शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
3
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
4
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
5
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
6
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
7
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
8
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
9
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
10
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
11
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
12
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
13
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
14
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
15
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
16
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
17
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
18
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
19
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
20
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
Daily Top 2Weekly Top 5

मल्ल्या सुटणारच!

By admin | Updated: March 11, 2016 03:32 IST

‘प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणे’, अशी एक म्हण आहे आणि ती अगदी परिस्थितीचा कडेलोट झाल्याशिवाय सहसा वापरली जात नाही.

‘प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणे’, अशी एक म्हण आहे आणि ती अगदी परिस्थितीचा कडेलोट झाल्याशिवाय सहसा वापरली जात नाही. पण देशातील सर्व राजकारण्यांच्या निर्ढावलेल्या निलाजरेपणाचा कडेलोट विजय मल्ल्या यांच्या प्रकरणात झाल्याचे बघून ही म्हण वापरल्याविना राहावत नाही. हवामानातील बदल आणि आर्थिक चढउतारांमुळे हातची पिके गेल्याने कर्ज परत करता येत नसल्याने महाराष्ट्रासह देशाच्या आणखी काही राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. त्यांच्या नावाने सगळे राजकारणी अश्रू ढाळत असतात आणि शेकडो कोटींची ‘पॅकेजेस’ही जाहीर केली जतात. महाराष्ट्रातील सेना-भाजपा युतीचे सरकार तर ‘कर्जमाफी’ नाही, ‘कर्जमुक्ती’वर भर देऊन शेतीतील पेचप्रसंग कायमचा संपवण्याची ग्वाही देत आहे. पण एका पाठोपाठ एक होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या थांबवण्यासाठी तातडीने काही केले जात नाही. मात्र कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी स्वत:चा जीव घेत असलेल्या या देशात राष्ट्रीयीकृत बँकांचे नऊ हजार कोटी बुडवून विजय मल्ल्या परदेशी जाता कामा नये, असे काही कोठल्या राजकारण्याला पोटतिडीकेने वाटत नाही. आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांबाबतचा राजकारण्यांचा कळवळा पुतना मावशीच्या धर्तीचा आहे आणि म्हणूनच हे राजकारणी ‘प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारे’ आहेत, असे म्हणणे भाग आहे. या राजकारण्यांचा निर्ढावलेला बनेलपणा इतका पराकोटीचा आहे की, मल्ल्या दोन मार्चलाच परदेशी गेले आणि त्याच दिवशी त्यांना कर्ज देणाऱ्या १९ बँकांनी ‘मल्ल्या यांचा पासपोर्ट जप्त करा, त्यांना परदेशी जाण्यापासून रोखा’, असा अर्ज सर्वोच्च न्यायालयात केला. त्यानंतर आठवडाभराने हा अर्ज सुनावणीसाठी आला, तेव्हा ‘मल्ल्या दोन मार्चला देश सोडून गेले’, असे भारताच्या अ‍ॅटर्नी जनरल यांनी शांतपणे न्यायालयाला सांगितले. अंमलबजावणी संचालनालय, सीबीआय वगैरे तपास यंत्रणांनी देशातील सर्व बंदरे, विमानतळ व इतर देशाबाहेर पडण्याच्या मार्गावरील ठाण्यांना मल्ल्या यांना देशाबाहेर जाऊ देऊ नका, अशा सूचना दिल्या असतानाही, ते गेले! म्हणजे मल्ल्या यांना ठरवून देशाबाहेर जाऊ द्यायचे आणि ‘आम्ही त्यांना जाऊ देण्यास आडकाठी केली होती, तरीही ते गेले’, असा हतबल पवित्रा घ्यायचा. देशातील एक प्रमुख उद्योगपती उघडपणे प्रवासी विमानाने ११ बॅगा घेऊन देशातील विमानतळावरून लंडनला जाणारे विमान पकडतो आणि कस्टम, इमिग्रेशन वा पोलीस यापैकी कोणालाही त्याचा पत्ता नसतो, यावर एखादा निव्वळ मूर्ख वा सत्ताधाऱ्यांवरील भक्तीने आंधळा झालेला माणूसच विश्वास ठेवेल. उघडच आहे की, मल्ल्या यांना देशाबाहेर जाऊ देण्यासाठी ‘डील’ ठरले आणि त्यांना जाऊ देण्यात आले. येथेच ‘प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्या’चा मुद्दा येतो. शेतकऱ्याने कर्ज फेडले नाही, म्हणून त्याच्या घरादारावर टाच आणली जाते, गावात व गोतावळ्यात त्याच्या अब्रूला धक्का बसतो व नैराश्याने तो आत्महत्त्या करतो. पण राष्ट्रीयीकृत बँकांची सहा ते सात लाख कोटींची कर्जे थकविणाऱ्या देशातील प्रमुख बड्या उद्योगपतींपैकी किती जणांच्या घरादारावर व उद्योगांवर टाच आली? येणेही शक्य नाही; कारण या बड्या धेंडांकडे पोत्यांनी पैसा आहे आणि लाखो रूपये फी देऊन बडे वकील नेऊन कायद्याच्या नावाने कज्जेदलाली करण्याची सोय त्यांना आहे. शेतकरी वा सर्वसामान्य कर्जदार हे करू शकत नाही. तरीही काँगे्रस म्हणणार ‘काँगे्रसका हात आम आदमीके साथ’ आणि भाजपा घोषणा देणार ‘सबका साथ, सबका विकास’. त्यांना गरीब हे फक्त मतांसाठी हवे असतात. बोफोर्स प्रकरणातील एक आरोपी आॅक्तोवियो क्वात्रोच्ची यांना नरसिंह राव सरकारने देशाबाहेर जाऊ दिले, म्हणून भाजपाने किती आकांडतांडव केले होते? सोनिया गांधी यांच्या नावाने तर भाजपाने गरळ ओकले होते. आज भाजपाच्या हातात सत्ता आहे आणि मल्ल्या यांना परदेशी जाऊ देण्यात आले. मग दोष कोणाचा? याला पंतप्रधान मोदी जबाबदार नाहीत? संघ परिवार साधनशुचितेच्या गप्पा मारतो, मग आता सांगणार काय मोदी यांना की हे घडले, त्याबद्दल देशाची माफी मागा? ‘आयपीएल’ म्हणजे सट्टेबाजी असल्याचे सारेच खाजगीत मान्य करतात. या सट्ट्यात हजारो कोटी कमावून इतरांना गंडा घालणाऱ्या ललित मोदी नावाच्या ‘सफेद बदमाषा’ला ‘संपुआ’ सरकारने परदेशी जाऊ दिले व मोदी सरकारातील परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्याला सोडवण्यासाठी ब्रिटिश प्रशासनाला साकडे घातले. अशी एक ना अनेक प्रकरणे आहेत. परस्परांवर कुरघोडी करण्यासाठी ती प्रसार माध्यमांचा वापर करून प्रकाशात आणली जातात, ती मतदारांच्या भावनांना हात घालण्याच्या उद्देशाने. एकदा सत्ता मिळाली की, अशी प्रकरणे तितक्याच निर्ढावलेल्या निलाजरेपणाने ‘चुनावी जुमला’ ठरवली जातात. म्हणूनच मल्ल्या परदेशी जाणारच होते व शेवटी अनेक वर्षे कज्जेदलाली झाल्यावर ते सुटणारही आहेत!