शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही
2
डीजेच्या आवाजाची तक्रार केली, बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून बेदम मारहाण
3
"पैसे, दारुच्या बदल्यात मतदान करणारे पुढच्या जन्मात उंट, मेंढ्या, मांजर बनतील; जे लोकशाही..."
4
बाळासाहेबांची सगळी स्वप्ने पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली; नीलम गोऱ्हे यांची सावध प्रतिक्रिया
5
चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम
6
IPL 2025: आईसारखी माया..!! गालावर हात फिरवून नीता अंबानींनी काढली इशान किशनची समजूत
7
मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्याला दाखवले चक्क कोंबड्यांचे फोटो; सोलापूर दौऱ्यावेळी गोंधळ
8
सिद्धार्थ जाधव माझा मुलगाच! महेश मांजरेकर म्हणाले- "मी त्याच्यासाठी काहीच केलं नाही, पण त्याने..."
9
'दामिनी' मालिकेतील अभिनेत्री आठवतेय का? म्हणते - "दामिनीचा प्रभाव आजही तसाच आहे..."
10
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
'विशाल गवळीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा', आई इंदिरा गवळीची याचिका दाखल करणार
12
MI Playoff Scenario: ७ सामने, ३ विजय आणि ६ गुण, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबईला किती लढती जिंकाव्या लागतील? असं आहे गणित
13
‘लिव्हिंग विल’ पुनर्प्राप्तीसाठी चार महिन्यांत यंत्रणा तयार करा, उच्च  न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
14
ठरलं! 'या' दिवशी रिलीज होणार आमिर खानचा 'सितारे जमीन पर', ट्रेलर कधी येणार?
15
Cidco Lottery 2025: अक्षय तृतीयेला सिडको आणणार १२ हजार घरे?
16
मुंबईचा फलंदाज बाद झाला, माघारी परतत असतानाच तिसऱ्या पंचांना दिसली यष्टीरक्षकाची घोडचूक, मग...
17
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
18
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
19
ठाण्यातील १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव’, वृक्षांचे वय लपवल्याचे वनविभागाच्या पाहणीत उघड
20
"इंडस्ट्रीतील प्रत्येक महिलेसोबत त्याचे शरीरसंबंध...", अमृता रावची बहीण प्रीतिकाचे टीव्ही अभिनेत्यावर गंभीर आरोप

...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?

By अतुल कुलकर्णी | Updated: November 27, 2024 06:54 IST

वय उद्धव - राज यांच्या बाजूने आहे. आदित्य - अमित असे दोन उत्साही तरुण जोडीला आहेत. या चौघांनी एकत्र येत झोकून दिले, उभा आडवा महाराष्ट्र पिंजून काढला, संघटनेची बांधणी केली, कार्यकर्ते जोडले तर राज्यात खळबळ उडेल!

अतुल कुलकर्णीसंपादक, लोकमत, मुंबई

विधानसभा निवडणूक काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘लोकमत’ला मुलाखत दिली होती. ‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्रात चमत्कार होऊ शकतो का?’- असे विचारले असता, “आम्ही एकत्र येऊ नये म्हणून आतले आणि बाहेरचे दोघेही प्रयत्न करत आहेत. जगभरात एकमेकांचे वर्षानुवर्षाचे दुश्मन वाद मिटवून एकत्र येऊ शकतात पण उद्धवना काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळची वाटते. भाऊ नाही...” असे उत्तर राज यांनी दिले होते. याच काळात “एक है, तो सेफ है” अशी घोषणा दिली गेली. ही घोषणा भाजपाने त्यांच्या मित्रपक्षांसाठी दिली असली तरी निकालानंतरच्या परिस्थितीत ती उद्धव आणि राज यांना तंतोतंत लागू पडते आहे. त्यासाठी दोन्ही भावांना आपापसातील मतभेद विसरून एकत्र यावे लागेल.

दोघांनी एकत्र यावे म्हणून या आधी ज्यांनी कोणी प्रयत्न केला त्यात त्यांचा स्वार्थ होता. कधी कधी परिस्थिती तुम्हाला नाइलाजाने का होईना बदलायला भाग पाडते. रिपाइं - भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस - भाजप, काँग्रेस - शिवसेना हे भिन्न विचारांचे, भिन्न भूमिकांचे पक्ष राजकीय गरजेपोटी शहाणपण दाखवत एकत्र आले. या सगळ्यांनी सत्तेसाठी स्वतःच्या वैचारिक भूमिकांसोबत तडजोड केली. उद्धव आणि राज यांच्यात तर भावाभावाचे नाते आहे. दोघांवर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव आहे. दोघांचेही ते दैवत आहेत. त्यामुळे दोघे एकत्र आले तर त्यांचा फायदा होईल की नाही माहिती नाही; पण राज्याच्या राजकारणाला वेगळी दिशा नक्की मिळेल. 

दोन भावांमध्ये पटले नाही म्हणूनच राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’ सोडली. ९ मार्च २००६ रोजी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवा पक्ष काढला. लगेच २००७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांत त्यांचे ६ नगरसेवक निवडून आले. २००९ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या, तेव्हा १३ आमदार विजयी करून राज यांनी स्वतःची वेगळी छाप निर्माण केली. त्यानंतर २०१२ मध्ये मुंबई महापालिकेत २९ नगरसेवक निवडून आणले. नाशिक महापालिका ताब्यात आली. त्यामुळे राज यांची हवा तयार झाली. २०१४ मध्ये मोदींची लाट आली. त्यात राज यांचा एकमेव आमदार निवडून आला. २०१४ ची निवडणूक जाहीर झाली आणि यांचे पुत्र अमितचे गंभीर आजारपण सुरू झाले. त्यामुळेही पाच वर्षे राज यांना पक्षाकडे लक्ष देता आले नाही. २०१९च्या विधानसभेत पुन्हा एकच आमदार निवडून आला. त्याच काळात झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. अमितचे आजारपण सुरूच होते. त्याही स्थितीत राज यांनी २०१४ला महाराष्ट्राची ब्लू प्रिंट आणली. मात्र ब्लू प्रिंट आली त्याचदरम्यान भाजप-शिवसेनेचा काडीमोड झाला. ब्लू प्रिंटवर कुठे चर्चाच झाली नाही.

