शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पंडितजी, मंडईतली पहाट आणि हमाल...; मैफिलीची सुरुवातही मोठी रंगतदार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 06:19 IST

आता पंडितजींनी मांडीवरची शाल काढली, की त्यांच्यामागोमाग सगळे उठणार ! तेवढ्यात रिकाम्या झालेल्या समोरच्या जागेतून एक हमाल घरी निघालेला पंडितजींना दिसला.

सुधीर गाडगीळ, ख्यातनाम लेखक, संवादक

पंडित भीमसेन जोशी यांच्यासोबत त्यांच्या संतवाणीचं निरूपण करणं ही माझ्या आयुष्याच्या मर्मबंधातली मोठी अमूल्य ठेव आहे. व्यायामाने कमावलेली भरदार शरीरयष्टी, कुरळे केस आणि भव्य भालप्रदेशाचे देखणे पंडितजी मैफिलीच्या ठिकाणी गाडीतून उतरत तेच मुळी एखाद्या रसिकराजासारखे!  मैफिलीची सुरुवातही मोठी रंगतदार . तानपुरे लागलेले, टाळ तापलेले आणि समोर उत्सुक रसिकवृंदाची गर्दी!  रंगमंचावरच्या त्या भारलेल्या वातावरणात पंडितजी येऊन स्थानापन्न झाले की पुढला क्रम ठरलेला असे.. ते सगळ्या वादकांकडे एकदा नजर टाकणार.. मग माउली टाकळकरांकडे पाहात नजरेनेच विचारणार, काय माउली? करूया सुरू?.. माउलींनी हसून होकार भरला की मग पंडितजी मांडीवरची शाल नीट करणार, गळ्याशी हात घालून अंगरख्याच्या आतलं जानवं चाचपणार, सोन्याच्या साखळीला स्पर्श करणार ... की मग डोळे मिटून पहिला स्वर लागणार !

त्याकाळी उघड्यावर मैफिली रंगत. मध्यरात्र उलटून गेली  तरी गवई थकत नसत आणि श्रोतेही जागचे हलत नसत. मला आठवतं, पुण्याच्या मंडईत संतवाणीचा कार्यक्रम होता. ओपन एअर. खच्चून गर्दी लोटलेली. मध्यरात्र उलटून गेल्यावर दोनच्या सुमारास पंडितजींनी शेवटचा गजर थांबवला आणि डोळ्यातलं तृप्तीचं पाणी पुसून श्रोते आपापल्या घराकडे निघाले. पांगापांग सुरु झाली. कलाकारांनीही आवरासावर सुरु केली. आता पंडितजींनी मांडीवरची शाल काढली, की त्यांच्यामागोमाग सगळे उठणार ! तेवढ्यात रिकाम्या झालेल्या समोरच्या जागेतून एक हमाल घरी निघालेला पंडितजींना दिसला. त्यांनी सहजच हाळी देऊन विचारलं, काय ? आवडलं का?तो हमाल त्यांच्याकडे पाहात म्हणाला, ब्येस झालं सायेब, पन त्ये “जो भजे हरिको सदा” घ्याला पायजे हुतं !-

....मांडीवरची आवरायला घेतलेली शाल पंडितजींनी पुन्हा पसरली. साथीदारांना तेवढा इशारा पुरेसा होता. सगळ्यांनी आपापली वाद्यं लावली. टाळ पुन्हा सरसावले गेले. माउलींनी ताल दिला आणि समोर बसलेल्या त्या एकट्या हमालासाठी पंडितजींनी सुरु केलं... जो भजे हरिको सदा, वोही परमपद पावेगा...त्या पहाटे आम्ही घरी पोचलो तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात  त्या अद्वितीय आठवणीचा आनंद होता - आजही माझ्या अंगावर ते रोमांच आहेत !