शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

तो पिलाने के लिए किसानोंका बहाना चाहिए!

By विजय दर्डा | Updated: January 31, 2022 05:47 IST

Wine sale: ...खरे तर, सरकारचे आभारच मानले पाहिजेत ! वाइन हे कृषी-उत्पादन तर आहे! पण, सारखे खुसपट काढणाऱ्या भाजपला हे कोण आणि कसे सांगणार?

-  विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

शेतकऱ्यांच्या गालावर खुशीची लाली आणण्याची इतकी दूरदर्शी व्यवस्था केल्याबद्दल आपण सगळ्यांनी खरे म्हणजे महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री, संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानले पाहिजेत. शेतमालावर आधारित उत्पादन असलेली वाईन किराणा दुकाने, सुपर बाजार आणि मॉलमध्ये उपलब्ध करून देण्याचा आदेश सरकारने काढला आहे. हे फार म्हणजे फारच  उत्तम झाले म्हणायचे ! तुम्ही कशाला उगीचच आरडाओरडा करताय? हुजूर,  जरा समजून घ्या, आपली संस्कृती बदलतेय. किराणा दुकानातून सामान घेता घेता आपण मॉलमध्ये पोहोचलो. मग तिथे ॲग्रो-प्रॉडक्टस असायला पाहिजेत की नको? एवढी साधी गोष्ट तुम्हाला समजत कशी नाही? आपण मॉल संस्कृती स्वीकारली, मॅकडोनाल्ड, पिझ्झा स्वीकारले; मग आताच का उगा आरडाओरडा? जनतेचा इतका विचार करणाऱ्या सरकारचे मनापासून आभारच मानले पाहिजेत. हरिवंशराय बच्चन नाही का म्हणाले...मुसलमान औ’ हिंदू है दो  एक मगर उनका प्यालाएक मगर उनका मदिरालय,  एक मगर उनकी हालादोनो रहते एक न जब तक  मंदिर मस्जिद न जाते,बैर बढाते मंदिर मस्जीद  मेल कराती मधुशाला !इतकेच नव्हे;  हरिवंशराय बच्चन त्याही पुढे जाऊन म्हणतात,मेरे शव पर वह रोये, हो जिसके आंसू मे हाला आह भरे वो, जो हो सुरभीत  मदिरा पी कर मतवाला,दे मुझको कान्धा जिनके  पग मद डगमग होते हो और जलूं उस ठौर जहां पर  कभी रही हो मधुशाला ! 

मी तर, याच्याही पुढचा विचार करावा म्हणतो. सुपर मार्केटमध्ये सध्या संत्री-मोसंबी तर, मिळतातच. शेतकऱ्यांसाठी सरकारने आपले मन आणखी विशाल केले तर, मग मोसंबीपासून तयार झालेली ‘मोसंबी’ आणि नारिंगीपासून तयार झालेली ‘संत्रा’ही सुपर मार्केटमध्ये मिळू लागेल. मधुशालेत जाऊन शरमिंदा होण्याची वेळच कशाला कुणावर यावी?

‘मोसंबी’ घ्या, ‘मोसंबी’ प्या... ‘संत्रा’ घ्या, ‘संत्रा’ प्या... तशी तर, इलायचीही येते. हे सगळेच ॲग्रो प्रॉडक्टस आहेत ना ! याचा फायदा (वाईनरिज मार्फत) शेतकऱ्याला मिळावा असा मोठा विचार सरकारने केला असेल. या निर्णयामुळे कारखान्यांना फायदा होईल म्हणून ओरडणाऱ्यांना तेथे काम करणाऱ्या हजारो हातांना मजुरी मिळेल हे का, दिसत नाही? 

- आता ॲग्रो प्रॉडक्टस नेहमीच चांगले असतात हे भाजपवाल्यांना कोण समजावून सांगणार? ते आपले उगीचच विनाकारण विरोध करत सुटले आहेत ! आता भाजपवाले ‘या असल्या गोष्टीं’ना हात लावत नाहीत- अगदी चुकून स्पर्शसुद्धा  करत नाहीत,  हे आपण जाणतो. पण, म्हणून उगीचच  महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र केल्याचा ओरडा करायचा, ही  काय बकवास आहे? या भाजपवाल्यांना ना शेतकऱ्यांचा फायदा सहन होतो, ना पिणाऱ्यांचा ! अरे भाजपवाल्यांनो, बच्चन साहेबांच्या या ओळी कधी तुमच्या नजरेखालून गेल्या आहेत का? ते म्हणतात.. बिना पिये जो मधुशालाको  बुरा कहे वो मतवाला पी जाने पार उसके मूंह पर  पड जायेगा ताला,दास-द्रोहियो दोनो में है  जीत सुरा की, प्याले कीविश्वविजयिनी बनकर  जग में आई मेरी मधुशालाहे बच्चन साहेबही अजबच म्हणायचे! मधुशाला लिहून गेले. इतक्या वर्षांनंतर सरकारने त्यांचे ऐकले, पण हे भाजपवाले काही त्यांचे ऐकायला तयार नाहीत. अरे मित्रांनो, आपली संस्कृती सोमरसाची आहे. भैरवनाथाचा प्रसाद कधी चाखला नाही का तुम्ही? 

