शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

मनाचिये गुंथी - डराव डराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:26 AM

- डॉ. गोविंद काळेउन्हाने त्रासलेल्या जीवाला पावसाचे वेध लागतात़ आकाशातील काळ्या मेघांची दाटी पाहून बळीराज सुखावतो़ यंदाचे वर्ष पाऊस वेळेवर आणि चांगला होऊ दे, शेते हिरवी होऊ दे म्हणून आशा बाळगतो़ हवामान खात्याचे अंदाज चुकतात़ काळे ढग वारा पळवून लावतो़ कुठे तरी पाऊस खूपच पडतो़ नद्या नाले तुडुंब भरून वाहतात. ...

- डॉ. गोविंद काळेउन्हाने त्रासलेल्या जीवाला पावसाचे वेध लागतात़ आकाशातील काळ्या मेघांची दाटी पाहून बळीराज सुखावतो़ यंदाचे वर्ष पाऊस वेळेवर आणि चांगला होऊ दे, शेते हिरवी होऊ दे म्हणून आशा बाळगतो़ हवामान खात्याचे अंदाज चुकतात़ काळे ढग वारा पळवून लावतो़ कुठे तरी पाऊस खूपच पडतो़ नद्या नाले तुडुंब भरून वाहतात. पूर येतो़ कोठे थेंबही पडत नाही़ मग येतो दुष्काऴ वृत्तपत्रे, दूरदर्शन, विविध वाहिन्या पावसावरच चर्चा करतात़ दृश्ये दाखवितात़ मला मात्र गेल्या चार-पाच वर्षात वेगळीच रुखरुख लागून राहिली आहे़ पहिल्या - दुस-या पावसात सुरू होणारे डराव - डराव आताशा कानीच पडत नाही़ शालेय जीवनातील कविता आठवून आपणच डराव- डराव करायचे. ‘डराव डराव / काहो ओरडता बेडूकरावपत्ता नव्हता तुमचा कालकोठुनी आला सांगा राव’बेडूकच नाहीत तर पत्ता तरी कुणाला आणि कसा म्हणून विचारायचा? बेडकांचे डराव डराव संपले़ पावसात भिजण्याचा आनंदही गेला, कारण घरोघरी रेनकोट आले़ पावसाच्या वाहत्या पाण्यात कागदी नावा करून सोडण्याचा आनंदही गमावला़केव्हा तरी मंडूक (बेडूक) सूक्त घेऊन म्हणत बसतो़ ऋग्वेदाच्या सातव्या मंडळातील हे दहा ऋ चांचे सूक्त, केव्हातरी ऋषींनाही विनोदी लिहावेसे वाटते याचे द्योतक आहे़ डराव डराव करणाºया बेडकांना चक्क वेदविद्याप्रवीण ब्राह्मणाची उपमा देण्यात आली आहे़संवत्सरं श शयना ब्राह्मणा व्रतचारिण:वाचं पर्जन्यजिन्वितां प्रमण्डुका अवादिषु:’वर्षभर मौन बाळगणारे मंडूक वर्षाकालारंभी व्रतस्थ विप्राप्रमाणे पर्जन्यकारी शब्द करू लागले़ यज्ञातील सोमयागी विप्रांप्रमाणे बेडूक शब्द करीत आहेत म्हणजे एका अर्थाने वेदघोष करीत आहेत़ वर्षाकाळाच्या प्रारंभी सृष्टीमध्ये उत्पन्न होणारे असंख्य बेडूक आणि त्यांचे डराव डराव म्हणजे मंत्रपठण़ सुसाट वेगाने धावत सुटणा-या कालौघात यज्ञसंस्था लोप पावली तसे मंत्रपठणही आवरते झाले़ आता तर बेडूकराव नाहीसे झाले आणि त्यांचे डराव डरावही संपले़लहानपणी बेडूकरावांची भीती वाटायची़ दंगा करणा-या द्वाड मुलांना घराघरातील ज्येष्ठ मंडळी रागावायची, प्रसंगी थप्पडही द्यायची़ मुलांना या गोष्टींची भीती फ ारशी वाटत नसे़ परंतु थांब, तुझ्या गळयात बेडूकच बांधतो असे शब्द कानी आले की मुले घाबरायची़ बेडकाचे नाव घेतले की मुलांचे चाळे आपोआप आवरते घेतले जायचे़ हा होता डराव डराववाल्या बेडकांचा मुलांवर धाक़ सात-आठ वर्षे वयाची ब्राह्मणांची मुले तर खूपच घाबरायची़ मौंजीबंधनात मुंजामुलाची उजवी मांडी कापून त्यामध्ये पुरणपोळी भजे, चटणी असे जेवणातील पदार्थ व त्यावर एक बेडूक ठेवून मांडी शिवून टाकायची, असे सांगितले जाई़ परवा दोन्ही नातवांना ही गोष्ट सांगितली गंमत म्हणूऩ आता तुमचे मुंजीचे वय झाले़ मुंज करावी लागणाऱ दोघेही तत्परतेने उत्तरली़ आबा! तेवढे सोडून दुसरे काहीही आमचे करा पण मुंज मात्र नको़ कारण मांडीत बेडूक ठेवायचा म्हणजे आम्हालाही आयुष्यभर करत बसावे लागेल डराव! डराव!