शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव खटला: काँग्रेसची भूमिका मतलबीच

By admin | Updated: July 2, 2015 03:54 IST

दहशतवादला रंग नसतो, तो केवळ बेफाट व बेछूट हिंसाचार असतो, असं म्हणणं हा दिशाभूल करण्याचा मतलबी प्रयत्न असतो.अर्थात हा मुद्दा काही नवा नाही.

-प्रकाश बाळ(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)

दहशतवादला रंग नसतो, तो केवळ बेफाट व बेछूट हिंसाचार असतो, असं म्हणणं हा दिशाभूल करण्याचा मतलबी प्रयत्न असतो.अर्थात हा मुद्दा काही नवा नाही. त्यावर वारंवार चर्चा होत असते आणि वादातील दोन्ही बाजूंचे लोक दहशतवादाला हिरवा वा भगवा रंग नसतो, असं म्हणत असतात. त्यामुळंच आपल्या देशात ‘दहशतवाद’ या मुद्यावर जी चर्चा होते, ती हातचं राखून केली जात असते. साहजिकच दहशतवादाला तोंड देण्याासठी आपण ज्या उपाययोजना करीत असतो, त्याही परिणामकारक ठरत नाहीत. सध्या मालेगाव बॉम्बस्फोटातील हिंदुत्ववादी संघटना व व्यक्तींवरील खटल्यातील विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी जाहीररीत्या घेतलेल्या आक्षेपांमुळं जे रण माजले आहे, त्यातही हाच प्रकार होत आहे.‘दशतवाद’ हे प्रस्थापित व्यवस्थेला, मग ती राज्यसंस्था किंवा सामाजिक संरचना अथवा आर्थिक चौकट असू शकते, दिलेलं आव्हान असतं. एक प्रकारे प्रस्थापित व्यवस्था उलथवून तेथे आपल्याला हवी तशी संरचना उभी करण्यासाठी हिंसेच्या मार्गाचा वापर केला जात असतो. हे घडवून आणण्यामागं विशिष्ट विचार असतो आणि प्रस्थापित व्यवस्था का नको, हे सांगणारा युक्तिवादही असतो. म्हणूनच दहशतवादाच्या मागची विचारसरणी काय आहे आणि त्याआधारे दहशतवाद माजवणाऱ्या संघटनांकडे सर्वसामान्य का ओढले जातात, या मूलभूत मुद्याचा विचार करणं, हा कोणत्याही उपाययोजनेचा पहिला टप्पा असायला हवा. त्या दृष्टीनं भारतात गेली अडीच तीन दशकं माजत गेलेल्या दहशतवादी कारवाया कशासाठी होत्या व आहेत, हे स्पष्टपणं पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवं.हिंदू व मुस्लिम ही दोन राष्ट्रकं (नॅशनॅलिटीज) आहेत आणि ते एकत्र नांदू शकत नाहीत, म्हणून मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र हवं, या मागणीतून पाकिस्तानचा उदय झाला. ही मागणी संघटितरीत्या जाहीरपणं केली जाण्याच्या आधी सावरकरांनी ‘हिंदुत्वा’चा सिद्धांत मांंडला होता आणि ‘पुण्यभू व पित्रभू’ मानणारे अशी देशातील लोकांची विभागणी केली होती. स्वतंत्र पाकिस्तानची मागणी व सावरकरांनी केलेली व नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी बनलेली ‘हिंदुत्वा’ची मांडणी यांचं मुख्य उद्दिष्ट ‘मुस्लिम’ व ‘हिंदू’ अशी दोन राष्ट्रं निर्माण करणं हेच होतं. मात्र भारतात बहुसंख्य हिंदू होते. ते जो हिंदूधर्म मानत होते, तो सर्वसमावेशक व बहुविधता असलेला होता व आजही आहे. उलट हिंदू धर्माची ही वैशिष्ट्यं हेच देश कमकुवत होण्याचं मूळ कारण आहे, अशी सावरकरांची धारणा होती. ‘हिंदूंचं एकजिनसीपण’ आणि त्याद्वारं येणारं कडवेपण हे सावरकरांचं उद्दिष्ट होतं. भारत परकीय आक्र मणाला