आपले सिनेमेही तेच तर शिकवतात. ‘रोटी, कपडा और मकान’चे ते गाणे आठवते का? त्यात नायिका म्हणते... ‘पंडितजी मेरे मरनेके बाद, गंगाजल के बदले थोडी सी मदिरा टपका देना...!’ आता अशात आपले सरकार किराणा दुकानात वाइन विकण्याच्या गोष्टी करतेय, तर त्यात वाईट काय आहे? अरे हो, मला एक घटना आठवली. प्रफुल्लभाई नागरी उड्डयन मंत्री होते. त्याकाळात मी, राहुल गांधी, राजीव शुक्ला आणि अन्य काही जण नागरी उड्डयन खात्याच्या एका संसदीय समितीचे सदस्य होतो. एक दिवस असा प्रस्ताव आला की शेतकऱ्यांनी पिकवलेल्या द्राक्षापासून तयार झालेली वाइन देशांतर्गत विमानात प्रवाशांना देण्याची व्यवस्था झाली पाहिजे. त्यातून शेतकऱ्यांचा फायदा होईल. नुसता विषय निघाला आणि काही लोक भडकले. प्रस्तावाचे समर्थक म्हणत होते, वाइनमध्ये केवळ ७-८ टक्के मद्यार्क असतो. त्यापेक्षा जास्त तर खोकल्याच्या औषधात असतो ! सर्वांनी म्हटले, की ते ॲग्रोप्रॉड्क्ट आहे जरूर, पण आपली प्रतिमा काय होईल? आपण अनुमती दिलीत तर पिणाऱ्यांच्या नजरेतून आपण उतरू. चोरून लपून तर पितोच; पण ‘प्या खुशाल’ असे खुल्लम खुल्ला म्हणणेही किती बेशरमीची गोष्ट होईल ! - एका मिनिटात हा प्रस्ताव फेटाळला गेला.

- आता पाहा ना ! गांधींची जन्मभूमी गुजरात आणि त्यांची कर्मभूमी सेवाग्राममध्ये दारूबंदी आहे. पण सगळ्या जगाला माहिती आहे, की गुजरातेत सर्वाधिक दारू विकली जाते. मद्यसम्राट रईसला कोण ओळखत नाही? ‘रईस’ हा प्रसिद्ध सिनेमा त्याच्यावरच तर निघाला. तरी गांधींच्या नावावर पाखंड चालूच ! दारू विक्री खरोखर बंद होईल तेव्हा खरे ! वर्धा आणि चंद्रपुरात दारूविक्री बंद केली तर चोरून विकणाऱ्यांची चांदी झाली. नकली, विषारी दारू लोकांचे जीव घेऊ लागली. चंद्रपुरात तर दारूबंदी उठवावी लागली. हुजूर, एक सांगू? - केवळ समाजाची परिपक्वता आणि सभ्यताच हे चक्र थांबवू शकते. दारूचा तिचा तिचा असा महिमा आहे, हे कसे नाकारणार? 

जवळपास सर्व राज्यांचा तो उत्पन्नाचा मोठा स्त्रोत आहे. त्यात भाजपशासीत राज्येही आहेतच. निवडणूक काळात मतदानाच्या आदल्या दिवशी दारू काय करते हे तर आपण जाणतोच. राजकीय पक्ष खुल्या हाताने ही भेट मतदारांना देतात.

दारूचा महिमा गाण्यात कवी गीतकारांनी आजवर पुष्कळ कागद काळे केले... कोणा कोणाची नावे घेऊ? एक खासदार तर भरपूर पिऊन संसदेत मोठे भाषणही देऊन गेले. गायकांनीही महिमा गायला. पंकज उधास तर असा सूर लावतात... ‘हुई महन्गी बहुत शराब की थोडी थोडी पिया करो..!’ आमचे सरकार तर हे सारेच अवघड गणित सोपे करण्याचा प्रयत्न करते आहे. चालू द्या ! सर्वांना मिळो, भरपूर मिळो... सारे तृप्त होवोत ! तेव्हा आपण मोकळ्या मनाने सरकारचे आभार मानावेत हे बरे !

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र