पुढे २०१७ ला मुंबई डोळ्यापुढे ठेवून राज यांनी ‘मुंबई शहर आपल्याला कसे अत्याधुनिक करायचे आहे’ याचा आराखडा मांडला. जावेद अख्तर, आमिर खान, सलीम खान, रितेश देशमुख अशी बडी मंडळी व्यासपीठावर होती. त्यावेळी झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राज यांचे फक्त ७ नगरसेवक निवडून आले. त्यातले ६ नगरसेवक २०१९ ला उद्धव ठाकरे यांनी पळवले. अमितचे आजारपण पाच-सहा वर्षे चालू होते. त्यादरम्यान एका मुलाखतीत राज यांनी आपण अंगठ्या, माळा घालणे बंद केले आहे. आपला देवावर विश्वास राहिला नाही अशीही खंत व्यक्त केली होती. त्यामुळे पक्ष बांधणीकडे दुर्लक्ष झाले. २००६ ला पहिल्यांदा बांधायला घेतलेला पक्ष १४ वर्षांनी म्हणजे २०१९ ला त्यांनी पुन्हा नव्याने बांधायला सुरुवात केली पण बांधणी नीट झालीच नाही. आता पुन्हा ६ वर्षांनी २०२४ च्या विधानसभा निकालानंतर राज यांच्यावर नव्याने पक्ष उभा करण्याची वेळ आली आहे.

यादरम्यान पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. या विधानसभा निवडणुकीत एका ठाकरेंची उंची कमी करताना दुसरे ठाकरे वाढू नयेत यासाठी कोणी, कसे व किती प्रयत्न केले, याची कल्पना राज ठाकरे यांना असेलच. आपल्याशी चर्चा न करता राज यांनी माहीमची जागा परस्पर उभी केली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलाखतीत सांगितले होते. त्यावर “काही गोष्टींची जाणीव आपण ठेवली पाहिजे. ती जर ठेवली नाही, तर राजकारण हे बदलत असते. बदलत्या काळात पुढे जेव्हा गरज लागेल तेव्हा आम्हालाही काही गोष्टींचा विचार करता येईल,” असे उत्तर राज यांनी दिले होते. दुसरीकडे आपला आणि आपल्या पक्षाचा कोणी व कसा वापर करून घेतला, याचीही जाणीव राज यांना निकालाने करून दिली असेल. या अशा आठवणी सोबत घेऊन नव्याने वाटचाल करण्याची वेळ राज यांच्यावर आली आहे.

ही पार्श्वभूमी जशी राज ठाकरे यांची आहे, तशीच उद्धव ठाकरेंचीही आहे. दोघेही स्वतःच्या कम्फर्ट झोनमध्ये राहणे पसंत करतात. त्यातल्या त्यात राज ठाकरे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना भेटतात. मायकल जॅक्सनच्या संगीतापासून वर्तमानपत्राच्या सौंदर्यशास्त्रापर्यंत त्यांचा दांडगा अभ्यास तर आहेच, शिवाय या सगळ्या विषयांवर मनमोकळ्या गप्पा करायला त्यांना आवडते. त्यांच्याकडे कलासक्त वृत्ती, स्वतःची सौंदर्यदृष्टी आहे. राज कॅरीकेचर करण्यात माहीर आहेत. त्यातून त्यांना मिळालेली दृष्टी राजकारणात उपयोगी पडू शकते. उद्धव उत्तम फोटोग्राफर आहेत. लेन्समधून त्यांना जे पाहता येते, ते इतरांना दिसत नाही. दोघांनाही या गोष्टींचा फायदा होईल की नुकसान, याचा हिशोब त्यांनीच मांडायचा आहे. उद्धव-राज यांच्यासोबत वय आहे. आदित्य-अमित असे दोन उत्साही तरुण जोडीला आहेत. गरज फक्त दोघांनीही झोकून देत महाराष्ट्र पिंजून काढण्याची आहे. या चौघांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत उभा-आडवा महाराष्ट्र पिंजून काढला, संघटनेची बांधणी केली, कार्यकर्ते जोडले, तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडेल.

प्रत्येक मराठी माणसाकडे बाळासाहेब ठाकरेंवरील प्रेमाचे रोखीचे बॉण्ड आहेत. गावागावात जाऊन ते बॉण्ड जमा करून घेण्याचीच काय ती गरज आहे.ज्या भाजपचे १९८० मध्ये केवळ १४ आमदार होते, त्या भाजपला १३२ आमदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ४४ वर्षे लागली. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरही “मी थांबणार नाही. लढणार आहे. तरुण पिढीचा विश्वास वाढविणार आहे. उद्याच मी कराडला निघालोय.” असे शरद पवार ८३ व्या वर्षी म्हणू शकतात, मग राज ठाकरे यांना कशाची आडकाठी आहे..? राजकारणात कधीच कोणी संपत नसतो. तसेच अशक्य ते शक्य करून दाखविण्याचा खेळ म्हणजे राजकारण असे म्हणतात, ते काही उगीच नव्हे!    atul.kulkarni@lokmat.com

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा