांची. ती हटविण्यासाठी या महिलेच्या घरासमोरची जागा समाजमंदिरासाठी निश्चित केली आणि तेथे वर्षभरापूर्वी कुंपण घातले आणि या महिलेच्या घराचा रस्ता बंद केला. वर्षभर याविरुद्ध लढताना तिची कोणीही दखल घेतली नाही, तरीही ती समाज आणि सत्ताधाऱ्यांविरोधात लढत राहिली. शेवटी ती ऐकत नाही हे लक्षात येताच वरील प्रकार घडला. आता तिला बदफैली ठरविण्याचा जहरी प्रचार सुरू झाला. या विरोधात आज आंदोलने झाली. मोर्चे निघाले. दोन आरोपी फरार आहेत. त्यांना अटक होईल; पण समाजाच्या मानसिकतेत फार बदल झाला नसल्याचे हे निर्देशक आहे.या गदारोळात मुखेडची पोटनिवडणूक अदखलपात्र ठरल्यासारखी दिसते. प्रचाराची रणधुमाळी नाही की आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत नाहीत. नाही म्हणायला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सभा घेतल्या; पण काँग्रेसच्या गोटात तशी सामसुम दिसते. ही जागा हिसकावून घेण्यासाठी कोणतीही तयारी काँग्रेसने केलेली नाही. भाजपाला येथे ७८ हजारांचे मताधिक्य मिळाले होते; पण यावेळी उमेदवारी देताना राठोड यांच्या कुटुंबातील सुंदोपसुंदी जाहीर झाली. काँग्रेसने याचाही लाभ उठवला नाही. येथे भाजपाची मते किती घटतात हाच मुद्दा आहे.