शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

महात्मा गांधींच्या ‘अपहरणा’चा कट!

By admin | Updated: October 1, 2015 22:02 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नथुराम गोडसे करवी महात्मा गांधींचा खून करविला. नथुरामला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आणि तो फाशी गेला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नथुराम गोडसे करवी महात्मा गांधींचा खून करविला. नथुरामला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आणि तो फाशी गेला. महात्मा गांधींचा खून झाला त्या दिवशी पुणे आणि कोल्हापूरसारख्या अनेक शहरांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पेढे वाटले. आता नथुरामाच्या फाशीचा दिवस ‘शौर्य दिन’ म्हणून पाळणे सुरू केले आहे. नथुरामाची देवळे बांधण्याचे आदेश हिंदुत्ववादी संघटनांनी दिले आहेत.दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आरूढ होऊन महात्मा गांधींच्या नावाची रस्ते झाडण्याची दिखाऊ योजना आणून ‘महात्मा गांधी की जय’ असे तोंडाने म्हणत आहेत आणि त्याचवेळी महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाच्या पूर्णपणे विरोधी धोरणे आखून ‘गांधीवाद मुर्दाबाद’ अशी कृती करीत आहेत. ‘महात्मा गांधी झिंदाबाद’ आणि ‘गांधीवाद मुर्दाबाद’ ही गांधींच्या अपहरणाची रणनीती आहे. प्रतिमा पुजायच्या आणि विचारांचे दफन करायचे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याची पिलावळ असलेल्या कथित हिंदुत्ववादी संघटनांची कार्यपद्धतीच आहे. ‘युद्धाच्या धुमश्चक्रीत मुसलमानांचा पवित्र गं्रथ कुराण हाती आला तर तो साफसुथरा करून आपल्या पदरी असलेल्या मुसलमानांकडे सुपूर्द करावा,’ अशी आज्ञा स्वत:च्या सहीने आपल्या सैन्याला देण्याच्या आपल्या हुकुमात छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहून ठेवले आहे, ‘आपला धर्म आपणास प्यारा, त्यांचा धर्म त्यांना प्यारा.’ असेही या आज्ञेत म्हटले आहे. त्या शिवाजी महाराजांचा जयजयकार करायचा आणि त्याचवेळी मुस्लिम द्वेष पसरविण्यासाठी खोटी व भडकाऊ भाषणे करण्याची प्रचारनीती अवलंबली जात आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, ‘मी समाजवादी आहे’. त्यांनी केव्हाही परधर्मद्वेष सांगितला नाही. अशा स्वामी विवेकानंदांचे पुतळे व स्मारके उभी करायची परंतु, त्यांचे समाजवादासंबंधीचे व सर्वधर्म समभावाचे विचार गाडण्याची कृती करायची, ही रणनीती सुरू असते, अशी, अनेक उदाहरणे देता येतात. आता गांधींच्यासंबंधी हीच प्रचारनीती अंमलात आणली जात आहे.महात्मा गांधींनी समाजातल्या सर्वांत दुबळ््या, बहुसंख्य समाज विभागांच्या कल्याणाचा विचार सांगितला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान मोदी समाजातील अत्यल्प भारतातील व परदेशातील सर्वांत श्रीमंत समाजविभागाला अधिक श्रीमंत करण्याचे धोरण राबवत आहेत आणि महात्मा गांधींचा जयजयकारही करत आहे.महात्मा गांधींनी हरिजनोद्धाराचा विचार व कार्यक्रम सांगितला होता. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पिलावळ ‘गीता’ हा ‘राष्ट्रीय ग्रंथ’ म्हणून घोषित करा, अशी मागणी करीत आहे. राजस्थान हायकोर्टासमोर विषमतेचा ठाम पुरस्कार करणाऱ्या, मनुस्मृती सांगणाऱ्या मनुचा पुतळा बसविलाच आहे.महात्मा गांधींची मनाची स्वच्छता करणारी मोहीम होती. शूद्रांच्यावर रस्ते, गटारे व संडास सफाईची कामे लादावयाची व आणि तसली कामे ते करतात म्हणून त्यांना हिणवून ‘शूद्र’ म्हणायचे. या नीतीला गांधींचा विरोध होता. उच्चवर्णियांनाही संडास, गटारे व रस्ते सफाई करायला शिकवून त्यांनी मने साफ करावयाची, ही त्यांची शिकवण होती. फोटो काढण्यापुरती सफाई करायची आणि मनात कथित शूद्रांच्या द्वेषाची जुनाट घाण तशीच ठेवायची व वाढवायची हे गांधींच्या शिकवणीच्या विरुद्ध आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंतप्रधान मोदी यांची सफाई मोहीम ही गांधीवादाची, गांधींच्या तत्त्वज्ञानाची ‘सफाई’ करण्यासाठी वापरली जात आहे. जे चालू आहे त्याचे वर्णन घोषणेत करायचे म्हटले तर नरेंद्र मोदींची घोषणा ‘महात्मा गांधी जिंदाबाद, गांधीवाद मुर्दाबाद’ असे ठळकपणे म्हणता येते. गांधींचा खून करूनही त्यांचा विचार संपत नाही, हे पाहिल्यावर प्रतिमांचा जयजयकार करणे व विचारांचे अपहरण करणे, ही रणनीती वापरली जात आहे. गांधीवादाचे अपहरण केले जात आहे आणि त्यात आणखीनच वाईट म्हणजे गांधींचा वारसा मिरवणारे (ते सुद्धा फक्त फोटोच लावतात) ते पराभवाने एवढे खचून गेलेले दिसतात की त्यांना काय करावे हेच कळत नाही. त्यांना कळत नसेल तर ना कळूद्या. काय चालले आहे, ते आपण समजून घेऊया आणि जमेल तेवढे करूया.---------सामाजिक विचारवंत गोविंद पानसरे यांनी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त लोकमतसाठी लिहिलेला हा लेख अंमळ उशीरा हाती आला. त्यानंतर महिनाभराच्या आतच पानसरे यांंची अत्यंत निर्घृण हत्त्या केली गेली. आज बापूंच्या जयंतीदिनी त्यांचा तोच अप्रकाशित लेख येथे प्रसिद्ध करीत आहोत.