बळी पडला, तो हिंदू समाज एकजिनसी नव्हता, त्यामुळं हा समाज कमजोर बनल्यामुळंच, असं सावरकर मानत होते. सावरकरांचा हा विचार बहुसंख्य हिंदू मानत नव्हते; कारण हिंदूधर्म म्हणजे ‘हिंदुत्व’ नव्हे. इतर किताबी धर्मांप्रमाणं हिंदू धर्माला एका साचेबंद चौकटीत बसविण्याचा प्रयत्न म्हणजे ‘हिंदुत्वा’चा विचार. दुसरीकडं पाकिस्तानची निर्मिती ही इस्लामच्या आधारे झाली होती. त्यामुळं हा देश मुस्लिम धर्मियांसाठीच असणार, हे उघड होतं. पण फाळणी होऊनही बहुसंख्य मुस्लिम भारतातच राहिले. त्यामुळं भारतात जर हिंदू-मुस्लिम गुण्यागेविंदानं नांदत असतील, तर वेगळ्या पाकची गरज काय, असा प्रश्न निर्माण झाला. म्हणूनच भारतात हिंदू-मुस्लिम सलोखा राहू नये, यातच पाकचं हित होतं. त्यासाठी तो देश सतत प्रयत्न करीत आला आहे. पहिल्यांदा काश्मीरच्या प्रश्नावरून खोऱ्यात उसळलेला दहशतवाद नंतर देशभर पसरविण्याचं पाकनं ठरवलं, ते लष्करी बळावर भारताला नमवता येत नाही म्हणूनच.भारत हे ‘हिंदू राष्ट्र’ आहे, ही हिंदुत्ववाद्यांची भूमिका पाकच्या पथ्यावर पडणारी होती व आहे. त्यामुळं भारतातील मुस्लिमांना कायम असुरिक्षत वाटणं, यातच पाकचं हित आहे आणि येथे हिंदुत्ववादी राजकीयदृष्ट्या प्रबळ होण्यातच पाकचा फायदा आहे. आज नेमकं हेच झालेलं आहे. त्यामुळं पाकच्या मदतीनं भारतात पसरत गेलेल्या दहशतवादाचा रंग हिरवाच होता व आहे आणि या दहशतवादला तोंड देण्यात कुचराई केली जात आहे, असं मानून हिंदुत्ववादी गटांनी केलेल्या दहशतवादाचा रंग भगवाच होता व आहे. नेमका येथेच रोहिणी सालियन यांच्या आक्षेपाचा संबंध येतो.मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून हिंदुत्ववादी दहशतवाद्यांच्या विरोधातील न्यायालयीन खटल्यात मवाळ भूमिका घेण्यासाठी दबाव येत गेला, असा सालियन यांचा मुख्य आक्षेप आहे. पाकनं ‘लष्कर-ए-तोयबा’चा एक म्होरक्या झकी-उर रहमान लख्वी याच्याबाबत हीच भूमिका घेतली आहे. उघडच आहे की, आता संघ परिवाराच्या हाती स्वबळावर सत्ता आली असल्यानं ते मालेगावातील हिंदुत्ववादी दहशतवाद्यांना न्यायालयाच्या कचाट्यातून सोडवण्याचे प्रयत्न होणार, यात नवल ते काय? इस्लामी पाकिस्तान आपल्या दहशतवाद्यांना सूट देण्याच्या प्रयत्नात आहे, तेव्हा ‘भारत हे ‘हिंदू राष्ट्र’ बनवण्याच्या ईर्षेनं सत्तेच्या राजकारणात उतरलेल्या भाजपाच्या हाती सरकारची सूत्रं असताना तेही असाच प्रयत्न करणार. हेच इस्लामी पाकिस्तान व हिंदुत्ववादी भाजपा यात साम्य आहे. संघाला भारत हा ‘हिंदूंचा पाकिस्तान’ बनवायचा आहे. खरा मुद्दा हेमंत करकरे यांच्या हाती तपासाची सूत्रं येण्याच्या आधी या साऱ्या घटनात मुस्लिमांना कसे पकडले गेले आणि करकरे २६/११ ला मारले गेल्यावर तपास योग्य रीतीनं का झाला नाही, हाच आहे. त्याचं उत्तर काँग्रेस पक्ष देणार नाही; कारण ‘दहशतवादाला रंग नसतो’, अशी भोंगळ भूमिका घेऊन मतपेटीचं राजकारण काँग्रेसनं केल्यानंच हे घडू शकलं. त्याचा फायदा संघ परिवारानं उठवला. तेव्हा आज रोहिणी सालियन यांच्या आक्षेपावरून काँगे्रसनं रण माजवणं, हा निव्वळ राजकीय मतलबीपणा झाला.