शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

मनाचिये गुंथी - नीरक्षीरविवेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2017 00:34 IST

हंस पांढराशुभ्र असतो आणि बगळासुद्धा तसाच शुभ्रधवल असतो. मग त्यांच्यात वेगळेपणा कशात असतो

 हंस श्वेतो बक श्वेतो। को भेद: बकहंसयो:नीरक्षीर विवेकेन। हंसो हंस: बको बक:हंस पांढराशुभ्र असतो आणि बगळासुद्धा तसाच शुभ्रधवल असतो. मग त्यांच्यात वेगळेपणा कशात असतो? दूध आणि पाणी यांना वेगळे करण्याची, निवड करण्याची क्षमता हंसात असते. बाह्याकाराने त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या बगळ्याजवळ निवडीची ही क्षमता, कुशलता नसते ‘चांचूचेनि सांडसे’ (चिमट्याने), खांडिजे (वेगळे करतो) पयपाणी राजहंसे (ज्ञाने ९.४४)‘देखे ऐके, शिवे हुंगे। खाय, जाय, निजे, श्वसे। बोले, सोडी, धरी। वा पापणी हलवी जरी’ या सगळ्या मूलभूत क्रिया जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंतच्या कोणत्याही माणसात एकसारख्या असतात. मात्र नीरक्षीरविवेक, चांगले-वाईट, योग्य-अयोग्य, श्रेयस आणि प्रेयस यातून निवड करण्याची क्षमता आणि शहाणपण फार दुर्मीळ असते. ज्या माणसाजवळ विवेक असतो त्याची निर्णयशक्ती अचूक असते. राग-द्वेषाने, हा आपला तो परका या विचाराने, त्यांच्या निर्णय घेणाऱ्या बुद्धीवर कोणताही पडदा पडत नाही. कारण त्याची बुद्धी स्वच्छ आरशासारखी असते. ती प्रत्येक वस्तूचे खरेखुरे रूप प्रतिबिंबित करते. ‘शापिती ते आरशांना पाहुनि अपुल्या मुखाते’ अशी स्वत:च्या चुकांसाठी समर्थन किंवा सारवासारव त्यात नसते. सत्संगाने व्यक्तीचा विकास होतो; पण पूर्ण विकास होत नाही. सत्पुरुष आणि विवेकी यात अंतर असते. सत्पुरुषाच्या डोळ्यावर निळा चष्मा असतो त्यामुळे त्याला जगातले सारे चांगले दिसते. सत्पुरुष शुक्ल पक्षाकडेच आकर्षित होतो. दुर्जनांच्या डोळ्यावर काळा चष्मा असतो. त्यांना सर्व दोषास्पद दिसते. दोघांनाही जगाचे खरे स्वरूप कळत नाही. नीरक्षीरविवेकी या साऱ्या पलीकडे जात असतात. विवेकी तटस्थपणे विचार करून अचूक निर्णय देतो. तो द्रष्टा असल्याने भविष्याचे रूप जाणतो. कमाल पातळीवरचे त्याचे निर्णय व्यावहारिक पातळीवरही मानले जातात. त्यात एकांगीपणा नसतो. बाह्य संवेदना नसतात. इच्छा, आकांक्षा नसतात. कठोपनिषदातील मार्मिक रूपकात म्हटले आहे की इंद्र्रियरूपी घोड्यांना बुद्धीरूपी सारथी चालवतो. मनाचे लगाम, सारथी बुद्धीच्या हातीच असतात. नाहीतर इंद्रिये उधळून रथाला कुठे खेचून नेतील सांगणे कठीण आहे. बुद्धीची विलक्षण नेत्रदीपक झेप म्हणजे विज्ञान आणि कोमल भावनांमधून जिचे सृजन होते ती कला यांच्यात विरोध नाही. ते एकमेकांविरुद्ध ठाकले तर मात्र अनर्थ, संकटे, सर्वनाश ! सामंजस्य, समन्वय, नीरक्षीरविवेकच जगाला निरंतर, सुरक्षित ठेवू शकतो. ‘सलिली पय जैसे। एकले होऊन मीनले असे परि निवडुनी राजहंसे। वेगळे की जे’ (ज्ञाने अध्याय २-१२७) - डॉ. सौ. प्रज्ञा आपटे -