शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मसाला चाय; तो पहिलाच..! दुसरा कसा असेल ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 07:32 IST

‘टेस्ट ॲटलस’ या जगप्रसिद्ध फूड गाइडने सर्वोत्कृष्ट ‘नॉन अल्कोहोलिक’ पेयांच्या यादीत भारताच्या ‘मसाला चाय’ला दुसरा क्रमांक दिला आहे, त्यानिमित्ताने...

- भक्ती चपळगावकर(खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक)

भारतीय उपखंडातील बहुतेक भागातील सकाळ चहाच्या दरवळानेच सुरू होते. दक्षिण भारतात कॉफीचा सुगंध दरवळतो; पण भारतात इतरत्र आणि आपल्या शेजारी देशांतही सकाळी चहा हवाच. तोही वाफाळता. खरं तर चहा ही भारतीयांना ब्रिटिश राज्यकर्त्यांनी लावलेली सवय. चहा उत्पादनातल्या चीनच्या एकाधिकारशाहीला संपवण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात चहाची व्यावसायिक लागवड सुरू केली. भारतात चहाची विक्री सुरू केली. त्यापूर्वीही भारतात चहा होताच म्हणा पण तो काढ्यापुरता. आता लोकांनी चहा प्यावा म्हणून गोऱ्या साहेबाने प्रयत्नपूर्वक चहा बाजारात आणला. इंग्लंड पूर्णपणे चहामय झाला होताच, पण तो चहा वेगळा!

भारतीयांनी मात्र चहाला अगदी आपलंसं केलं. काढे उकळणं आपल्याला फार आवडतं आणि मसाला चहा हे काढ्याचंच एक स्वरूप आहे. चहा विशेषतः मसाला चहा इतका चर्चेत येण्याचं कारण म्हणजे ‘टेस्ट ॲटलस’ या जगप्रसिद्ध ऑनलाईन फूड गाइडने २०२३ मधली जगातल्या सगळ्यात लोकप्रिय पेयांची (मद्य नसलेली) यादी प्रसिद्ध केली आणि त्यात मसाला चहाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या क्रमांकावर अगुआस फ्रेकास नावाचं मेक्सिकन सरबत आहे. या सरबताबद्दल आणि मेक्सिकन खाद्यसंस्कृतीबद्दल पूर्ण आदर बाळगून असं (अभिमानानं) म्हणावंसं वाटतं की आमच्या मसाला चहाची बरोबरी तुम्ही करूच शकणार नाही. आमचा मसाला चहा, प्रांताप्रमाणे बदलतो.

आलं, वेलची, दालचिनी, लवंग, केशर, मीरे, बडिशेप वगैरे मसाले कुटून उकळत्या दुधात ते मिसळून त्यात चहाची पत्ती टाकून अजून दूध खळखळ उकळून केलेलं हे स्वर्गीय पेय. यातले मसाले कमी जास्त होतील पण दूध म्हशीचंच हवं. साखर भरपूर असली पाहिजे, पण ती कमी घालून मसाल्याचा स्वाद वाढवणारेही आहेत. आता पाणी आधी उकळायचं की दूध उकळायचं हा प्रश्न घरोघरी आहेच. बहुतेक मसाला चहाचे आस्वादक दुधातच मसाले उकळले की हवी ती चव येते असं हिरिरीने सांगतात. इतकंच काय, पाणी उकळून चहा पत्ती टाकणारे आणि दुधात पत्ती उकळणारे अशा गटात वाद हे कायम ठरलेलेच.

साग्रसंगीत मसाला चहा प्यायचा असेल तर तो टपरीवरच प्यायला पाहिजे. चहावाल्याकडचं कळकट भांडं, त्यात ताजं म्हशीचं दूध आणि मसाले घालून केलेला चहा वेगळ्याच चवीचा होतो. त्यातही मसाला चहा दुधाळ हवा, गोड हवा; पण त्यात मसाले आणि चहा यांचं प्रमाण कमी असेल तर ते गोड दूध बनतं आणि यातच अनेक चहावाल्यांचा चहा फसतो!

चहाची लोकप्रियता काबीज करायला अनेक उद्योजक पुढे आले आहेत आणि आता अगदी छोट्या गावांपासून महानगरांपर्यंत चहाच्या फ्रांचायजी निघाल्या आहेत. चहाच्या टपरीचं हे मोठं रूप. एमबीए चायवाला, टी व्हिला कॅफे असो की येवले किंवा अमृततुल्य; चहाला डिमांड आहेच. यातील बहुतेक उत्पादकांचा स्वतःचा चहाचा मसाला असतो. त्यातही श्रमिकांना स्वस्तातला चहा विकणारे वेगळे आणि चहा एन्जॉय करण्यासाठी जमणारे वेगळे.  एकूण काय भारतीय उपखंड आणि चहा यांची ताटातूट कुणीही करु शकत नाही आणि कुणीही मसाला चहाला दुसरा नंबर दिला तरी आमच्यासाठी तो नंबर वनच आहे. 

गंमत म्हणजे ही यादी घोषित करताना ‘टेस्ट ॲटलस’ ने आपल्या इन्स्टाहँडलवर मसाला चाय असं न लिहिता ‘चाय मसाला’  असं लिहिल्याने चहाप्रेमी संतापलेच. तुम्ही स्वतःला जागतिक स्तरावरचं फूड गाइड म्हणवून घेत असताना करोडो लोक जे पेय पितात त्याचा उल्लेख चुकीचा, वेगळा अर्थ लागणारा करणं म्हणजे पाश्चिमात्य जग पूर्वेकडच्या जगाच्या खाद्य संस्कृतीबद्दल अजूनही किती बेफिकीर आहे याचंच लक्षण नव्हे का?  

टॅग्स :foodअन्न