शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : नरेंद्र मोदींच्या या विजयाची सात कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 04:30 IST

टोकाचा मोदीविरोध व जातीची समीकरणेही भाजपचा विजयरथ रोखू शकली नाहीत. कागदावर गणित केल्यास ‘महागठबंधन’ सशक्त दिसत होते. पण मोदींनी हे गणित व जातीची समीकरणे फोल ठरविली. यावरून लोक मोदींचा वाढता स्वीकार करू लागल्याचे दिसते.

- बरखा दत्त((ज्येष्ठ पत्रकार )याही वेळी पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असे मला नेहमीच वाटत होते व मी तसे वारंवार लिहिलेही होते. पण सन २०१४ मध्ये झाले तसेच झाले व इतर सर्व पत्रकारांप्रमाणे मलाही या विजयाचे स्वरूप एवढे मोठे असेल व मोदींना लोकांमध्ये एवढा मोठा सुप्त पाठिंबा आहे, याची मलाही कल्पना आली नव्हती.निवडणुकीच्या काळात मी ज्यांचे मत अजमावले त्यापैकी बहुतांश मतदारांचा प्रश्न ठरलेला होता : (मोदींशिवाय) दुसरे आहे कोण? म्हणून मी थट्टेने या निवडणुकीला ‘लेकिन और है कौन’ निवडणूक म्हणायचे. पण खरे तर ही ‘आयेगा तो मोदीही’ निवडणूक होती. मोदींना मतदारांनी अत्यंत स्फूर्तीने दिलेली पसंती होती.मोदींच्या या देदीप्यमान विजयामागे मला जी कारणे दिसतात त्यापैकी काही अशी :- देशाचे नेतृत्व खंबीर व सतत नजरेसमोर असायला हवे, अशी देशाच्या जनतेला मोठी आस आहे. देशासाठी कोणताही धोका पत्करायला तयार असलेला नेता अशी मोदींची प्रतिमा आधीपासून होती. बालाकोट हवाई हल्ल्यांनी त्यास बळकटी दिली, एवढेच.- भाजपने ‘तुकडे तुकडे गँग’ असे म्हणून विरोधकांची संभावना करणे व आपल्याच देशाच्या नागरिकांना देशद्रोही म्हणणे हे विखारी होते. पण स्पर्धेतील इतर पक्ष याला स्वत:चा कोणताही पर्याय देऊ शकले नाहीत.- टोकाचा मोदीविरोध व जातीची समीकरणेही भाजपचा विजयरथ रोखू शकली नाहीत. खरं तर कागदावर गणित केल्यास ‘महागठबंधन’ सशक्त दिसत होते. पण मोदींनी हे गणित व जातीची समीकरणे फोल ठरविली. यावरून जातीपातींच्या पलीकडे जाणारे नेतृत्व म्हणून लोक मोदींचा वाढता स्वीकार करू लागल्याचे दिसते.- राजकीय हिंदुत्व हे आता एक वास्तव म्हणून स्वीकारावेच लागेल. हे फक्त बंगालमध्येच नव्हे तर पश्चिम व उत्तर भारताच्या फार मोठ्या पट्ट्यात हे दिसून आले. परिणामकारक संवाद यंत्रणेने राष्ट्रवाद व हिंदुत्वाची अशी काही सांगड घातली गेली की, बहुसंख्य हिंदू समाजाला आपल्यावर अन्याय होत असल्याचे वाटू लागले. याचे भांडवल करायला भाजप बसलीच होती.- आर्थिक आघाडीवर पाहिले तर रोजगार, जीडीपी वाढीच्या मोजणीवरून झालेला वाद, जीएसटी लागू करताना सुरुवातीला आलेल्या अडचणी आणि नोटाबंदी यावरून बरीच टीका होऊनही सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांनी या नाराजीवर मात केली.- दिल्लीच्या प्रस्थापित सत्ता वर्तुळात बाहेरून आलेल्या मोदींना अनेकांनी स्वीकारले नव्हते. त्याची चर्चाही बरीच झाली. तुम्ही म्हणाल, याचा मतांशी काही संबंध नाही. लोक अगदी याच शब्दात बोलत नसले तरी त्यांच्या मनातील भावनाही याचा विरोध करणाऱ्या होत्या, हे नाकारून चालणार नाही.- मोदींच्या यशाच्या चढत्या आलेखाचा आढावा काँग्रेसचे अपयश व त्यांच्या नेत्यांच्या बेफिकीर वृत्तीचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होणार नाही. एकाच घराण्यावर पूर्णपणे विसंबून असलेल्या पक्षाला संघटना बांधणीत अडचणी येणे ठरलेलेच आहे. जेव्हा असे घराणेबाज नेतृत्वही पक्षाला यश मिळवून देऊ शकत नाही तेव्हा काँग्रेसने खरे तर आपल्या अस्तित्वासंबंधीच काही प्रश्न विचारण्याची गरज आहे. अन्यथा, काँग्रेस जिवंत ठेवण्यात तरी काय अर्थ आहे, हा योगेंद्र यादव यांनी विचारलेला प्रश्न सार्थच म्हणावा लागेल. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपा