शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

मेहुलभाई आणि मॉब लिंचिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 06:38 IST

मेहुलभाई चोकसी हे एक छोटे व्यापारी मुंबईतील एका कोपऱ्यात छोटेखानी किराणा दुकान चालवत होते.

मेहुलभाई चोकसी हे एक छोटे व्यापारी मुंबईतील एका कोपऱ्यात छोटेखानी किराणा दुकान चालवत होते. आलेल्या ग्राहकांना पुड्या बांधणे (उगाच गैरसमज नसावा.) डाळतांदळाच्या पुड्या बांधून देणे, हा त्यांचा व्यवसाय होता. चोकसींच्या दुकानात नीरव नावाचा एक पोºया कामाला होता. तो मेहुलभार्इंना मामा म्हणून हाक मारायचा. येणाºया गिºहाईकांनाही या मामाभाच्याच्या जोडीचे अप्रूप वाटायचे. मेहुलभार्इंना क्रिकेटचे प्रचंड वेड होते. दातांच्या फटीत काडी घुसवून टीव्हीवरील मॅच पाहण्यात ते तासन्तास गुंगून जायचे. सध्या कुठेच चर्चेत नसलेली वेस्ट इंडिजची टीम ही त्यांची फेव्हरेट होती. वेस्ट इंडिजच्या विवियन रिचर्ड्स, अ‍ॅण्डी रॉबर्ट्स, कर्टली अँब्रोज वगैरे क्रिकेटपटूंची छायाचित्रे जमा करणे, त्यांचे रेकॉर्ड्स जपून ठेवणे, हा मेहुलभार्इंचा छंद होता. त्यांचं जीवन हे अत्यंत साधेपणानं, समाधानानं चाललं होतं. पायघोळ सफेद लेंगा, सफेद कुर्ता व डोक्यावर टोपी हा मेहुलभार्इंचा पेहराव होता. एक दिवस नीरव मेहुलभार्इंचे पासबुक अपडेट करून घ्यायला बँकेत गेला असता बँकेच्या मॅनेजरने त्याला बसवून ठेवले. बराचवेळ झाला तरी नीरव परत न आल्याने मेहुलभाई बँकेत पोहोचले, तर तेथे भिजलेल्या मांजरासारखा एका कोपºयात बसलेला नीरव त्यांना दिसला. बँकेत बरीच लगबग सुरू होती. मेहुलभाई बँक मॅनेजरचा दरवाजा ढकलून केबिनमध्ये शिरताच काही आडदांड व्यक्तींनी त्यांना खेचून खुर्चीत बसवले. मेहुलभाई, देश को टोपी लगाके कहा भागना चाहते हो, असा सवाल केला. हे सारे काय सुरू आहे, याचा उलगडा मेहुलभार्इंना सुरुवातीला झाला नाही. त्यानंतर, जे कळले त्यामुळे मेहुलभार्इंची दातखीळ बसली व मती गुंग झाली. मेहुलभाई यांच्या नावावर एकदोन कोटी नव्हे, तर तब्बल १६ हजार कोटी रुपयांचे कर्ज उचलले होते. वेळोवेळी उचललेल्या मोठमोठ्या रकमांखालील स्वाक्षरी ही आपलीच असल्याची कबुली मेहुलभाई यांनी दिली. मात्र, ही स्वाक्षरी आपण केलेली नाही, असे ठामपणे सांगितले. बँकांचे व्यवहार नीरव बघत असल्याने त्याच्याकडे विचारणा केली गेली असता मामा देत असलेले चेक अथवा रोख मी निमूटपणे आणून भरत होतो, असे नीरवने सांगितले. बराचवेळ उभयतांची चौकशी केल्यावर सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाºयांनी त्यांना तात्पुरते सोडले. मेहुलभाई आणि नीरव विमनस्क अवस्थेत दुकानात असताना नीरवच्या मोबाईलवर फोन आला. पलीकडच्या व्यक्तीनं आपली ओळख सांगत वेस्ट इंडिज बेटांवरील अँटिग्वात येण्याकरिता पासपोर्ट व तिकिटे पाठवली.मेहुलभाई व नीरव विमानातून उतरताच मेहुलभाई अक्षरश: आनंदानं उड्या मारू लागले आणि नीरव अवाक् होऊन त्यांच्या तोंडाकडे पाहू लागले. एका भव्य प्रासादात चार दिवस मुक्काम करून लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेतल्यावर आणि बून पॉर्इंट, हडसन पॉर्इंट, जॉन्सन पॉर्इंट आदी पर्यटनस्थळांवर बरीच मौजमजा केल्यावर तसेच वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंचा सहवास लाभल्यावर परतीच्या प्रवासाकरिता जेव्हा मेहुलभाई निघाले, तेव्हा एक मोठा जमाव त्यांच्यावर चालून आला...- संदीप प्रधान

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाPunjab National Bankपंजाब नॅशनल बँकNirav Modiनीरव मोदी