शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

अक्षररंग: जादूचा दिवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 10:27 IST

नवे माध्यम ॲमेझॉनचे ‘किंडल’ आणि गुगलचे ‘प्ले बुक’ या ऑनलाइन आवृत्तींच्या स्वरूपात आहे. 

दिनकर गांगल,  छापील शब्दांचे वाचन जवळजवळ संपले आहे. पण वाचनाचे महत्त्व माणसांना माहीत आहे. त्यामुळे वाचनासाठी कालानुरूप सोयीची, सुटसुटीत माध्यमे उपलब्ध होत असतात. नवे माध्यम ॲमेझॉनचे ‘किंडल’ आणि गुगलचे ‘प्ले बुक’ या ऑनलाइन आवृत्तींच्या स्वरूपात आहे. 

प्रकाशन व्यवहारात पूर्वापार उणीव भासत असे, की प्रत्येक पुस्तकाला वाचक असतो, मात्र तो कोठे आहे ते माहीत नसते. त्यासाठी जेवढे विस्तृत जाळे टाकावे लागते तेवढा मोठा अर्थव्यवहार प्रकाशन व्यवसायात नाही. ती उणीव दूर होण्याची शक्यता या, माध्यमात जाणवते. बदलापूरच्या विश्वनाथ खंदारे याने ‘किंडल’ आणि ‘गुगल प्ले बुक्स’ यांच्या योजनांचा मराठी लेखकवर्गात व्रतासारखा प्रचार चालवला आहे.

विश्वनाथ आहे पन्नास वर्षांचा. तो बीकॉम झाल्यावर संगणकाच्या नादी लागला. ते यंत्र असे आहे, की ते अधिकाधिक पुढच्या मागण्या करत राहते आणि विश्वनाथ त्यांना पुरून उरतो असे मी पाहिले आहे. डेटा एंट्रीपासून सुरू झालेला त्याचा प्रवास... आता तो मोठमोठी ‘प्रोजेक्टस्’ हाताळतो. तो पुस्तकांचे व जुन्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन करतो, वेबसाईट उभ्या करतो, पुस्तके विकतो- एकशेसाठ प्रकाशकांची बारा हजार ‘टायटल्स’ त्याच्याकडे आहेत. त्याने कोरोनाकाळात सर्वत्र शुकशुकाट असताना पुस्तक वाचनाची वाढलेली ओढ लक्षात घेऊन, पुस्तकांची ठिकठिकाणी ‘डिलिव्हरी’ केली. विश्वनाथला ‘किंडल’ व ‘गुगल प्ले बुक्स’मध्ये वाचनवृत्ती वाढण्याची शक्यता दिसते. पुस्तक ‘किंडल’मध्ये तेरा देशांत पोचते आणि ‘गुगल’मध्ये चौऱ्याहत्तर देशांत! लेखकाने या दोन माध्यमांतून पुस्तक रजिस्टर केले तर त्याला पुस्तक कोठे विकत घेतले वा पोचले गेले, की तत्क्षणी कळते आणि ‘किंडल’वर तर प्रत्येक वाचनाचे पस्तीस पैसे लेखकाच्या खाती जमा होतात!

मराठीत स्वयंप्रकाशनाचा म्हणजे स्वतःचे पुस्तक स्वतःच प्रसिद्ध करण्याचा धंदा तेजीत आहे. विश्वनाथ म्हणतो, की यामुळे लेखकांकडे पुस्तकांचे गठ्ठे पडलेले असत. त्यांनी थोडा अधिक खर्च करून ‘किंडल’-‘गुगल’ची वाट चोखाळली तर पुस्तके वाचकांच्या नजरेस पडतीलच व वाचली जाण्याची शक्यता वाढेल. ज्ञानोपासकांना जुनी पुस्तके सहज हाताळता येतील. या प्रक्रियेत प्रसिद्ध पुस्तकाचे ‘ओसीआर’ तंत्राने पुनर्रेखन केले जाते आणि ते इच्छित स्वरूपात ‘किंडल’-‘गुगल’कडे सादर केले जाते. त्यांच्या रजिस्ट्रेशनच्या प्रक्रिया पूर्ण केल्या, की पुस्तक जागतिक बाजारात उपलब्ध होते!

विश्वनाथ हरहुन्नरी आहे. त्याच्या तोंडी ‘नाही’ हा शब्द नाही. तो तंत्र-विज्ञानातील सर्व तऱ्हेच्या जादू करू शकतो आणि जादूचा वाटावा, असा हा दिवा त्याच्या हाती आला आहे!

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई